Skip to main content

इतरा॑च्या मते असलेला -- मराठी माणूस खरच भा॑डकुदळ आहे का?

इतरा॑च्या मते असलेला -- मराठी माणूस खरच भा॑डकुदळ आहे का?

Published on शनीवार, 13/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1862
प्रतिक्रिया 21

मी स्वतः वडिलांच्या नोकरी मुळे महाराष्ट्रा बाहेर बरीच वर्षे होतो. इतरांच्या मते मराठी माणूस बुद्धिजीवी, कलाप्रेमी, भरपूर वाचन करणारा, पैश्याने फार श्रीमंत नाही अशीच प्रतिमा आहे. राजस्थानात शिकत असतांना बरेच शिक्षक मरठी मुलगा म्हणून माझ्याकडे कॉतुकाने बघायचे.

हा कौल असा पहिजे होता "माणूस खरच भा॑डकुदळ आहे का?"

In reply to by सिद्धार्थ ४

सहमत. कोण कसे आहे हे त्याच्या वागण्यावरुन ठरवणे बरे नव्हे.परीस्थीतीचाही दोष असतो,पण 'हो' ला मत दीले आहे,कारण मराठी माणसाच्या बाबतीत प्रत्येकवेळी परीस्थीतीला जबाबदार धरणे योग्य नाही. युपीवाले लोक त्यामानाने फार चांगल्या स्वभावाचे असतात्,नम्रताही खुप असते.

In reply to by pramanik

>>>>>>>>> युपीवाले लोक त्यामानाने फार चांगल्या स्वभावाचे असतात्,नम्रताही खुप असते. सगळेच लोक चांगले असतात. मग ते युपी वाले असोत किंवा महाराष्ट्रीयन ...तुम्ही कुठल्या angle नी समोरच्या ला बघता हे महत्वाचे आहे.

In reply to by सिद्धार्थ ४

ईथे दृष्टीकोनाचा प्रश्न नाही.आपण त्याच्यांत असलेली शिस्त बघा,बोलायची पध्दत बघा,त्यामानाने ते लगेच काही तोंडावर बोलत नाहीत्,त्यांच्यासारखा पाहुणचार कोणीच करत नाही. घरी मोठ्यांना जो मान दीला जातो,तो फक्त ह्यांच्याच घरात बघायला मिळतो.

पुर्वी असेल. आता भांडखोर नक्कीच नाही.

भांड्कुदळ नाही. मराठी भाषेचा लहेजा मृदूपेक्षा कठोरकडे झुकणारा आहे. आदबशीर शब्द कमी, इनफॉर्मल जास्त.. त्यामुळे भास होतो तसा..भांड्खोर असल्यासारखा.

भाषा शास्त्रज्ञांचा मते सध्याचा मराठी भाषेचा विकास ज्या काळात झाला तेव्हापासून ती जेत्या लोकांची भाषा आहे, त्या मुळे मराठीत आज्ञार्थी वाक्ये जास्त वापरली जातात त्या उलट जर आपण उत्तरे कडे पहिले तर (हिंदी ,भोजपुरी , मारवाडी , गुजराथी, इ. ) त्या भाषां मध्ये आदरार्थी वाक्ये जास्त दिसतात कारण उत्तरेत बराच काळ मोगलाचा अंमल होता व त्या भाषांचा विकास गुलामगिरीच्या काळात झाला आहे ...आपल्या कडून चुकुनही कुणाचा उपमर्द होऊ नये म्हणूनच ते फार काळजी घ्यायचे त्यामुळेच आगदी लहान मुलांना सुद्धा आप, आप म्हणतात......तुम्ही पंजाब चे उदाहरण पाहू शकतात ती बोली सुद्धा आपल्या मराठी सारखी रांगडी आहे

In reply to by जोशी 'ले'

कोकणातला मराठी माणूस बुद्धीमान असतो, तो कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. त्यामुळे भांडकुदळ जो तुम्ही म्हणत आहात तो महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागात आहे ते काही मला माहित नाही. इथे रांगडे पणाचा उल्ले़ख आहे पण आमच्या कोकणाची भाषा रांगडी नसून प्रेमळ आहे. लेखकाने चुकिचा कौल घेतला आहे.

In reply to by विकि

इथे कोकण चा उल्लेख कुठे आलय...? दुसरे हे कि मी कुठे म्हणटलय कि कोकण ची भाषा भाडंकुद्ळ आहे , महाराष्ट्राराच्या सर्व बोली भाषा काना ला गोड च आहेत (त्या प्रेमळ नाहित) फक्त माझ म्हणन हे कि मराठीत अज्ञार्थी वाक्या मुले इतरना ती भाडंकुदळ वाटते...

In reply to by जोशी 'ले'

तुम्ही कोकणचा उल्ले़ख का केला नाही. रांगडी भाषा कोकणाची नाहीच आहे. तुमच मत चुकीचे असल्याने मी कोकणचा उल्ले़ख केला आणि लेखकाने चुकिचा प्रश्न विचारला असे मी म्हटलेच आहे.