Skip to main content

मुशर्रफना व्हिसा नाकारुन केन्द्र सरकार ने योग्य केले आहे .

मुशर्रफना व्हिसा नाकारुन केन्द्र सरकार ने योग्य केले आहे .

Published on 02/12/2010 - 21:14 प्रकाशित मुखपृष्ठ
मुशर्रफ सारख्या भारताविरुध्द नेहमीच गरळ ओकणारया माणसाला केन्द्र सरकार ने व्हिसा नाकारुन फार उत्तम काम केले. भारतात येउन आपल्याच राजकरण्यानना हा माणुस सल्ला देउन जातो व आपल्या नेत्यान्ची गोची करुन जातो असे मला नेहमी जाणवले. काही दिवन्सापुर्वि तर मुशर्रफने कबुलीसुध्दा दिली की कारगिलचा कर्ता करविता मीच होतो. अशा परीस्थीतित आपल्या सरकारने कधी नव्हे ते एक चान्गले काम कुथलाही घोळ न घालता केले. पाकिस्तान मधे वाटेल ते करुन परतण्यासाथी हा माणुस काहिहि करु शकतो. मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की. आपल्या सरकारला अनेक धन्यवाद

याद्या 5113
प्रतिक्रिया 35

मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की. "मिडीयावाल्यांची एक मोठी संधी गेली" असेच वाटते...

कोनकोन्त्या फडतूस कारणासाठी तूम्ही चर्चा करताय राव.... शूट अ‍ॅट साइट... अथवा रेड कार्नर की काय ती नोटीस काढा त्या **व्यासाठी मग थोडी चर्चा करूकी, त्याच्या मूस्क्या बांधा आधी आणी कसाब सोबत त्याला पण लटकवा, मुम्बै काय कार्गील काय सगळीकडे न्याय एकच पाय्जे. एव्हडी मीजास दा़खवून अजूनही त्या हराम्खोराचे नाव अजून दहशवादी म्हणून का नाही घेतले जात ? तो म्हणतो करगील मी केले आण तूम्ही त्याला फक्त विसा नाकारून गप बसता ? असे इस्त्राइल वागेल काय? विसा नाकारला म्हणजे काय मोठी मर्दानगी दावली व्हय ..? नपूंसक साले.

In reply to by सुनील

मुशर्रफ महाहलकट होता हे तर नक्कीच.पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटीपासून (२००७ पासून) पाकिस्तानात काय होत आहे हे तर समोरच दिसत आहे.त्याने स्वत:ची सत्ता टिकवताना केलेल्या प्रकारांमुळे पाकिस्तानीच एकमेकांना मारू लागले.त्या परिस्थितीत इस्त्राएल सरकारला काय खुद्द भारत सरकारलाही मुशर्रफच सत्तेवर असावा असे वाटले तर त्यात काही नवल नाही.

In reply to by सुनील

इस्त्राइलवर मीच हल्ल केला असे छातीठोकपणे सांगणार्र्या लोकाबाबत इस्त्राइल फक्त विसा नाकारून शेपूट घालून बसेल काय. बाकी चालूच आहे....

In reply to by आत्मशून्य

यासर अराफतने हे कधीच अमान्य केले नव्हते तरी त्याच्याशी इस्रायली पंतप्रधानांनी चर्चा केल्या होत्या. असो, माझा आक्षेप उठसूठ इस्रायलचे उदाहरण देण्याला होता.

In reply to by सुनील

मग भारताने ह्या दहशतवाद्यांवीरूध्द्च्या लढाइत स्वतःचे वैयक्तीक उदाहरण कायम करावे जे इस्त्राइला मार्गर्द्शक ठरेल. आफ्टर आल महासत्ता हे बीरूद काय नूसते चाटाय्चे आहे काय?

In reply to by सुनील

मुशर्रफ तर 'बुशर्रफ'चा लाडका भाऊ होता व त्यांनी मुशर्रफला राष्ट्राध्यक्षपदी कायम ठेवण्यासाठी अनेक कोलांट्याउड्या व कसरती केल्या. मूर्ख अतिरेक्यांनी बेनझीरबाईंना ठार नसते केले तर तो आज राष्ट्राध्यक्षपदावर दिसलाच असता! पण इस्रायलच्या मुशर्रफप्रेमाबद्दल मात्र वाचले नव्हते. तुमचा दुवा वाचून पहातो आता.. धन्यवाद!

In reply to by आत्मशून्य

कारगीलचा आर्किटेक्ट मुशर्रफच आहे हे भारत सरकारला आधीच माहित होते. तो चीनला गेलेला असताना त्याचे पाकिस्तानातील एका लष्करी अधिकाऱ्याबरोबर झालेले फोनवरील बोलणे आपल्या सरकारने टॅप करून कारगीलमागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे (मुशर्रफ त्यावेळी लष्करप्रमुख होता) हे सिध्द करायचा प्रयत्न केला. तरीही दोन वर्षातच त्याला चर्चा करण्यासाठी भारतात बोलावले आणि राष्ट्रपती भवनात मानवंदना दिली.मुशर्रफ जन्मला ती नेहरावाली हवेली जुन्या दिल्लीत आहे. तो हवेलीच्या भेटीस यावा म्हणून हवेलीच्या सध्याच्या मालकाने मुद्दामून त्याला आमंत्रण पाठवले.ती हवेली ज्या भागात आहे तिथले आमदार शोएब इक्बाल आणि खासदार विजय गोयल यांनी चांगली बडदास्त ठेवली होती असे वाचल्याचे आठवते.आग्रा परिषदेसाठी आपल्या राज्यात आलेल्या "प्रमुख पाहुण्य़ासाठी" उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी खास मेजवानी आयोजित केली.आग्र्याहून त्याने केलेल्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात झाले आणि त्याचा आपल्या सरकारला पत्ता नव्हता.आणि त्या पत्रकार परिषदेत त्याने काश्मीरात स्वातंत्र्यलढा सुरू आहे अशी जी मुक्ताफळे उधळली ती आपल्या सगळ्या पत्रकारांनी निमूटपणे ऐकून घेतली. एकही त्याच्या तोंडावर थुंकून बाहेर पडला नाही. हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मुशर्रफला भेटू नये असे आपल्या सरकारने म्हटले तरीही ते नेते आपल्या नाकावर टिच्चून मुशर्रफला बंद दाराआड भेटले. त्यावेळी एकाला तरी कारगील आठवत असेल का हो?सैन्याधिकाऱ्यांचेही घुसखोरीकडे दुर्लक्ष झाले ही सत्य परिस्थिती आहे.पण युध्दात मारले गेलेल्या सामान्य सैनिकांना सगळेच विसरले का?सौरभ कालिया आणि त्याच्याबरोबरच्या ५ सैनिकांना "संभाजीराजे" स्टाईलमध्ये मारले त्यांचा सगळ्यांना विसरच पडला का? असो. लिहावे तितके थोडे.

In reply to by क्लिंटन

अहो क्लिंटन महोदय, "मेहमा जो हमारा होता है, वो जानसे प्यारा होता है..." हे विसरलात का काय? (आपण त्याच्या पुढचे म्हणजे, "जादा की नही लालच हमको, थोडे मे गुजारा होता है" हे मात्र नक्की विसरलो आहोत. ;) ). वास्तवीक असल्या पाहुण्यांना "अतिथी स्लेव्हो भव" केले पाहीजे. असो.

In reply to by क्लिंटन

शत्रूने वार केला तरी त्याला हार घाला हीच आपल्याला मिळालेली शिकवण. आणि जनासामान्यांमधले अनेकजण राजकारण्यांच्या वरताण आहेत. कलेला शत्रूत्व नसते असे गात तिथल्या लोकांना इथे आणुन त्यांचे गोडवे गायले जातातच ना? तेव्हा या कलाप्रेमींना पाक तुरुंगात चुकुन नाव भरकटल्यामुळे गेलेले कोळी आठवत नाहीत. तिथल्या कलाकारांना / खेळाडुंना इथे आणल्यामुळे कला/ क्रिडा जगतात काय उजेड पडला आहे ज्यासाठी आपण सर्व अत्याचार विसरुन त्यांना इथे बोलवावे? समाज काय आणि समाजधुरिण काय कोणालाच खंत ना खेद, आपणच काय ते धुमसत राहतो आणि 'संकुचित' वृत्तिचे ठरतो.

In reply to by सर्वसाक्षी

साक्षी, अरे एक बंदूक घे, आणि घाल ना सर्व गांधीवाद्यांना गोळ्या. उगाच इथे आपल्या मनातली भडास ओकत राहतोस, चीन मधे जाऊन तेच करतोस, इजिप्त मध्ये जाऊनही तेच. त्यापेक्षा एक बंदूक घे, आणि तुझ्या आदर्श भगतसिंघासारख्या सगळ्यांना गोळ्या घाल ! हाय काय अन नाय काय ? असे नॉन-व्हायोलंट पद्धतीने आपले व्हायोलंट विचार व्यक्त करत राहणे ह्याला आम्ही सर्व सामान्य जनता "फ्रॉड" असे संबोधते.

In reply to by मिसळभोक्ता

त्यापेक्षा एक बंदूक घे, आणि तुझ्या आदर्श भगतसिंघासारख्या सगळ्यांना गोळ्या घाल !
भगतसिंघ सगळ्यांना गोळ्या घालायचा??? तपशिलाचे सोडा, पण भावना पोहोचल्या. (बाकी मला पोहोचून काय फायदा म्हणा!)
चीन मधे जाऊन तेच करतोस, इजिप्त मध्ये जाऊनही तेच.
म्हणजे जमेल तसे, मिळेल तसे कधी याकवरून, तर कधी उंटावरून शेळ्या हाकायच्या म्हणा की! (ते 'पर्यावरणाशी मिळतेजुळते घेणे' यालाच म्हणतात काय हो?)

In reply to by पंगा

पंगा, उर्फ टग्या, तू उगाच साक्षीशी जुनी दुखणी काढतोयस. तू आणि मी बरोबर आहोत, साक्षी चूक अहे, हे जगाने मान्य केले आहे. आता तू उगाच चुकीच्या लोकांना का पुन्हा संधी देतोयस ?

In reply to by मिसळभोक्ता

... मी नाही दुखणी काढली, तर चुकीचे लोक काढणार नाहीत, असे वाटतेय का? त्यापेक्षा आपणच काढून चुकीचे मुद्दे मार्गावेगळे केलेले बरे नाहीत काय? (ती 'साधनशुचिता' वगैरे अशाच कशाबद्दल नाही काय?) चुकीचे लोक मी संधी देण्याअभावी अडून राहिले आहेत, असे वाटते काय? बाकी भावना पोहोचल्या.

In reply to by मिसळभोक्ता

असे नॉन-व्हायोलंट पद्धतीने आपले व्हायोलंट विचार व्यक्त करत राहणे ह्याला आम्ही सर्व सामान्य जनता "फ्रॉड" असे संबोधते.
खल्लास!! आजपासून आपण मिभोभाऊंचे फॅन..

आज अमेरिका मोदींना विसा नाकारते पण उद्या जर का ते पंतप्रधान बनले तर अमेरिका नाकारू शकेल? आज मुशर्रफ सत्तेत नाहीत हे ठीक पण उद्या सत्तेत आले तर भारताला त्यांच्याशीच बोलणी करावी लागतील. थोडक्यात हा नॉन इश्यू आहे.

In reply to by सुनील

अमेरिकन माध्यमे ही मोदींच्या भोवती नाचत नाहीत, भारतीय माध्यमे मुशार्रफच्या भोवती फेर धरून असतात. त्यामुळे या माध्यमांची एक संधी गेली इतकेच काय ते वाटते.

In reply to by विकास

अमेरिकन माध्यमे ही मोदींच्या भोवती नाचत नाहीत
थोडक्यात, मोदींना भारतात जसा भाव मिळतो (पॉझिटिव किंवा निगेटिव, Σ|भाव|), तसे इतरत्र कुत्रेही विचारत नाही, असे म्हणायचे आहे काय?

In reply to by पंगा

मोदींना भारतात जसा भाव मिळतो (पॉझिटिव किंवा निगेटिव, Σ|भाव|), त्यांना भारतात प्रसिद्धी माध्यमातून "पॉझिटिव किंवा निगेटिव, Σ|भाव|" भाव मिळतो का? मला काही कल्पना नाही... मुशार्रफला भारतीय प्रसिद्धीमाध्यमांतून भाव मिळतो असे नक्की वाटते. तसे इतरत्र कुत्रेही विचारत नाही, अच्छा म्हणजे मोदींच्या विरुद्ध ओरडणारे (आणि त्या अर्थाने भाव देणारे) हे कुत्र्यापेक्षा देखील कमी आहेत असे म्हणायचे आहे का आपल्याला?

In reply to by विकास

तसे इतरत्र कुत्रेही विचारत नाही,
अच्छा म्हणजे मोदींच्या विरुद्ध ओरडणारे (आणि त्या अर्थाने भाव देणारे) हे कुत्र्यापेक्षा देखील कमी आहेत असे म्हणायचे आहे का आपल्याला?
वरील विधानातून अशा प्रकारचे काहीही सिद्ध होत नाही. किंवा काही सिद्ध होत असलेच, तर ट्रिवियल पद्धतीने का होईना, पण बहुधा याच्या नेमके उलट सिद्ध होत असावे, असे वाटते. (पहा विचार करून. जमले तर. समजावून सांगण्याचा मला विलक्षण कंटाळा आहे. किंवा तेवढे कष्ट घेण्याच्या 'वर्थ' वाटत नाही, म्हणा ना!) हां, आता जागतिक श्वानसंघटनेच्या वतीने माझा जाहीर निषेध वगैरे करण्याच्या हेतूने विचारत असाल, तर गोष्ट वेगळी...
मुशार्रफला भारतीय प्रसिद्धीमाध्यमांतून भाव मिळतो असे नक्की वाटते.
हो मिळतो खरा. नको तेवढा मिळतो. नको मिळायला एवढा. पण लक्षात कोण घेतो? (बाकी, मुशर्रफच्या जमान्यात खुद्द पाकिस्तानी माध्यमांत - वर्तमानपत्रांत वगैरे - मुशर्रफला जाहीर विरोध, टीका वगैरे प्रकार वर्ज्य नव्हते, उलट सर्रास चालत असत, असे आठवते. आणि भारतीय माध्यमांतून मात्र - निदान भारतभेटीच्या वेळी तरी - नको तेवढा भाव. हे म्हणजे ब्रिटिश राजेशाहीचे कौतुक इंग्लंडापेक्षा अमेरिकेत जास्त म्हणतात, त्यातलाच प्रकार वाटतो.)

In reply to by पंगा

(पहा विचार करून. जमले तर. समजावून सांगण्याचा मला विलक्षण कंटाळा आहे. किंवा तेवढे कष्ट घेण्याच्या 'वर्थ' वाटत नाही, म्हणा ना!) बरं बरं "वर्थ" नाही तर "व्यर्थ" आहे... तसे इतरत्र कुत्रेही विचारत नाही (याच्यापुढे लगेच असे वाक्य होऊ शकते:) पण अमुक अमुक विरोधक मात्र (जाब) विचारतात म्हणून मला वाटले आपण अशा विरोधकांना कुत्र्यापेक्षापण कमी लेखता का काय... बाकी माझे म्हणणे मूळ लेखातील, "मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की." या वाक्यासंदर्भात "नॉन इश्यू" या प्रतिसादाला दिले होते. हे म्हणजे ब्रिटिश राजेशाहीचे कौतुक इंग्लंडापेक्षा अमेरिकेत जास्त म्हणतात, त्यातलाच प्रकार वाटतो. सहमत. असेच म्हणणे होते. त्यात उगाच कुत्र्याला गोवून चर्चा "व्यर्थ" भरकटली... असो.

In reply to by सुनील

आज अमेरिका मोदींना विसा नाकारते पण उद्या जर का ते पंतप्रधान बनले तर अमेरिका नाकारू शकेल? काश ऐसा मेरे जीतेजी हो जाय! मोदी पंतप्रधान झाले तर भारताकडे वाकड्या नजरेने पहायची कुणाची हिंमत होणार नाहीं व भारताचा राज्य कारभार गुजरात राज्याप्रमाणे उद्योगवाढीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करेल. जय हो!

मी मूळ मुद्द्यावर परत येतो. "देर आये, दुरुस्त आये" असेच मी म्हणेन! भारताचा ध्वज उलटा लावणे ही पाकिस्तान्यांची ’हॉबी’ आहे. हा मुशर्रफही तसाच उलटा तिरंगा फडकवत आला. अमृतसरला (बहुदा) आल्यावर आपल्या लोकांनी तो सुलटा करायला लावला. खरं तर त्याच वेळी त्याला ’निरोप’ द्यायला हवा होता. पण आपली सारीच सरकारे अशी बोटचेपी का निघतात कुणास ठाऊक!

असो. पण पाकिस्तान मधील कराची मुजरा ही लोककला अतिशय लोकप्रिय आहे असे एकिवात आहे. त्या कलाकाराना तरी निदान भारत सरकारने व्हीसा द्यावा म्हणजे त्या लोककलेचा भारतिय लोकाना लुप्फ ऊठवता येईल.

वेडझवा आहे मुशर्रफ. येवढे पाकिस्तानी बिन व्हिसाचे आणि आमंत्रणाचे सिमारेषेवरुन आतबाहेर करत असतात, त्यांना कोण काय बोलते का? उगाच आपली परवानगी वगैरे मागत बसले की हे असे होते.

राजकीय पद आणि एक सर्वसामान्य व्यक्ती यांच्यात गल्लत करून चालणार नाही. मोदीना व्हिसा नाकारला त्याचे कारण वेगळे होते. ते अमीरेकेत एक व्यक्ती म्हणून जाणार होते. राजकीय पदाधिकारी म्हणून नव्हे. अडवाणी देखील पाकिस्तानात वॉन्टेड आहेत. पण ते तेथे जेम्व्हा एक राजकीय व्यक्ती म्हणून गेले त्यावेळेस पाकिस्तानने त्याना राजकीय व्यक्ती म्हणूनच वागणून दिली होती. मुशर्रफ्फ हे सध्या त्यांच्याच देशाबाहेर परागांदा आहेत. त्याना भारतात येण्याची परवानगी देऊन भारत सरकारला सध्या आस्तित्वात असलेल्या पाक सरकारशी वाकडे घेण्याचे काहीच कारण नाही. मुशर्रफ ना व्हिसा मिळणार नाही हे ठाऊक आहे. स्वत्च्या राजकीय आस्तित्वासाठी त्यांची ही अखेरची धडपड चालली आहे मुशर्रफ्फ येथे आले तर त्यांच्या भेटीला कोणता राजकीय दर्जा द्यायचा हा सरकारला पेच आहे मुशर्रफ येथे आल्यावर त्या भेटीच्या सुरक्षिततेची जबाबदरी भारतसरकारने स्वतःच्या गळ्यात कशासाठी घ्यायची. मुशर्रफ भारताताल्यावर त्यानी जर काही मुक्ताफळे उधळली तर त्यामुळे भारत सरकार अडचणीत येवू शकते.मुशर्रफ हा महाधूर्त आहे. त्याला कोणत्यावेळेस काय बोलावे आनि कशाचा फायदा घ्यावा हे चांगलेच कळते. भारत सरकारने वरील सर्व कारणामुळे ( स्वतःच्या अडचणीमुळे व्हीसा नाकारला) मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर हा या चर्चेत अत्यन्त गैरलागु मुद्दा आहे. त्यावर चर्चा करायची कशाला.