"बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती.
""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं.
""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...''
""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला.
""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय? आम्हाला वाढदिवसाला रोल्स रॉइस काय, साधा जिरा राइस खायला घालत नाही कुणी हॉटेलात!'' सौ. कुरकुरे धुसफुसत म्हणाल्या.
""का? गेल्या आठवड्यातच गेलो होतो ना हॉटेलात? तेव्हा जिरा राइस कशाला, सगळ्यांनी चांगली बिर्याणी चापली होतीत की! एवढ्यात विसरलात?''
""हो! धाकट्या वन्संबाईं आल्या होत्या अमेरिकेहून! तेव्हा आमचं भाग्य उजळलं होतं! उगाच नाही काही! कुणाच्या कोंबड्यानं का होईना, उजाडलं म्हणजे झालं, असं आहे तुमचं!''
""बाबा, कोंबडी पण काय मस्त लागत होती ना त्या दिवशी? एकदम सॉल्लिड!''
""गधड्या, तोंड आवर की जरा! तुझ्या जिभेला काही हाड?'' सौ. कुरकुरे त्याच्या अंगावर वस्सकन ओरडल्या.
""का? हाडं चघळताना नाही जीभ अडखळत तुमची! मग आता तो बोलला तर काय होतंय? ऐकू देत शेजाऱ्यांना काय ऐकायचंय ते!'' श्री. कुरकुरेंनी मघाच्या टोमण्यांचं उट्टं काढलं.
""जाऊ दे. तो विषयच नको. बघू तरी कशी दिसत्येय मान्यता? बाळंतपणानंतर बघितलंच नाही बाई तिला! बाळंतपण चांगलंच मानवलंय नाही? आणि तिची बाळं कशी दिसत नाहीत काखोटीला? आणि हे काय? ओली बाळंतीण ना ही? तशीच फिरत्येय कानाला स्कार्फ वगैरे न बांधता? काय बाई या आया तरी!''
""आई किती चिंता तुला? तिची मुलं सांभाळायला नोकरांची फौज असेल. बाबा, कसलं भारी वाटलं असेल ना मान्यताला? तुम्ही पण अशीच एखादी भेट द्या ना आईला!'' चि. कुरकुरेनं पुन्हा खोडी काढली.
""गाढवा, एकतर अशी एखादी गाडी घ्यायची, तर तुझ्या बापालाच विकावं लागेल. आणि त्या मान्यताला जुळी मुलं झाल्येत म्हणून आनंद साजरा करतायंत ते! आपल्याकडे असं काही निमित्त आहे का आता...?''
कुरकुरीत!
वाचने
3238
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी: खी:
>> आपल्याकडे असं काही निमित्त आहे का आता...? >> :-D
कुरकुरीत!!!
शेवटचं वाक्य वाचून ठसका लागेपर्यंत हसायची वेळ आली.
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत,
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, अभिजित दा!
हेच म्हणतो
In reply to नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, by अनामिक
(सहमत)बेसनलाडू
अगदी
In reply to हेच म्हणतो by बेसनलाडू
असेच म्हणतो.. :-)
लगे रहो अभिजीतदा!!
मस्तच
In reply to अगदी by दिपक
ह्या कुरकुरेंचं खरं आडणाव प्रभु तर नाही ना ? ;)
-(घरशणाकरशणकार) टारझन
मस्तच
आई किती चिंता तुला ....
माझी मावशी एकदा म्हणत होती .... त्या ऐश्वर्या चे वय ३६ झाले तरीहि तिला मुले नाहित... कसे काय अमिताभ बच्चन ऐकुन घेतो.... आता काय म्हणायचे .... कपाळावर हात मारुन घेतला
(विषय दिलेला नाही)
In reply to मस्तच by गौरीदिल्ली
:D :-D :lol:
छान !!
छान !!
मस्त लेखन...
मस्त लेखन... ;)
मस्त !
मस्त !
असेच
असेच म्हणतो. ऐश्वर्याला आता मुले कधी होणार, त्यांचे पोलिओ, ट्रिपल, गोवराचे डोस कधी देणार, त्यांना शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी रांगेत आजोबा बच्चन स्कार्फ गुंडाळून विग सावरत रांगेत कसे उभे राहाणार, त्या मुलांना 'स्टँडिंग लाईन्स, स्लीपिंग लाईन्स' कोण शिकवणार, त्यांचे प्रोजेक्ट कोण करुन देणार, हा वैश्विक चिंतेचा विषय झालेला आहे.....
गुणाची हो मान्यता
गुणाची हो मान्यता! तिने जुळी जन्माला घालून रोल्स रॉईस पर्यंतच मजल मारली आणि संजूबाबाचे पैसे वाचवले. ;) त्या संजूबाबाने आमच्या केट गॉसलिनशी लग्न लावलं असतं तर काय झालं असतं देव जाणे!
धन्यवाद...
सर्वच प्रतिक्रियांबद्दल!
तुम्हालाही मान्यता, ऐश्वर्या, आणखी कुणी साळकाया माळकायांच्या बाळंतपणाची, बाळांची काळजी आहे, हे बघून काळीज भरून आलं!
लय भारी चाबूक शिल्पाला
लय भारी चाबूक
शिल्पाला वाढदिवसानिम्मित जगातील सर्वात उंच इमारतीत एक आख्खा मजला तिच्या नवर्याने भेट म्हणून दिला .
आता दुबईत जाऊन ती म्हणत आहे .उंच माझा झोका ग