✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जर्मन आख्यान दास्ताने फुट बॉल वल्ड कप भाग २

न
निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी
Mon, 12/06/2010 - 18:54  ·  लेख
लेख
तर मग हळू हळू स्पर्धा जशी पुढे सरकत होती .तसा येथे क्रीडा ज्वर चढत होता .मंदीच्या काळात परत दुकानात गर्दी सुरु झाली होती .आम्ही पण सर्वात प्रथम जर्मन झेंडा विकत आणला. .घराबाहेर खिडकीत जसे दिवाळीला आकाश कंदील असतो .तसे जर्मन झेंड्याचे मोठे कापड आम्ही लावले होते .आमचा सर्व परिसरातील खिडक्या सजल्या होत्या .बाकी दोन मोठे झेंडे पाठीवर सुपर मेन बांधतो तसे बांधायला घेतले होते . .आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो म्हणून आपला राष्ट्रध्वज बाळगण्यासाठी आपल्या देशात कठोर नियमावली आहे .ह्या उलट पाशात्य देशात हे निर्बध शिथिल आहेत .अगदी अंत वस्त्रे सुद्धा ते राष्ट्र ध्वजाची करतात .असो आपल्या झेंड्या प्रमाणे त्यांचा सुद्धा झेंडा ३ रंगाचा आहे .वरती काळा मध्ये लाल व खाली पिवळा कधी कधी त्यांच्या झेंड्यात आपण जसे अशोकचक्र ठेवले आहे तसे पंख पसरलेला गरुड हि असतो .बाकी हातात व डोक्याला लावण्यासाठी बेंड असो वा शिट्या किंवा वूवूझेला हि सर्व सामुग्री झेंड्याच्या रंगांत रंगून गेली होती .झेंड्याचे ३ रंग असणारे मार्कर सुद्धा घेतले होते .जेणेकरून ते मार्कर कपाळावर व गालावर लावून झेंड्याच्या आकार निर्माण झाला होता. .२००६ चा लंडन मध्ये आम्ही सामने पहिले ते पब मध्ये. तेव्हा आठवते पोलंड विरुद्ध जर्मनी असा सामना रंगत आला असताना बहुसंख्य पोलिश घोळक्यात आम्ही जर्मन संघास पाठिंबा देणारे अल्पसंख्य होतो त्यामुळे घोषणा बाजीत कमी पडत होतो .शेवटी इतकावेळ गप्प बसलेल्या मला त्या जर्मन बांधवांचे दुखः पाहवले नाही. मग आवाज कुणाचा.... च्या तालावर मी चालू झालो बाकी एविबिपी मध्ये कधीकाळी कार्यरत असल्याचा दांडगा अनुभव माझ्या नरड्याला होता. तेव्हाही कर्मभूमी युके व भावी जावई म्हणून जर्मनी हे समोरासमोर येऊ नये अशी प्रार्थना केली होती .नाही तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झाली असती. .बाकी क्रिकेट च्या वेळी आपली भूमिका स्पष्ट असते .त्यावेळी अंगात भुवन संचारला असतो .पण युके मधील दुसर्या पिढीचा वारसा मोंती पानिसर जेव्हा इंग्लिश संघातून क्रिकेट खेळतो. तेव्हा मात्र ह्या कन्फुज देसी लोकांची तारांबळ उडते. कि पाठिंबा हरभजन ला द्यायचा कि मोन्ति पानिसारला .अर्थात बहुसंख्य पाठिंबा देतात ते हरभजनला .म्हणून नसीर हुसेन कर्णधार होता. तेव्हा त्याची हे इंग्लिश पासपोर्ट धारी देसी लोक हुर्य उडवत .हे पाहून वाईट वाटे.. पण गंमत अशी वाटे कि वरून चर्चिल चा आत्मा काय तळमळत असेल हे सर्व पाहून. .पण आता भूमिका स्पष्ट होती .माझी कर्मभूमी जर्मनी असल्यामुळे त्यांना पाठिंबा हा नैतिकता व ( बायकोच्या घरचे मला कुटुंबातील सदस्य म्हणून मानतात हे मायेचे पाश ) ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जर्मनीला पाठिंबा मनापासून होता .बाकी आपले शेजारी हिरवे भाई मात्र येथे राहून सर्व निष्ठा मात्र कट्टर पंथीयांची वाहतात हा अनुभव मला आला होता .ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट हाच त्यांचा खाक्या असतो .त्यामुळेच जेव्हा जेव्हा पत्नीसोबत मी जर्मन दुकान उपहारगृह व मॉल कुठेही जातो .तेव्हा मला पाहून प्रथम कुठून आलात असा चेहऱ्यावर भाव काही लोकाच्या असतो .पण इंडिया हे शब्द त्यांच्या कानी पडताच त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव मी लगेच ताडतो. मग त्याच्या वागण्यात आपुलकी दिसते .फार पूर्वीपासून ह्या देशातील लोकांना भारत व हिंदू ह्या शब्दांनी गारुड केले आहे .असो .मग जर्मन सेना प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत आगेकूच करत होती .व तो दिवस उजाडला .समोर उभे येऊन ठाकले इंग्लिश आरमार ज्यात एन जवानीत अर्धचंद्र झालेला व ओढगस्तीला आलेला व प्रीमियम लीग खेळून थकलेला रुनी व त्याचे साथीदार होते .तर जर्मन आपल्या लाडक्या कर्णधार बलाक ला मिस करत होते .आम्ही सुट्टी घेऊन हा सामना अतिभव्य पडद्यावर पहायचे ठरविले .हे कलोन च्या एका वैशिष्ट्या पैकी एक कि हि लोक भयंकर उत्साही. .आफ्रिकेतील सामन्यातील थरार कलोन मध्ये प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जी शक्कल लढवली होती. ती व्यावसायिक दृष्ट्या एकदम किफायत शीर . होती .मुळात ठिकाण होते आईस हॉकीचे आंतराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्टेडीयम (मागच्या महिन्यात तेथे आईस हॉकीचा वल्ड कप झाला होता व संघ होते जर्मनी केनेडा व आईस लेंड व आदी देश) तर ह्या भव्य स्टेडीयम मध्ये प्रवेश मोफत होता. .त्यामुळे 10000प्रेक्षक उपस्थित होते. बाकी हॉलीवूड सिनेमातून आईस हॉकीचे सामने पाहतो. तेव्हा दाखवतात .तसे बंदिस्त स्टेडीयम असून वरचे छत ओपन होऊ शकत होते .फक्त आत येताना खाद्य व द्रव पदार्थ न्यायला बंदी होती. .हीच खरी मेख होती .थोड्या चढ्या भावात ह्या गोष्टी विकून त्यांनी आपला नफा कमावला होता. .अर्थात स्टेडीयम च्या चारीबाजुला मोठ्या स्क्रीन होत्या . खाली प्रत्यक्ष मैदानात एक स्टेज उभारले असून तेथे डीजे जर्मन गाणी वाजवून उत्साह निर्मिती करत होता. ,मग स्थानिक कलावंताचा बेंड आपली कला पेश करत होते ..तीन चार बिग ब्रदारचे स्पर्धक सुद्धा आले होते. (ह्याचे बिग ब्रदर एक वर्षासाठी असते .पूर्ण एक वर्ष ) सामना ४ वाजता स्थनिक वेळेनुसार सुरु होणार होता. तरी आम्ही दोन वाजल्या पासून रांगेत होतो. ३ ला आत सोडल्यावर आम्ही पळत जाऊन मोक्याची जागा पटकावली. .येथे मुंबईतील लोकल मध्ये चढून जागा पटकावण्याचा अनुभव कमी आला .त्या आधी फेस बुक वर युके मध्ये असणारे माझे सहकारी ज्यांच्याबरोबर मी तेथे शिकलो. नोकरी केली .त्याच्याबरोबर फेस बुक वर आमचे घोषणा युद्ध सुरु होते .एका उत्साही मित्राने चक्क दुसर्या महायुद्धाची पुनरावृत्ती करू .असे आवेशात लिहिले होते (पुढच्या वर्षी तो इंग्लिश पासपोर्ट साठी अर्जी देणार होता. ) मी पण लगेच आधी मंदीतून बाहेर या असा शेलका शेरा दिला. होता. निम्मित होते जर्मनीने मंदीतून बाहेर पडत असल्याचा इशारा दिला होता. .तर प्रत्यक्ष सामने सुरु झाले .त्या आधी आम्ही एक लिटरचा महाकाय बियर ग्लास घेऊन बसलो होतो व ग्लासात होती स्थानिक कलोन ची बियर कुल्श . सामना म्हणावा तसा रंगला नाही. कारण सुरवाती पासून जर्मनी गोल चढवत गेला .