महामानवास अभिवादन!
लेखनप्रकार
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो.
तसेही तथाकथित उच्चवर्णिय असूनही, एक भारतिय म्हणून जगताना आज मी जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्याच्या श्रेयाचा एक मोठा वाटा त्यांना जातोच.
तर, अशा या थोर माणासाला माझे अभिवादन.
वि.सू. : हा धागा केवळ एका थोर आणि कर्तृत्ववान माणसाला वंदन करण्यासाठी काढलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर / अनुयायांवर वगैरे चर्चा करयासाठी वेगळा धागा काढावा. त्या व्यतिरिक्त या धाग्यात बाबासाहेबांबद्दल काही आठवणी अथवा थोडीफार साधकबाधक वैचारिक चर्चा होण्यास हरकत नाही. पण या विषयाच्याबाबतीतल्या पूर्वानुभवामुळे चर्चा भरकटल्यास / विद्वेषपूर्ण झाल्यास असे प्रतिसाद इथे ठेवले जाऊ नयेत असे वाटते.
वाचन
287759
प्रतिक्रिया
0