Skip to main content

सोवळ्यात सुतावर पाय?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 29/11/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
सोवळ्यात असताना सुतावर पाय देता येत नाही का? ते का? यामागचा काही संदर्भ किंवा माहिती मिळाली तर हवी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'पांडुतात्यांची निर्जळी एकादशी' या लेखात त्याचा संदर्भ आहे. लेख इथे वाचता येईल.

वाचने 8255
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सोवळ्यात असताना सुतावर पाय देता येत नाही का? ते का?
सोवळ्यात असताना सुतावरूनही स्वर्ग गाठता येऊ नये म्हणून. हे प्रश्न गंभीरपणे विचारलेले आहेत याची कल्पना आहे. मला या प्रश्नांविषयी काहीही कल्पना नाही.

मला वाटते की सोवळ्यात असताना कापूस अथवा त्यापासून बनलेल्या कापडाला / धाग्यांना स्पर्श अलाउड नसतो. म्हणून... बाकी स्वतः सोवळे कधी पाळले नाही म्हणून नक्की कल्पना नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

माझ्या माहितीप्रमाणे सोवळे हे 'रेशीम' ह्या धाग्यापासुन बनते व तो एक नैसर्गिक प्रोडक्ट आहे. बाकी इतर धागे एक तर प्राण्याच्या शरिरावरुन जबरदस्तीने धागे काढुन किंवा मग अ-नैसर्गिकरित्या ( आर्टिफिशयल ? ) बनवले जातात. ह्यामुळे सोवळ्यात असताना फक्त 'रेशीमवाल्या कापडाचा' सोडुन इतर कोणताही स्पर्श चालत नसावा. अर्थात ह्या माहितीत चुक-भुल असु शकते. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

माझ्या माहितीप्रमाणे सोवळे हे 'रेशीम' ह्या धाग्यापासुन बनते व तो एक नैसर्गिक प्रोडक्ट आहे. बाकी इतर धागे एक तर प्राण्याच्या शरिरावरुन जबरदस्तीने धागे काढुन किंवा मग अ-नैसर्गिकरित्या ( आर्टिफिशयल ? ) बनवले जातात.
रेशीम चा धागा बनविण्यासाठी रेशमाच्या किड्याला आपले प्राण गमवावे लागतात. हे प्राण्यांच्या शरिरावरुन जबरदस्तीने केस/धागे काढण्यापेक्षा जास्त क्रुर नाहि का? असो. मला एक अवांतर प्रश्न पडला आहे. सोवळ्यात असतांना मिप्यावरच्या धाग्याचा स्पर्श चालतो का? ;)

In reply to by छोटा डॉन

माझ ज्ञान यथा तथाच आहे. पण एक एंका आली. रेशीम हे रेशमाचा किडा जो कोष विणतो त्या पासुन मिळवतात. म्हणजे एक प्रकारे किटक जन्य. (वर पांथस्तांनी म्हटल्या प्रमाणे ते मिळवताना त्या किड्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते.) 'सुत' हे मुख्यत्वे कपाशी (कापुस) पासुन बनवतात. जे माझ्या मते १००% नैसर्गीक आहे. (निदान रेशीम पेक्षा तरी.) त्यामुळे छोटा डॉन यांचा मुद्दा पटला नाही.

सोवळ्यात फक्त रेशमी वस्त्र परिधान करण्यास परवानगी असते. नैसगीक धाग्याचे असल्याने. त्यात खोड काढायची म्हटली तर देवाला वस्त्रे, वाती मात्र कापसाच्या बर्‍या चालत?;) माझ्या माहेरी सोवळे ओवळे फार असायचे पण आम्ही लहान असताना मुलांपुरती म्हणून त्यात सूट असायची. आम्ही सोवळ्यातल्या आई आज्जीला बिनदिक्कतपणे शिवायचो. नंतर नंतर सोवळे हा प्रकारच बंद केला होता असे आठवते. तोपर्यंत आई आज्जीच्या ठराविक रेशमी साड्या सणावाराच्या आधी धुवून वेगळ्या वाळत घातल्या जायच्या. सोवळे बंद झाल्यावर त्या साड्यांचा उपयोग धुतलेली धान्ये वाळवायला केला गेला.;) कारण ती वस्त्रे बरेचदा धुवून अगदी मऊ झाली होती.

In reply to by रेवती

>>देवाला वस्त्रे, वाती मात्र कापसाच्या बर्‍या चालत? देवाची वस्त्रेही रेशमीच असतात सुती नाही...वाती चालतात कारण त्याचा स्पर्श देवाला होत नाही.

In reply to by मी ऋचा

कापसाचे -०-०-०-०- अशा आकाराच्या माळेसारखे वस्त्र हाताने वळून बनवतात (बहुधा थोडे कुंकू बोटाला लावून) देवाला घालतात ते आठवते. त्याचा स्पर्श देवाला होतो. रेशमी वस्त्र नेहमीच असते का?

Clu pjpjv mUmUCj j फक्त असेच दिसत आहे. म्हणून प्रतिक्रीया राखुन आहे.

लेख अग्निकोल्ह्यात दिसण्यासाठी कॅरॅक्टर एन्कोडिंग बदलायला लागेल कदाचित - वेस्टर्न आय-एस-ओ ८८५९-१ करून पाहा.

In reply to by चिंतातुर जंतू

सही जवाब. कॅरॅक्टर एन्कोडिंग 'वेस्टर्न' वापरून लोकसत्तेतली जुनी पानं दिसतात. तुम्हाला हा प्रश्न का पडला असा प्रश्न पडला आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला हा प्रश्न का पडला असा प्रश्न पडला आहे.
म्हणजे सोवळ्याबद्दलचा का? तो साहित्यिक अंगानं पडलेला प्रश्न आहे. म्हणजे श्री. कृ. कोल्हटकरांचा अन्वयार्थ लावण्याचं काम चालू आहे.

सोवळ्यात कशावरही पाय देउ नये हे स्पष्ट करण्याकरता सुताचा दाखला.

आमच्या घरातील सोवळे ( कद) मला मोठे होत असे. चालताना माझा पाय त्यात अडकत असे. त्यामुळे मला पुजा करताना अडथळा येई. प्रसंगी सोवळे सुटे. वडिलांनी मला मग सोवळ्याच्या वस्त्राची अर्धी चड्डी शिवुन दिली होती. त्याला सोवळ्याचीच नाडी होती. ही सोवळी चड्डी घालून मी पुजा करताना सहज वावरता येत असे. मी श्रावणीला देखील ती सोवळ्याची अर्धी चड्डी घालत असे. पण पंचगव्य व गोमुत्र पिताना ते त्या चड्डीवर सांडत असे. त्याचा डागही पडत असे. सोवळ्यातील पुरुष व विटाळशी बाई यात मला विलक्षण साम्य वाटत असे. सोवळ्यात सुती कपड्यांना केवळ पायच नव्हे तर हातही लावत नसे.अन्य माणसाचा स्पर्श देखील वर्ज्य होता. मग घोंगडीला स्पर्श चालतो का? असे भय युक्त कुतुहल माझ्या मनात येत असे. असो गेल ते दिन गेले.... हल्ली आम्ही 'शास्त्रापुरते' देखील सोवळे घालत नाही वा पाळत नाही. याची शिक्षा आम्हाला होणार आहे असे काही शास्त्रकार सांगतात.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हो ना! काय दिवस आलेत? चालायचेच. हे ही दिवस जातील. मग जरा शास्त्र शुद्ध ( सोवळे घालुन) बसु.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सोवळ्यातील पुरुष व विटाळशी बाई यात मला विलक्षण साम्य वाटत असे.
हे वाचून गंमत वाटली.
सोवळ्यात सुती कपड्यांना केवळ पायच नव्हे तर हातही लावत नसे.
यामागची काही कारणं तुम्हाला माहीत असतील किंवा इतरांकडून माहीत करून घेता येतील तर कृपया सांगावी. सूत सर्वांना परवडे पण रेशीम महाग असे. त्यामुळे सोवळं पाळणं सर्वांना शक्य होऊ नये अशी काही सामाजिक उच्च-नीचतेची मांडणी होती का?