प्रत्येक गोल सोबत एक लिटर डाउन होत होतो .. लोक तर नुसता कल्ला करत होते घोषणा देत होते ..त्यांना एक चेव चढला होता .आणि बियर बरोबरच कदाचित इतके दिवस पराजित झाल्याचा शिक्का घेऊन जोमाने प्रगती करत युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असे मनाचे बिरूद मिरवणारे जर्मन आपली खुन्नस काढत होते .माझ्या डोळ्यासमोर जालियानवाला पासून अनेक विचार क्षणार्धात येऊन गेले ..बियर संगीत वूवूझेला व संगतीला समूहातील बेभान घोषणा ह्यांचा उन्माद चढला होता. शेवती विजय घटिका आली .आणि मग स्टेडीयम चे छत उघडले व आतिषबाजी सुरु झाली .ह्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण स्टेडीयम मध्ये एवढ्या मोठ्या जमावासाठी अगदी मोजके सुरक्षा कर्मी तैनात होते .त्यांना सुद्धा फारसे काम करावेसे लागले नाही कारण सार्वजिक ठिकाणी वागण्याची शिस्त ह्या लोकांना शाळेतच मिळते .रांगेचा फायदा सर्वाना असे न लिहिता सर्व रांगेतून बाहेर पडत होते .मात्र बियर ग्लास ची अमानत रक्कम २ युरो हि ग्लास परत देऊन घ्यायची असते .ती देण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याने व तरुण मंडळी मात्र रस्त्यावर जाऊन दंगा करायला एवढी आतुर झाली होती. कि हे ग्लासेस खाली टाकून निघून गेले .मी खाली उतरताना किमान ५ ग्लास वेचले. (आमच्या दोघांच्या ग्लासा शिवाय ) प्रत्येक ग्लास म्हणजे २ युरो म्हणजे लक्ष्मी .मी बायकोला म्हंटले आमच्या संस्कृतीत लक्ष्मीला पायदळी नाही तुडवत .मी त्या ग्लासांना एका मिनिटात त्यांच्या स्वगृही पोहचवतो . असे म्हणून दहा युरोची नोट घेऊन परत आलो ..नाही तरी खाद्य व द्रव पदार्थावर २० युरो खर्च झाला होता .बाकी रात्री कलोन शहरात आतिषबाजी चालली होती. .लोकांचे थवे त्यात महिला व माणसे समप्रमाणात होते ते रस्त्यावर जल्लोष साजरा करत होते. .गाड्यातून झेंडे फडकवत जात होते .आम्हाला काही तर ओळख ना पाळख पण रस्त्यात भेटून गळाभेटी करत होते ..आम्ही एका बार मध्ये थांबलो एका वयोवृद्ध स्त्री पुरुषांनाच्या समूहाने आमचा अवतार पाहून कदाचित खुश होऊन निमंत्रण दिले . .मी परकीय असून सर्वांगावर जर्मन निशाण्या घेऊन होतो. ह्याचे त्यांना खूप कौतुक वाटले .आस्थेने चौकशी केली .भारतातून म्हटल्यावर एकच प्याला मोफत पाजला ..रात्रीचे कलोन खूपच चिकणे दिसत होते ,मग रायन नदी काठी बसून गप्पा मारून जर्मन स्ट्रीट फूड खाल्ले नि घराकडे वळते झालो . समाप्त .

Book traversal links for जर्मन आख्यान दास्ताने फुट बॉल वल्ड कप भाग २

  • ‹ जर्मन आख्यान दास्ताने फुट बॉल वल्ड कप भाग १
  • Up
  • जर्मन आख्यान ख्रिसमस मार्केट भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3382 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

मनोरंजक लिहीले आहे. पहिलाच

नगरीनिरंजन
Mon, 12/06/2010 - 21:13 नवीन
मनोरंजक लिहीले आहे. पहिलाच प्रयत्न असूनही बर्‍यापैकी शुद्ध लिहीले आहे. बेंड च्या जागी बँड लिहायचे असल्यास bEMD असे लिहावे किंवा ब्यांड असे लिहावे. छायाचित्रे लेखातच टाकली तर उत्तम! पुलेशु.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 04:08 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा