अळूवडी
लागणारे साहित्य:
८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल
पाककृती:
अशी ताजी ताजी अळूची पाने घ्या.
पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा
हे देठ सुरीने थोड तासुन घ्या म्हणजे उंडा/लोड करताना तो पोकळ होत नाही. जर पाने छोटी असतील तर गरज नाही.
वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे.
मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (३६ चा आकडा)
माझी छोटी सुगरण मला मदत (लुडबुड ) करत असते नेहमी.
अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे किंवा आधी गुंडाळून मग कडा आत घुसवायच्या
आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवण्यासाठी ठेवावेत. एक लोड भांड्यात बसत नव्हता म्हणून धारदार सुरीने कापुन ठेवला आहे.
आता धिर धरण्याचे काम करा. झाकण उघडून लोड थोडे थंड होउ द्या.
थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा . तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.
ह्या आहेत तळलेल्या गरमागरम वड्या.
अधिक टिपा:
आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.
अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

वाचने
16900
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
मेलो !
In reply to मेलो ! by अवलिया
ठार मेलो!
In reply to ठार मेलो! by मेघवेडा
गले मे खिचखिच होते ... म्हणुन
In reply to गले मे खिचखिच होते ... म्हणुन by टारझन
- (नवी पाकृ) टाळु च्या

तों पा सु
तों पा सु
ख ल्ला स !! मार
करंदीची अळूवडी
In reply to करंदीची अळूवडी by प्रियाली
जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल
In reply to जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल by परिकथेतील राजकुमार
करंदी
मस्त
मस्त.
In reply to मस्त. by चिंतामणी
चिण्ट्स्...वडिचा अळु काळपट
In reply to चिण्ट्स्...वडिचा अळु काळपट by पर्नल नेने मराठे
पर्नल नेने मराठे
In reply to मस्त. by चिंतामणी
सोप्पय!
वॉव.. झक्कास. तळलेल्या
In reply to वॉव.. झक्कास. तळलेल्या by गणपा
नारळाच्या दुधात आटवुन
In reply to नारळाच्या दुधात आटवुन by स्पंदना
पाककृती काही खास वेगळी
In reply to पाककृती काही खास वेगळी by गणपा
या पाकृनंही "जीव घेतला"! पण
In reply to या पाकृनंही "जीव घेतला"! पण by रेवती
>>भारतीय ग्रोसरीत अळकुड्या
In reply to या पाकृनंही "जीव घेतला"! पण by रेवती
मी लावून पाहिल्या
In reply to मी लावून पाहिल्या by प्रियाली
अळूची पाने हाताच्या
In reply to या पाकृनंही "जीव घेतला"! पण by रेवती
खरे तर आळू खरकट्यावर चांगला पोसला जातो...
In reply to खरे तर आळू खरकट्यावर चांगला पोसला जातो... by योगप्रभू
पुण्यातील कार्यालयात लग्नात
अल्ला जीव घेतला! फारफार आवडता
अहाहा... माझा आवडता खाद्य
हाय हाय हाय!!! बापरे!! अशक्य
In reply to हाय हाय हाय!!! बापरे!! अशक्य by प्राजु
हे राम!!
In reply to हे राम!! by प्रियाली
आमच्या इथेही इंडीयन ग्रोसरीत
In reply to हे राम!! by प्रियाली
अगं खरंच मिळतो अळू पटेलात.
In reply to अगं खरंच मिळतो अळू पटेलात. by प्राजु
इंडीयन ग्रोसरीच्या बाबतीत
॒पटेल मध्ये आळू मिळते पण
आज पहिला ह्या धाग्याचं दर्शन
एक नंबर..!
भारतीय दुकानात अळू मिळाला
जे ठार मेले आहेत त्यांना
सुंदर!! अळूवडी मध्ये एक
मस्तच दिसतेय सारे..
In reply to मस्तच दिसतेय सारे.. by भानस
समजले.
In reply to समजले. by चिंतामणी
त्या तै आहेत. भाग्यश्री तै!
आशिष, भानस धन्यवाद. चिंतामणी