✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अमेरीकी उन्मत्तपणा

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 12/09/2010 - 10:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15107 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

मग काय खालची कापुन चिटकवेल ?

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 16:11 नवीन
मग काय खालची कापुन चिटकवेल ? कैच्याकैच विजुभौ शॉच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

च्यायला हे लोक वरतीपण चड्डी

Nile
गुरुवार, 12/09/2010 - 16:21 नवीन
च्यायला हे लोक वरतीपण चड्डी घालतात!! तरीच यांचं स्वागत अमर्रिकेत असं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वरतुन चड्डी घालणार्‍यांचं

मृत्युन्जय
गुरुवार, 12/09/2010 - 16:24 नवीन
वरतुन चड्डी घालणार्‍यांचं अमेरिकेला कौतुक असतंच नेहेमी. सुप्परमॅन आठवा बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

त्या चांदण्या निळ्यावर

विजुभाऊ
गुरुवार, 12/09/2010 - 15:50 नवीन
त्या चांदण्या निळ्यावर दिस्तात्....काळ्यावर नाही
  • Log in or register to post comments

गांधीवाद

रोमना
गुरुवार, 12/09/2010 - 17:13 नवीन
हि गांधीवादाची सुरुवात तर नव्हे?
  • Log in or register to post comments

रोमना तुम्ही म्हणतातशा

विजुभाऊ
गुरुवार, 12/09/2010 - 17:22 नवीन
रोमना तुम्ही म्हणतातशा अर्थाने गांधीवादाची ही सुरुवात असेल आणि त्यामुळे अमेरीकन माजुर्डेपणाला धडा मिळणार असेल तर फारच बरे होईल. वाजपेयीनी अणूचाचणी केली त्यामुळे अमेरीकेने भारतावर म्हणे बरीच बंधने आणली होती. त्याची कोणतीच झळ इथल्या सर्वसामान्याना पोहोचली नाही. त्या बंदीमुळे भारताचे काहीच नुकसान झाले नाही. उत्तर कोरीयाचे अमेरीका काहीच वाकडे करू शकलेला नाहीय्ये. चिन तर अमेरीकेला कोणत्याच बाबतीत जुमानत नाहिय्ये. अमेरीका आपले काहिही वाकडे करू शकत नाही आणि अमेरीकाच भारतावर अवलंबून आहे हे अमेरीकेला जाणवून दिले तरी सुद्धा तो गांधीवाद यशस्वी होईळ
  • Log in or register to post comments

अमेरीकेचा धोका

रोमना
गुरुवार, 12/09/2010 - 17:53 नवीन
सध्या जास्तीत जास्त तेल विहीरी व तेल लंपास करणे चालूच आहे. अरबी लोकांसारख त्यांनाही थोडक्यात श्रीमंत व्हायचय नुसत पैशानी नव्हे तर सत्ता गाजवण्यासाठीहि. भारतातला वनस्पतीपासून इंधन बनविणारा गायबच झाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

भारतातला वनस्पतीपासून इंधन

विजुभाऊ
गुरुवार, 12/09/2010 - 18:04 नवीन
भारतातला वनस्पतीपासून इंधन बनविणारा गायबच झाला ? तो रमर पिल्लै ! त्याने लोकाना मस्त चुना लावला होता. अर्थात धान्यापासून पेट्रोल बनवल्यामुळे धान्याच्या किमती किती वाढतील याची कल्पना आहे का? सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोमना

>>त्याने लोकाना मस्त चुना

गांधीवादी
Fri, 12/10/2010 - 03:47 नवीन
>>त्याने लोकाना मस्त चुना लावला होता. त्याने जे केले तेच जर का पश्चिमेला कोणी केले असते तर त्या लोकांनीच त्याला जड इंग्लिश नावे देऊन त्याची पेटंट वगेरे घेऊन त्याचा उदोउदो केला असता, ह्याची खात्री आहे. बर, ह्या महानुभावाने जे काय केले, त्याला मी 'चुना लावणे' असे न म्हणता केवळ 'चुन्याचा ठिपका लावला' असे म्हणेन. आणि त्यासाठी मात्र चक्क CBI ला पाचारण केले गेले. आणि तेच आजकालचे घोटाळे पाहता त्यात 'चुन्याची खोरे' लावली जातात तेव्हा CBI कुठे असते ? >> धान्यापासून पेट्रोल बनवल्यामुळे धान्याच्या किमती किती वाढतील याची कल्पना आहे का? सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत नाही शोध कर्त्याच्या बोलण्यात १० टक्के तरी तथ्य असते आणि त्यादृष्टीने शोध घेऊन जर का खरेच धान्यापासून पेट्रोल बनविणे शक्य झाले तर, १) आपल्याला पेट्रोल आयात करण्याची गरज उरणार नाही २) शेतकर्याला अधिकाधिक प्रोत्साहन मिलेले. ३) एकूण भांडवल भारतातच राहील बाकी, धान्यापासून दारू बनविताना मात्र शेतकऱ्याच्या भल्याचे गणिताचे डोंगर उभे केले जातात, तेच गणिताचे डोंगर इथे मात्र फसतात. मूळ मुद्दा तोच, एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानाचा उपयोग आपले सरकार करून घेईल असे सहजासहजी वाटत नाही. http://www.hinduonnet.com/thehindu/2000/03/12/stories/01120007.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खुपच पिडादायक

वेताळ
गुरुवार, 12/09/2010 - 17:41 नवीन
मला वाटते अश्या त्रासदायक चौकश्या टाळण्या करिताच अमेरिकन नागरिक खुप कमी कपडे वापरतात.
  • Log in or register to post comments

सगळाच मस्तवालपणा!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/09/2010 - 18:07 नवीन
दुसरं काय? आणि जिथं आपल्या सरकारला ह्या विषयाचं गांभिर्य कळत नाही / जाऊन सरळ खडसवायचा दम नाही, तिथं आपण बोंबलुन करणार काय?
  • Log in or register to post comments

अगदी असेच म्हणतो!!

स्वप्निल..
गुरुवार, 12/09/2010 - 20:29 नवीन
अगदी असेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा

रेवती
गुरुवार, 12/09/2010 - 19:46 नवीन
महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा तपासणीतून थोडीफार सूट मिळाली पाहिजे हे मान्य आहे पण मीराबाईंचे प्रकरण पहिलेच नाही. आजवर छप्पनवेळा असे घडून गेले आणि म्हणावा तसा आवाज उठवला गेला नाही. त्यास भारत सरकार काहीच जबाबदार नाही काय? आपले अधिकारी दुसर्‍या देशात पाठवताना आधीची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून काय काय केले गेले? पॅट डाऊन तपासणीचा इथे सामान्य माणसानेही पुरस्कार केलेला नाही पण सुरक्षेसाठी म्हणून 'ओक्के' म्हटले आहे असे ऐकले आहे. मला या प्रकरणाचा राग आलेला नाही तर विचित्र वाटले. अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेनी इतके ताणू नये तसेच भारत सरकारने सामान्य जनतेसाठी नाही तर नाही पण अधिकार्‍यांसाठीही काही केले नाही म्हणून खंत वाटली. मीराबाईंचे प्रकरण, शाहरूख खान तसेच प्रफुल्ल पटेल या नावांमुळे पेप्रात बातमी तरी आली. दोनदा हिथ्रो लंडनला असाच अनुभव माझ्यासरख्या सामान्य (कॅटल क्लास) प्रवाशाला आला.......काय करणार? नियमाप्रमाणे तिथल्या बायांनी मला बाजूला केले तपासणी केली. ते करताना कोणताही आक्षेपार्ह प्रकार मला तरी वाटला नाही पण सिंगल आउट केल्याने विचित्र वाटले. आजकाल दागिने असताना फारशी तपासणी झालेली आठवत नाही पण काही सुरक्षा तपासणीच्यावेळेस कमरेचे पट्टे, शूज् आणि बरोबरचे सगळे सामान तपासायला द्यावे लागते म्हणून किती भारतीय बायका कमीत कमी दगिने वापरणे पसंत करतात? एखादी बांगडी, छोटे मंगळसूत्र एवढ्यावर भागत नाही काय? असले काही केले कि आपण त्या लोकांना जास्त इंटरेस्ट घ्यायला भाग पाडतो.
  • Log in or register to post comments

एखादी बांगडी, छोटे मंगळसूत्र

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/09/2010 - 20:10 नवीन
एखादी बांगडी, छोटे मंगळसूत्र एवढ्यावर भागत नाही काय? असले काही केले कि आपण त्या लोकांना जास्त इंटरेस्ट घ्यायला भाग पाडतो.
असं असेल तर श्रीमती मीरा शंकर यांनीही जीन्स-टीशर्ट अथवा स्कर्ट-टॉप किंवा फॉर्मल सूट घातला असता तर कदाचित त्यांनाही वेगळं काढलं गेलं नसतं. (मी स्वतः घड्याळ, चष्मा वगळता एकही दागिना घालत नसले तरीही) हे पटलं नाही. बांगड्या असोत वा ब्रेसलेट्स आणि मंगळसूत्र असो वा चेन-पेंडंट, ही प्रत्येकाची अभिव्यक्ती आहे आणि फक्त वर्ण वेगळा म्हणून भारतीयांनी आपली अभिव्यक्ती सोडावी आणि गोर्‍यांना मात्र यातून सूट हे अमान्य! काही वेळा गोर्‍या सहप्रवाशांना सोडून मलाही असं वेगळं काढलेलं आहे, अगदी बांगड्या, मंगळसूत्र घातल्या नव्हत्या, साडी नव्हे, जीन्स-टीशर्ट घातले असूनही! मला वेगळं काढलं आणि बरोबरच्यांना जाऊ दिलं याचा मला राग आला नसला तरीही माझ्याबरोबरच्या गोर्‍या मित्र/सहप्रवाशांना नक्कीच आला होता. पण मी, एक सामान्य नागरीक आणि माझ्या देशाची राजदूत यांच्यात फरक आहे आणि तो योग्य आहे तिथे दिसलाच पाहिजे. डिस्नीलँडच्या राईड्समधे भारतीय (किंवा इतर कोणत्या देशाची) राजदूत आहे म्हणून रांग मोडून जाऊ देण्याची गरज नाही पण विमानतळावरची अशी वागणूक पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वर लिहिल्याप्रमाणे महत्वाच्या

रेवती
Fri, 12/10/2010 - 00:12 नवीन
वर लिहिल्याप्रमाणे महत्वाच्या व्यक्तिंना वेगळी (कमी कटकटीची) सुरक्षा व्यवस्था हवी पण याबाबतीत सामान्य जनतेने आवाज उठवून फायदा नाही. सरकारने पाऊले उचलायला हवीत. असे प्रसंग अनेकदा येऊनही भारत सरकार गप्प का आहे? आपण दुसर्‍यांचा उन्मत्तपणा दाखवण्याआधी आपले सरकार काय करते या बाबतीत हे पहायला हवे. अमेरिकेचा हा स्वभाव अनेक वर्षे आहे. तो आपण चालवून का घ्यावा हे सरकारला वाटले पाहिजे.सरकार का आवाज उठवत नाही? आपल्या देशाचे सन्माननीय अधिकारी पाठवताना त्यांची व्यवस्था दुसर्‍या देशात कोणत्याप्रकारे होणार आहे हे पाहण्याचे अधिकार सरकारला आहेत. सरकार पहिला निषेध हा भारतातल्या अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये नोंदवू शकते. पुढच्यावेळेस अधिकारी व्यक्तीला आम्ही पाठवणार नसल्याचा पवित्रा घेउ शकते. सरकारचा खंबीरपणा हाही महत्वाचा मुद्दा होऊ शकतो. फिकट अक्षरातील मजकूर जनता क्लासशी (चांगल्या अर्थी) संबंधित आहे. साड्या नेसणार्‍यांनी साड्या नेसाव्यात पण काही महिला हातभर सोन्याच्या बांगड्या (किंवा म्याचिंग दागिने) घालून प्रवास करतात. तपासणीत त्यांना सगळे दागिने काढायला सांगितले तर ट्रेमध्ये ढिगभर बांगड्या, मग गळ्यातले चार प्रकार, अंगठ्या काढत बसतात आणि लोकांची रांग मात्र वाढत असते. अश्यावेळेस आवश्यक ते किमान दागिने घालून गेलं कि वेळ कमी जातो. नंतर तपासणी अधिकार्‍यांच्या कपाळावरची आठी बघावी लागत नाही. उदा. एका महिलेने एका तबकात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून ती तशीच नेणार म्हणून हटून बसली होती. तपासणी अधिकारी तिला मूर्ती नेऊ द्यायला तयार होते पण त्यांना ती आडवी पाडून एक्स रे स्क्रिनिंग करावयाचे होते त्याला ती तयार नव्हती. लोक इतके अस्वस्थ झाले होते त्यांची वादावादी बघून! अश्यावेळेस वाटते कि आपण उगाच लक्ष वेधून घेत आहोत का? हजारो लोक प्रवास करत असताना थोड्या को ऑपरेशनने गोष्टी सोप्या होत असतात. कोणत्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला अर्थातच माझा विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/10/2010 - 01:06 नवीन
सहमत. हातात हजार बांगड्या घालून जायलाही हरकत नाही पण रांगेच्या बाहेरच उभं राहून बांगड्या, ठुशा, नथी, वाकी इत्यादी दागिने काढून एखाद्या पिशवीत ठेवले तर इतरांचीही गैरसोय होत नाही. भारतात खरंतर एवढी तपासणी होतही नाही तरी मी घड्याळही काढून खांद्यावरच्या झोळीत टाकते, मला आणि इतरांनाही ताटकळत बसावं लागत नाही.
हजारो लोक प्रवास करत असताना थोड्या को ऑपरेशनने गोष्टी सोप्या होत असतात.
अगदी! मला तर असे प्रवासी पाहिले की त्या सिक्युरिटी चेक करणार्‍या लोकांचीच दया येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

