"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता.
""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्यात एक टप्पल मारली.
""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!''
""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु. त्याला पुन्हा दटावली.
""आणि ज्या प्रश्नाच्या उत्तरावर ती जिंकली, तो वाचलात का तुम्ही बाबा?''
""नाही चिरंजीव! आपणच सांगा!'' आता बाबांनीही परिसंवादात उडी घेतली होती.
""तिला विचारलं, दिवसातली सगळ्यात आवडती वेळ कोणती, तर म्हणते सूर्योदयाची!''
""बरोबर आहे, सकाळी सकाळी पोट साफ झालं, की दिवस कसा छान जातो!'' श्री. कुरकुरेंनी आरोग्य, आहार, संतुलनाची टेप लावली.
""शी बाबा! तुम्ही पण काय बोलता?'' कु. पुन्हा कुरकुरली, तशा चि. कुरकुरेंना उकळ्या फुटल्या.
""आज आईसाहेबांच्या काही एक्स्पर्ट कमेंट्स नाहीत का?'' चि. नं आता आईला वादात ओढलं.
""अरे ती निकोल का कोण ती...तिला म्हणं आमच्या घरातला पसारा एकदा आवरून बघ. सगळं सौंदर्य काळवंडेल तिचं!'' चिरंजीवांचं निमंत्रण स्वीकारून सौ. कुरकुरेही आता मैदानात उतरल्या.
""जाऊ दे, जाऊ दे. भांडण नको. ती तिकडे जिंकणार, मग गावभर फिरणार, मुलाखती देणार, समाजसेवेच्या गप्पा मारणार...आपल्याला कशाला चिंता?'' श्री. कुरकुरेंनी कधी नव्हे ते शांतीपथावरून मार्गक्रमण सुरू केले.
""बाबा, आणखी एक जोक वाचला का? ती बंगलोरमधल्या सायकल रिक्षा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करणारेय. प्रदूषण टाळण्यासाठी!''
""भले शाब्बास! या नटव्यांच्या डोक्यातलं समाजकार्याचं प्रदूषण कमी केलं पाहिजे आधी!'' सौ. कुरकुरे पुन्हा फिस्कारल्या आणि भाजी करपल्याचा वास आल्यानं पुन्हा स्वयंपाकघराकडे पळाल्या.
सौंदर्याचा `अर्थ'
वाचने
3861
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
घोर निराशा केलीस रे अभिदा
घोर निराशा केलीस रे अभिदा !
मला वाटले तु ह्या 'सौंदर्याचा' काही 'अर्थ' वगैरे समजावुन सांगीतल असशील.
असो...
कुरकुरे चा तडका देखील आवडलाच म्हणा.
...
In reply to घोर निराशा केलीस रे अभिदा by परिकथेतील राजकुमार
आयला! ही कोण बया? कुणीतरी दाक्षिणी वाटतेय.
खरं का?
अरे ही आपली सूर्यवंशम ची
In reply to ... by आपला अभिजित
अरे ही आपली सूर्यवंशम ची हिरवणी आहे रे.
शनिवारी पाहिला वाटतं. तुझ्या
In reply to अरे ही आपली सूर्यवंशम ची by परिकथेतील राजकुमार
शनिवारी पाहिला वाटतं. तुझ्या परीक्षणाची वाट पाहत होतो.
आजकाल...
In reply to अरे ही आपली सूर्यवंशम ची by परिकथेतील राजकुमार
ही सौंदर्या स्वर्गात असते. अप्सरांना कांपिटीशन देतीय म्हणे..
परयाचा नाद करायचा न्हाय!
In reply to घोर निराशा केलीस रे अभिदा by परिकथेतील राजकुमार
परयाचा नाद करायचा न्हाय! ह्त्यार घेउन नेहमि सज्ज अस् तो परया :)
स्पेशल!
In reply to घोर निराशा केलीस रे अभिदा by परिकथेतील राजकुमार
स्पेशल!
भले शाब्बास अभिजीत! एकदम
भले शाब्बास अभिजीत! एकदम दणका! हे मात्र खर की तिने फोटोज जास्त एक्साइट होउन दिल्या सारखे नाही वाटत.
मी सुरवात पाहिली पण मग तेच तेच अस वाटुन चॅनेल बदलल!
स्टारवर्ल्डवर "चुकुन" ही
स्टारवर्ल्डवर "चुकुन" ही स्पर्धा लाईव्ह पाहण्याचा योग आला. एकूणच सुंद्र्यांची कोलिती सुमार वाटली. विशेषतः मिस अर्थ इंडिया पाहून चि. कुरकुरे म्हणाला तसा तोंडावर हात ठेवला गेला आणि कोणत्या कोनातून ती भारतीय आहे ते पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करताना कार्यक्रम संपला. मिस प्योर्तोरिकोला दिलेले आमचे मत वाया गेले.
असो. बंगलोरात या सगळ्या सुंद्र्या सायकल रिक्षा ओढत आहेत हे रम्य चित्र थोडावेळ डोळ्यासमोरून तरळून गेले पण पाणावयाच्या आतच स्वतःला आवरले.
तुम्ही मात्र अगदी नेमके हवे तिथे बोट ठेवले आहे त्यामुळे गुदगुल्या झाल्या. :-)
अवांतरः कुरकुरे फ्यामिलीचे चकोर फ्यामिलीशी लांबचे नाते असल्याचा भास झाला. पण कुरकुरे फ्यामिली त्यांच्या चर्चाविषयांमुळे आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे जास्त कुरकुरीत वाटते.
सहमत!
In reply to स्टारवर्ल्डवर "चुकुन" ही by नगरीनिरंजन
सहमत आहे!
मुक्तक आवडले...
मुक्तक आवडले... :)
थोडक्यात आवरतं घेतल्यासारखं
थोडक्यात आवरतं घेतल्यासारखं झालं. आणखी थोडंसं लांबवलं असतं तरी चाललं असतं.
हेच म्हणतो
In reply to थोडक्यात आवरतं घेतल्यासारखं by प्राजु
आणखी लिहा! वाट बघतोय.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू