Skip to main content

मोदी निर्दोष

मोदी निर्दोष

Published on 03/12/2010 - 18:16 प्रकाशित मुखपृष्ठ
गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी २००२ च्या दंगलीत निर्दोष आहेत असे एस आय टी ने कबुल केले आहे. त्यांच्या विरुद्ध काही पुरावा एस आय टी ला मिळाला नाही. अधिक माहिती - http://www.rediff.com/news/report/guj-riots-sits-clean-chit-to-modi-vindicates-bjp/20101203.htm गुजरात विकासाचे शिल्पकार श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

याद्या 5223
प्रतिक्रिया 34

In reply to by परिकथेतील राजकुमार

थत्ते चाचा हल्ली जाम बिज्जी असावेत. फक्त +१ सहमत अशाच प्रतिक्रिया देत आहेत. "तिथे" मशिद नाही मंदिरच होते... या निकालापासुन येणार्‍या वेगवेगळ्या अशा बातम्यांनी विचलीत झाल्याने ते आणि त्यांची मित्रमंडळी विपश्यना वगैरे करत असावेत असा अंदाज आहे.

In reply to by नितिन थत्ते

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असल्याने, जर बातमी खरी असली तर आपले देखील अभिनंदन! ;)

आत्ता कसंऽऽ..... आता बघुया पुढं आणखी काय काय होतंय ते. बर्‍याच जणांचे जीव तळमळले असतील :D महिन्या-दोन महिन्यांच्या अंतरानं दोन बातम्या अशा विरोधातल्या पाहून अगदी दे माय धरणी ठाय अवस्था झाली असेल.

अरेरे, काय बातमी ही. आधीच काँग्रेसला बिहारचा पराभव कच्चुन टोचला असेल, त्यात तुम्ही आता अशी अजुन 'टोचणारी' बातमी देताय. बाकी इतर विचारवंताचे म्हणणे ऐकण्यास उत्सुक. आता गुजराथेत कोणत्या तोंडाने जाणार विरोधक ? विकास ... त्ये तर मोदी लै भारी करतो हो ! - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आता गुजराथेत कोणत्या तोंडाने जाणार विरोधक ? काळ्या ;) विकास ... त्ये तर मोदी लै भारी करतो हो ! लै भारी

अनादिसिद्ध हें आघवें ... होत जात स्वभावें ...ते .....शिला कि जवानी....ते...मोदी निर्दोष विविध विषय लिलया हाताळणा~या आपल्या प्रतिभेस सलाम

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मोदींनाही वेलकम बॅक! पण त्यांनी "झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या.." वगैरे अटी काही मान्य केल्याचे ऐकले नाही... ;) असो, अजून हे अधिकृत नाही. हा अहवाल फोडला गेला आहे. तुर्तास इतकेच. - (महाराष्ट्राचा) विकास

मोदींचे अभिनंदन. भगत सुटले,जगदीश टायटलर सुटले आता हेही सुटले.मस्तच.

In reply to by चिरोटा

भेंडीबझार यांच्याबरोबर सहमत आहे. :-)

In reply to by चिरोटा

मोदींचे अभिनंदन. भगत सुटले,जगदीश टायटलर सुटले आता हेही सुटले.मस्तच. लवकरच अशोकराव सुटतील, कलमाडीदेखिल सुटतील! येडियुरप्पा पकडले आणि सुटले की पकडलेच नाहीत याबाबत मी गोंधळात आहे! बाकी पवारसाहेब आणि अडवाणी हे उच्च्स्तरीय! त्यामुळे त्यांच्याबाबत नुसताच धुरळा उडतो. बाकी काही नाही! एकंदरीत सगळे आलबेल!

In reply to by सुनील

लवकरच अशोकराव सुटतील, कलमाडीदेखिल सुटतील! येडियुरप्पा पकडले आणि सुटले की पकडलेच नाहीत याबाबत मी गोंधळात आहे!
त्यावेळेस 'कलामाडी निर्दोष' असाही धागा मिपावर येइल ..

In reply to by आमोद शिंदे

कलमाडींचे (राजकीय) वजन बघता ते जर या म्हणजे राष्ट्रकूल प्रकरणात पडले तर भले भले त्यांच्याबरोबर पडू शकतील असे वाटते... कारण राष्ट्रकूल स्पर्धेच्या बांधकाम आणि व्यवस्थापनात दिल्ली सरकार (शीला दिक्षित) आणि केंद्र सरकारातील काही मंत्री हे अधिकृतरीत्या निर्णय घेण्यासाठी जबाबदार होते.

In reply to by सुनील

जर एस आय टी चा निष्कर्ष खरा असला आणि अधिकृत असला तर तो मोदी विरोधी (केंद्र) सरकारच्या कारकिर्दीत घेतलेला असेल... तसेच मला कल्पना नाही की भगत-टायटलर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एस आय टी वगैरे ठेवली गेली होती का ते...