शिल्पा ब
Fri, 12/10/2010 - 02:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा अ‍ॅक्स इफेक्ट असु शकतो.

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 19:56 नवीन
हा अ‍ॅक्स इफेक्ट असु शकतो. Image removed.
  • Log in or register to post comments

सेक्सीस्ट मजकूराचा निषेध

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/09/2010 - 20:13 नवीन
बाय द वे, विजुभाऊ, मूळ धाग्यातला भारताच्या महिला राजदूत ... यातला महिला हा शब्दप्रयोग खटकला. राजदूत महिला आहे का पुरूष याचा काय संबंध? भारताच्या राजदूत यावरूनच सदर व्यक्ती स्त्री आहे हे कोणत्याही मराठी भाषिकास समजावे. मुद्दाम महिलांना 'सिंगल आऊट' करण्याचा प्रकार आणि तो ही वर्णद्वेषाची तक्रार करणार्‍या धाग्यावर फारच हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments

+१

सेरेपी
गुरुवार, 12/09/2010 - 21:39 नवीन
पटलं! मलाही हे खटकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मकरंद अनासपुरे म्हणतो ...

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 23:39 नवीन
मकरंद अनासपुरे म्हणतो ... "कोणाला कशाचं ... आणि हिजड्याला मिशांचं ... " -(खुर्चीसम्राट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

म्हणजे काय हो काका?

सेरेपी
Fri, 12/10/2010 - 00:02 नवीन
म्हणजे काय हो काका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

म्हणजे काय हो काका?

चिंतामणी
Sun, 12/12/2010 - 01:12 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

प्रतिसाद न उडाल्याबद्दल

अवलिया
Fri, 12/10/2010 - 17:16 नवीन
प्रतिसाद न उडाल्याबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

भारताच्या राजदूत यावरूनच सदर

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 10:32 नवीन
भारताच्या राजदूत यावरूनच सदर व्यक्ती स्त्री आहे हे कोणत्याही मराठी भाषिकास समजावे. मुद्दाम महिलांना 'सिंगल आऊट' करण्याचा प्रकार आणि तो ही वर्णद्वेषाची तक्रार करणार्‍या धाग्यावर ओ बाई साहेब. या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे मी भारतीय महीला राजदूत या वाक्यातून महीला हा शब्द काढून टाकला तर फारच अनर्थ होईल. कारण " भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली " ही अशी बातमी काय भयंकर खळबळ माजवेल कल्पना कर. अवांतरः प्रतिभाताई पाटलाना अजूनही राष्ट्रपती असेच संबोधतात. ते त्या पदाचे नाव आहे. चेअर्मन चे चेअरपर्सन झाले तसे राष्ट्रपती चे राष्ट्रस्पाऊस असा नावबदल झालेला नाहिय्ये हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ह ह पु वा !!

