अंधश्रद्धा-गोष्ट-४
अंधश्रद्धेचा उगम
काही दिवसांपूर्वी मुंबईची एक बातमी आली होती. नवरा-बायको, त्यांची दोन लहान मुले व मुलांच्या दोन आत्या एका ठिकाणी रहात होत्या. दोन आत्यांपैकी एकीच्या अंगात दैवी तर दुसरीच्या अंगात आसूरी शक्ती वावरत होती.. सगळ्यांचा यावर विश्वास. यावर उपाय म्हणून आत्याने त्या दोन लहान मुलांना आई-वडिलांच्या समोर मारले, ठार मारले! त्यावेळी आई-वडिलांनी विरोध केला नाही. अविश्वसनीय पण सत्य घटना. अंधश्रद्धा सारासार विवेकावर मात करतेच पण आई-वडिलांचे मुलांवर असलेले प्रेमही तिच्यापुढे हतबुद्ध ? अंधश्रद्धा जगभर आहे, सर्व धर्मांत आहे, अशिक्षित-सुशिक्षित दोघांतही आहे. किती पुराणी आहे ही अंधश्रद्धा ? तशी ती मानव जमातीच्या सुरवातीपासून असणारच, पण लेखी स्वरूपात ?महाभारतातील एक गोष्ट आज पाहू. (महाभारत, वनपर्व,तीर्थयात्रापर्व, अ. १२७-१२८.)
सोमक नावाचा एक धर्मनिष्ट राजा होता. त्याला सारख्या अशा शंभर भार्या होत्या. पुष्कळ काळ लोटला पण त्याला मुल झाले नाही. त्याने देवताराधनादिक मोठेमोठी प्रयत्न केले. नंतर त्याला जंतू नावाचा एक पुत्र झाला. सर्व बायका मुला सभोवतीच वेळ घालवू लागल्या. सर्वांचे पुत्रावर अतिशय प्रेम होते. एके दिवशी जंतूला बरगडीच्या खालच्या बाजूस एल मुंगी चावली. त्याने दु:खाने किंकाळी फोडली. त्या सर्व माता त्याच्या भोवती उभ्या राहून मोठ्याने आक्रोश करू लागल्या. तो ध्वनी राजदरबारापर्यंत पोचला. राजाने तातडीने अंत:पुरात जाऊन सर्वांचे सांत्वन केले. पुढे दरबारात येऊन तो ऋत्विज व अमात्य यांच्यासमोर म्हणाला " धिक्कार असो या एकपुत्रपणाला ! त्यापेक्षा निपुत्रिकपणाच परवडला. आता या स्त्रीयांचे आणि माझेही वय निघून गेले आहे. तेव्हा असे एखादे कर्म असेल तर सांगा की ज्या योगाने मला १०० पुत्र होतील. मग ते कर्म लहान, मोठे, दुर्धर कसेही असो." ऋत्विज म्हणाला :- "असे कर्म आहे. ते करण्यास तू समर्थ असशील तर तुला सांगतो. "
राजा म्हणला,"मला शंभर पुत्र होणार असतील तर ते मी केलेच असे समजा."
ऋत्विज म्हणाला :- " हे राजा, मी एक यज्ञ करितो आणि त्यामध्ये तू या जंतूचा होम कर.जंतूच्या वपेचा होम होऊ लागला असता त्याच्या मातांनी त्या धूम्राचे अवघ्राण करावे म्हणजे त्यांना शंभर पुत्र होतील. जंतूच्या सांप्रत मातेपासून तो पुनरपि उत्पन्न होईल व त्याच्या बरगडीखाली सुवर्ण चिन्ह असेल."
राजाने त्याप्रमाणे यज्ञ केला. ऋत्विज जंतूचा बळी देण्यकरिता त्याचा हात धरून त्याला घेऊन चालला तेव्हा मातांनी आक्रोश करत त्याचा दुसरा हात धरून खेचाखेची केली पण त्याचा उपयोग झाला नाही. ऋत्विजाने जंतूचा वध करून त्याच्या वपेचा होम केला. त्या गंधाचे अवघ्राण करून त्या स्त्रीयांचे ठिकाणी गर्भ राहिला व दहा महिन्यांनी सोमकाला शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. त्यापैकी जंतू हा ज्येष्ट; पूर्वीच्याच आपल्या मातेच्या उदरी त्याचा जन्म झाला व त्याच्या बरगडीच्या खाली एक सुवर्ण चिन्ह होते.
पुढे सोमकाचा गुरू परलोकवासी झाला व काही कालाने सोमकही परलोकास गेला. त्याला आपला गुरू नरकात अग्नीत शिजत असलेला दिसला. त्याने कारण विचारले तेव्हा गुरू म्हणाला "मी तुझ्याकरिता यज्ञ केला त्याचे हे फळ भोगत आहे." तेव्हा सोमक यमधर्माला म्हणाला "माझ्याकरिता याने यज्ञ केला, मी फळ भोगतो, त्याला सोडून द्या ." यम म्हणाला, " तसे नाही, एकाच्या कर्माकरिता दुसर्याला फळ मिळणार नाही." सोमक म्हणाला, "ठीक आहे, मलाही गुरूशिवाय पुण्यसंपन्न लोकाची इच्छा नाही. मीही कर्म केले आहे, मी त्याच्याबरोबर फळ भोगतो." त्याप्रमाणे दोघांनीही नरकयातना भोगल्या व नंतरच त्यांची तेथून सुटका झाली.
या अन्निसवाल्यांना किती जुनाट व चिवट अंधश्रद्देशी सामना करावयाचा आहे कळले कां ?
शरद
याद्या
5371
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
कथेतुन मिळालेला संदेश -
+१
In reply to कथेतुन मिळालेला संदेश - by अवलिया
+१
In reply to कथेतुन मिळालेला संदेश - by अवलिया
+१
In reply to कथेतुन मिळालेला संदेश - by अवलिया
बापरे!!! ती मुंबईची बातमी
सुन्नबधिर करणारी गोष्ट. असंच
भयानक
अन्धश्रद्धा बाळगणारे सुशिक्षित लोक
आपण कोण?
In reply to अन्धश्रद्धा बाळगणारे सुशिक्षित लोक by डिजेबॉय
मी