नारळाचे सान्दण
साहित्य :
१ वाटी रवा
३/४ वाटी नारळाचे दूध
२ - ३ चमचे किसलेला गूळ
चिमूटभर वेलची पूड
चिमूटभर केशर दूधामधे भिजवून
चिमूटभर खाण्याचा सोडा
कृती :
एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या. सगळ्यात शेवटी त्यामधे सोडा घाला.
मग कूकर च्या भान्ड्याला तूपाचा किन्वा लोण्याचा हात लावून घ्या. तयार मिश्रण भान्ड्यामधे ओतून कूकर मधे शिट्टी काढून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या.
वड्या पाडून नारळाच्या किन्वा साध्या दूधाबरोबर खा.
याद्या
3515
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
छान
दूध
फोटो?????????????????????????
मस्तच!
मस्तच!! धनंजय यांनीही २
व्वा!
खुप दिवस ऐकुन होते आज कृती
या मध्ये आंब्याचा रस घालून पण