टारझन
Fri, 12/10/2010 - 10:58 नवीन
भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली
=)) =)) =)) =)) विजुभाऊ , आवरा !! तुम्ही स्त्रीची आजची प्रतिमा डागाळवत आहात !! आणि बाईच्या मागे साहेब लावलेला देखील मला खटकला आहे. ह्यासाठी मी तुम्हाला कोर्टात खेचिन .. खेचु का ? राखी साहेबांच्या कोर्टात !! - एकच साहेब ... बाबा साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

भुजबळ

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/09/2010 - 20:53 नवीन
ह्या मुद्याचा बाऊ करण्यात आला आहे मुंबई कारचा वृत्त पत्राला बडे अधिकारी व दक्षिण मुंबईतील श्रीमान धेंडे ह्यांना परदेशात भारतात मिळते तशी राजेशाही बडदास्त ठेवली जावी अशी अपेक्षा असते . मुळात राजदूताचे विशेष अधिकार असतात .त्यांच्यावर दुसर्या देशात अगदी हेरगिरीचा आरोप आला तरी कोणतीही कारवाई न होऊ देता त्यांच्या मूळ मायदेशी परत पाठवण्यात येते .हाच कायदा दूतावासातील कर्मचारी वर्गावर लागू होतो .(आठवा काही वर्षापूर्वी आपण पाकिस्तानी राजनैतिक कर्मचारी भारतातून पाठविले तर त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून आपला अधिकारी परत पाठवला .मुद्दा असा आहे .कि जर अमेरिकन सरकारला वाटले कि झडती घ्यावी सुरक्षितेसाठी तर घेऊ शकतात .आपली एअर इंडिया भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींना जे लाड करते तसे जगात क्वचित होतात .उदा परदेशात माझा एक मित्राचे वडील मुंबईत बड्या अधिकारावर आहेत .त्याच्या महत्वाच्या औषधे भारतातून आणायची होती .अर्थात आमचा एक भारतीय मित्र सुट्टीवर आल्या असल्याने तो आणणार होता .त्याला ह्याच्या तीर्थरूपांनी फोनोफोनी करून कुठलीही चेकिंग न करता सरळ विमानात बसवले . मला ओबामा भारत भेटीतील किस्सा आठवला .कि भुजबळ हे ओबामा ह्यांना भेटायला आले तेव्हा ओबामा ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची तपासणी करावयास मागितली तेव्हा माझ्या राज्यात खरेतर मीच तुमची तपासणी करायला हवी असे त्यांनी खडे बोल सुनावल्यावर मग अमेरिकन दूतावासातून माफी मागितली गेली .थोडक्यात काय परकीय भूमीवर त्यांच्या नियमाने वागणे पण आपल्या देशात त्यांना आपल्या नियमाने वागायला लावणे . अजून एक उदाहरण द्यायचं तर पूर्वी अरब जेव्हा कुलाब्यातील हॉटेलात यायचे तेव्हा त्याची सरबराई हि एका राजमहा राजासारखी करायचे विमानतळावर तोच प्रकार .आपण डी हा कराचीत गेल्यापासून म्हणा का ह्यातील काही लोकांचे अल कायद्याचे संबध उघडकीस आले म्हणा आता त्यांचे मुंबई विमानतळावर कडक तपासणी होते .पांढरा झगेवाला म्हणून विशेष लाड होत नाहीत .
  • Log in or register to post comments

फक्त रंग, वेषभूषा इ. लक्शात

पुष्करिणी
गुरुवार, 12/09/2010 - 21:10 नवीन
फक्त रंग, वेषभूषा इ. लक्शात घेउन वेगळी वर्तणूक कोणालाही आणि कुठेही दिली जाउ नये. दूतावासातील कर्मचारी या सुरक्षा प्रोसिजर मधून कायद्यानं वगळलेले नाहीत, तरीही ही दुर्दैवी घटना आहे. ऑफिशिअली भारतसरकारतर्फे निषेध नोंदवला जायला हवा पण तरीही मीरा शंकर यांनी 'मी परत इथे कधीही येणार नाही' अशी वक्तव्ये करण्याचे टाळावे. त्यांना निमंत्रित केलेल्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या इतर लोकांनी निषेध नोंदवला आहेच आणि रीतसर क्षमाही मागितली आहे ( त्यांचा झाल्या घटनेशी काहीही संबंध नसताना ) अवांतर : माझे काही अनुभव मला एकदा हँबर्ग विमानतळावर पासपोर्ट कंट्रोल च्या वेळी रांगेतून वेगळं काढून बाजूला उभं रहायला सांगितलं, मला वाटलं की भाषेचा प्रश्न असावा आणि कोणा आंग्लभाषिक स्टाफला बोलावतील. ५० मिनिटांनी मीच आठवण करून दिली तर मला तसच जाउ दिलं. एकदा बेलफास्ट ला गेले असताना बरोबर असणार्‍या सग्ळ्या आशियाइ वर्णाच्या लोकांना पासपोर्टवर ठपाठप शिक्के मारून, चेहर्‍याकडे एक कटाक्शही न टाकता जाउन दिलं. पण त्याच वेळी विमानातल्या इतर स्पेसिफिक नावं, तोंडावळा असणार्‍या (आयरिश कॅथोलिक) लोकांना पद्धतशीरपणे वेगळं काढून स्ट्रीप सर्च केलं गेलं. अजून एका टूरमधे बाकीचे सगळे सहप्रवासी अमेरिकन होते. एका अमेरिकन आजोबांचं (वय वर्ष ७९ ) ऑपरेशन झालं होतं आणि पायात स्टीलचा रॉड होता, तसं डॉक्टर आणि अमेरिकन दुतावासानं दिलेलं पत्रही होतं. पण प्रत्येक वेळेस त्यांचं स्ट्रीप सर्च होत असे. ते बाकीच्यांना त्रास नको म्हणून इतर सगळ्यांपेक्शा २ तास आधीच निघत. कधीकधी सिक्युरिटी जाउदे, पासपोर्टवर ठप्पा सुद्धा मारायला कोणी नसतं. लोकंच पोलिसांना शोधत फिरत असतात *. * डिट्टेल माहितीसाठी श्री. मेवे यांच्याशी संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