In reply to by सुनील

सुनीलशी सहमत + ३

श्री.नरेन्द्र मोदी संदर्भात हा धागा काढला आहे, ते ठीक आहे, पण निव्वळ रेडिफच्या बातमीवर विश्वास ठेऊन सरसकट 'क्लीन चीट मिळाली' असे अनुमान काढणे थोडेसे घाईचे होईल असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण जोपर्यंत सुप्रीम कोर्ट अपेक्स कोर्टाचे 'रेकमेंडेशन' स्वीकारत नाही (लक्षात घेणे गरजेचे आहे की, अपेक्स कोर्टाला फक्त ज्या कारणासाठी त्यांची स्थापना केली होती त्या 'फाईंडिन्ग्ज' चा अहवाल द्यायचा असतो ~ शिक्षाही देता येत नाही वा सुटका करा असेही सांगता येत नाही ~ व तीवर आधारित सुप्रीम कोर्ट निर्णय घेत असते.....अपेक्सची स्थापना सुप्रीम कोर्टच करत असल्याने...). खुद्द भाजपचे प्रवक्ते श्री.अरूण जेटली यांची प्रतिक्रिया बोलकी (आणि तितकीच सावध....) आहे हे इथे लक्षात घ्यावे. ते म्हणाले..." एसआयटीने आपल्या अहवालात काय म्ह्टले आहे याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. हा विषयच मुळी सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत आहे, तरीही माध्यमे जे काही याबाबत म्हणत आहे, ते जर सत्य असेल तर त्या अहवालाने आमच्या भूमिकेला न्याय दिला असेच आम्ही म्हणतो." येथील श्री.जेटलींचा सावध पवित्रा पाहण्यासारखा आहे..."माध्यमे म्हणत आहेत....आम्ही नव्हे..." ~ हा आहे सुप्रीम कोर्टाचा आदर राखण्याचा एक प्रयत्न जो श्री.जेटली सारख्या या क्षेत्रातील तज्ज्ञाला निश्चितच माहित असतो. सबब अजून जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे त्या अहवालावर मंजुरीचे सील उमटत नाही तोपर्यंत आपणही इथे घाईघाईने 'कन्क्लुजन' काढू नये असे वाटते. अर्थात माझे हे मत श्री.नरेन्द्र मोदीना विरोध वगैरे बालिश नसून कोर्टाच्या पद्धतीविषयी माहिती देणे इतपतच आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रा-जी, ही एक गमतीदार बातमी तुमच्या ३ डिसेंबरच्या प्रतिसादाला लेट कट मारते असे वाटले म्हणून खाली देत आहे. (ई-सकाळवरून मी 'कॉपी-पेस्ट' केलेली आहे) दरम्यान, मोदींबाबतच्या निकालाने भाजपच्या "डी-फोर' गटाचे अरुण जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू व अनंतकुमार अस्वस्थ आहेत. मोदी दिल्लीत आले तर त्यांची लोकप्रियता व करिष्मा यांच्या पासंगालाही पुरणारा नेता (काही प्रमाणात स्वराज यांचा अपवाद वगळता) या चारमध्ये नाही. त्यामुळे नितीशकुमार यांच्यासारखा मोदी यांना पर्यायी चेहरा, मग तो भाजपमधील नसला तरी त्यांची महती पुन्हा हे नेते आपल्या दरबारात सध्या रंगवून सांगतात. "एसआयटी' अहवालावर जेटली यांनी हा भाजपचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांची अस्वस्थ देहबोली व चेहरा बरेच काही सांगून जात होता. स्वराज यांनी नुकतेच बिहारमध्ये मोदींबाबत टोकाचे विधान करून "आपले मत' सांगून टाकले आहे. दिल्लीत बसून कर्नाटकात वादळ निर्माण करणारे अनंतकुमार यांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा अस्मान दाखवले आहे. वेंकय्या नायडू यांना मोदी हा विषय निघाला की, गाडीत बसून निघून जाण्याची घाई होते. हे सर्व चित्र दिल्लीत दिसत असल्याने मोदींबाबतच्या निकालावर अधिकृतरीत्या स्वागत; मात्र, खासगीत अस्वस्थता व चेहरे पाडून प्रतिक्रिया देणे, असे एकंदर चित्र भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये सध्या दिसत आहे.

In reply to by सुधीर काळे

"....लेट कट...!" थॅन्क्स सुधीर जी....कसे कोण जाणे, पण ई-सकाळची तुम्ही दिलेली ही बातमी माझ्याकडून हुकली. पण आता ठीक आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे सुषमा स्वराज याना दिल्ली परिसरात थोडाफार मान आहे, नावाचा करिष्मा जरी दिल्ली विधानसभासमयी कामी आला नसला तरी उच्चपदस्थांच्या वर्तुळात त्यांची ( व काही प्रमाणात शहानवाझ हुसेन) उपस्थिती अनिवार्य मानली जाते. उत्तम आणि फर्डे वक्तृत्व ही त्यांची एक खासियत आहे. प्रभावी हिंदी आणि इंग्रजी संभाषणात त्या जेटली यांच्यामागोमाग बीजेपीकडे (सध्यातरी...) त्याच असल्याने पक्षाला त्याना दुर्लक्षून चालत नाही. एसआयटी रीपोर्टवरील सावध प्रतिक्रिया देण्यामागे सुप्रीम कोर्टाचा आक्षेप टाळणे याबरोबरच कोणत्याही स्थितीत "मोदी" नाव दिल्लीच्या हवेत घ्यायचे नाही असा एक अलिखित दंडक दिल्लीस्थित बीजेपी दुसर्‍या आघाडीतील शिलेदारांचा आहेच आहे...जे बातमीत थेट म्हटले गेले आहे. म्हणूनच "एसआयटीचा रीपोर्ट हा सीलबंद असताना त्यातील उतारे फुटलेच कसे?" अशी मागणी करणार्‍या सीपीआयच्या वृन्दा कारत याना बीजेपीने अजून हटकलेले नाही ही बाबही लक्षणीय आहे. इन्द्रा

In reply to by वेताळ

मला ललित मोदी वाटले. ते आता कधी सुटतात ह्याची वाट आम्ही बघत आहे. का का का? काही पेट्या पाठवणार होते का तुझ्याकडे??????? ;)

भारताच्या भावी पंतप्रधानांचे अभिनंदन. ही बातमी खरी ठरो व ’पोकळ पुरुषां’च्याऐवजी एक’’पोलादी पुरुष’ आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभो हीच देवाकडे प्रार्थना.