लोकंच पोलिसांना शोधत फिरत

रेवती
Fri, 12/10/2010 - 00:15 नवीन
लोकंच पोलिसांना शोधत फिरत असतात खूपच सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

सीएनएनची बातमी

संदीप चित्रे
Fri, 12/10/2010 - 00:43 नवीन
http://www.cnn.com/video/#/video/us/2010/12/09/pkg.indian.ambassador.airport.WAPT?iref=allsearch
  • Log in or register to post comments

या video नंतरचा video

शिल्पा ब
Fri, 12/10/2010 - 02:20 नवीन
या video नंतरचा video बघा...गम्मत कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

हीच योग्य वेळ आहे ह्या

निनाद मुक्काम …
Fri, 12/10/2010 - 15:53 नवीन
हीच योग्य वेळ आहे ह्या लोकांना जगापुढे उघडे करण्याची . सध्या प्रसारमाध्यमे जगातील त्यांच्या विरुध्ध आहेत .जनमत युरोपातील ह्यांच्या विरुध्ध आहे .व स्वताच्या कट्टर पंथीय पणात वाढ करून हि लोक स्वताच्या पायावर धोंडा पाढून घेत आहेत , ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे .तेव्हा जमेल तशी जनजागृती करणे आपले आद्य कर्तव्य आहे . आपली प्रतिक्रिया आवडली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

<<<ह्यांच्या हिरव्या धर्मांध

शिल्पा ब
Fri, 12/10/2010 - 23:32 नवीन
<<<ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ते कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

सब्र का फल मिठा होता है

निनाद मुक्काम …
Sat, 12/11/2010 - 18:42 नवीन
नवीन लेखाची प्रतीक्षा करा धीर धरी धीरा पोटी फळे मिळती रसाळ गोमटी सब्र का फल मिठा होता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ह्यांच्या हिरव्या धर्मांध

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/11/2010 - 00:19 नवीन
ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे
"तुम्ही आणि साने गुरूजी माझे सगळ्यात आवडते लेखक आहात", हे पुलंचं 'सखाराम गटणे'तलं वाक्य (उगाचच?) आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

याहु!दी

प्रियाली
Sat, 12/11/2010 - 00:25 नवीन
मला मिभो आणि शम्मी कपूर आठवले. ;) कृपया, दोघांचा एकमेकांशी संबंध लावण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/11/2010 - 00:29 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अग्ग्ग्ग्ग्ग्ग!

रेवती
Sat, 12/11/2010 - 01:37 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग्ग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

प्रश्न चांगला आहे .किंबहुना

निनाद मुक्काम …
Sat, 12/11/2010 - 02:23 नवीन
प्रश्न चांगला आहे .किंबहुना माझ्या पुढच्या लेखातून हा विषय सविस्तर मांडणार आहे . बाकी आपण परदेशात राहतो भारतात राहून लोकांना कल्पना येणार नाही कदाचित पाकिस्तानी व अरब ह्यांची मानसिकता व माजोरडे पणा व कट्टर वाद ह्यामुळे आशियायी लोकांची प्रतिमा डागाळत आहे . सध्या एवढेच सांगतो धर्मावर आधारित राष्ट्र हि संकल्पना गांधी ह्यांना मान्य नव्हती (म्हणून देशाने सेक्युलर वाद ) निवडला .पण त्यामुळे भारताने ज्यू राष्तांचे अस्तित्व मान्य केले नाही .व १९८९ पर्यत आपले ह्यांच्याशी संबंध नवहते (सरकारी पातळीवर ) ते नरसिंह राव ह्यांच्या लुक वेस्ट हे संपूर्ण वेगळ्या व स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे शक्य झाले .सध्या आपला देश त्यांच्याकडून मुसती सहस्त्रे विकत घेत नाही आहे .तर औद्योगिक दृष्ट्या सुध्धा जवळ येत आहे .सर्वात महत्वाचे त्याची हेर संस्था मोसाद जगातील १ असून सध्या त्यांचे आपल्याला प्रती दहशतवाद व आधुनिक काळातील वॉर ४थ फ जनरेशन ज्याला म्हणतात (जेथे प्रत्यक्ष युद्ध व सैनिकी कारवाई न करता ) ह्यात भारताने इजारेल कडून प्रशिक्षण सुरु केले आहे .अधिक व सखोल माहिती मी लेखात लिहीन एक मात्रा नक्की हिरव्या दहशतवाद हा इजारेल व भारताचा समान दुखरा भाग आहे .व एकत्र येऊनच आपल्याला काहीतरी करता येईल (अमेरिकत ज्यू लोकांची बलाढ्य लॉबी असून बँकिंग व प्रसारमाध्यमे ह्यावर त्यांची पकड आहे )हिलरी ह्यांचा जावई ज्यू आहे . आज भारतीय कंपन्या व अनिवासी भारतीय हे अमेरिकेत व्यापारात पुढे आहेत .(गुज्जू व ज्यू हे जगातील हिर्याचे मार्केट सांभाळतात ) तेव्हा तुमच्या इथून जगाची सूत्र हलवली जातात त्या वाईट हॉउस ची सूत्रे आपण मिळून घेऊ शकतो (हा पोकळ आशावाद नाही आहे हे माझ्या लेखातून स्पष्ट करेन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर आहे

वेताळ
Sat, 12/11/2010 - 13:46 नवीन
वाईट हॉउस जो पर्यत चांगले हॉउस बनत नाही तोपर्यत जगात शांतता लाभणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

प्रकार

विनायक प्रभू
Fri, 12/10/2010 - 12:34 नवीन
वरील प्रकाराचा निषेध करणारे ओबामाला पत्र पत्रकाकांनी लिहावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रानो ( यात

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 17:38 नवीन
धन्यवाद मित्रानो ( यात मयत्रीणी सुद्धा आल्या. उगाच जेन्डर बायस्ड म्हणून णीषीध करू णका ) विषेशतः शिल्पा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7075932.cms
  • Log in or register to post comments

http://maharashtratimes.india

निनाद मुक्काम …
Sat, 12/11/2010 - 03:53 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7075932.cms झुकती हे दुनिया झुकानेवाला चाहिये . हेच खरे आहे .मीरा शंकर ह्याचे चूक का बरोबर हा मुद्दा राहिला बाजूला ( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले )असाच मुसाद्दी पणा दाखवून लाशाक्रे तोयबाचे आर्थिक नाकेबंदी केली (स्पेन मध्ये त्यांना रसद पुरवणारे अटकेत )अर्थात अमेरिका व इजारेल व तमाम पाशिमात्या देशासोबत व्यापारी संबंध वाढवून अशाच मार्गाने काश्मीर प्रश्न सोडवावा .(हा प्रश्न वादग्रस्त नाही असे युएन मध्ये नुकतेच जाहीर झाल्याचे वाचून आहे .
  • Log in or register to post comments

भारतात ही ओबामा आला

उल्हास
Sat, 12/11/2010 - 18:30 नवीन
तेव्हा त्यांनी भुजबळ वगैरेवर असा मस्तवालपणा करायचा प्रयत्न केला होता
  • Log in or register to post comments

मग हे सुद्धा सांग.

चिंतामणी
Sun, 12/12/2010 - 01:20 नवीन
( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले ) माफीनामा नको आहे. दिलगीरी व्यक्त करायला हवी आहे. X(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा