तर्रीदार रश्श्याचे आधण गरमा गरम |
स्वादिष्ट वास चौफेर, हे ची आग्रही आमंत्रण |
जाहले पाट पाणी, भोवती रेघ रांगोळीची |
स्वादिष्ट भोजनासाठी , इतुकेच थाट मी करी |
हा भात मसालेदार अन धार तुपाची वरी |
वाढते आग्रहाने, मी सुग्रण 'कोल्हापुरी' |
मंडळी , कोल्हापूर अन मांसाहार याचं अतूट नात आहे. अशी चव , असं स्वयंपाक बनवण, की ज्याचा वास गल्लीभर फिरत असतो. अन रविवारी तर हा वास घराघरातून येत असतो.
आज मी बनवते, सॉरी सॉरी , खिलवते आहे भरला बांगडा !
हे बांगडे !


From Drop Box " alt="" />
बघून घ्या ! काय आहे असाच आणखी एक मासा असतो पण चव मात्र जरासुद्धा याच्या जवळ पास नाही पोहोचत !
त्याला मध्ये म्हणजे चपटा बांगडा जर हातावर धरला तर पोटावर एक रेघ दिसते. अन काही निळसर रेघा पण असतात. बराचसा फडफडीत वाटतो अन आपण फसतो !
बांगड्याला थोडासा गोडसर वास असतो. इथे बांगड्याला kambong अन त्या माश्याला selar म्हंटल जात. एव्हढ ज्ञान पुरे !
तर मासे साफ करून घ्या .
आता साहित्य.:-
चिंचेचा कोळ साधारण १ टे. स्पून.
हळद ११/२ टी स्पून.
मीठ बघून घाला.
तिखट आवडीनुसार.
आल लसूण कोथिंबीर पेस्ट २ तव ३ टे स्पून. ( हीं मी भरपूर तयार करून फ्रीझर मध्ये आईस क्यूब सारखे क्यूब करून ठेवते.)
हे सार एकत्र करून माश्याला व्यवस्थित आतून बाहेरून लावून घ्या. हवे असतील तर माश्याला थोडे तिरके काप दया .
स्टफिंग : जवळ जवळ १० ते १२ हिरव्या मिरच्या , मीठ , थोड्या लसूण पाकळ्या , कोथिंबीर, अन लिंबू रस.
घ्या चर्नर मध्ये फिरवून ! थोड जाडसर राहू द्या.
आता हे वाटण माश्याच्या पोटात असं भरून घ्या.


From Drop Box " alt="" />
मासा थोड्या तांदळाच्या वां ज्वारीच्या पिठा मध्ये मीठ तिखट घालून त्यावर घोळवून घ्या अन असा तांबूस रंगावर तळा. ( तांदळाच्या वां ज्वारीच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो.)


From Drop Box " alt="" />
माश्याचा रस्सा.
ओल खोबर ३ टे. स्पून.
१ मध्यम टोमेटो भाजून.
लवंग ४ वां ६
दालचिन दोन इंच .
मिरे ६ ७
रवी फुल १
भाजणी
१ टे, स्पून धणे.
१/२ टी स्पून मेथी.
अर्धा कांदा . पातळ कापून.


From Drop Box " alt="" />
थोड्याश्या तेलात पाहिला कांदा अगदी खरपूस भाजून घ्या.
आता तो बाजूला करून पाहिला धणे अन मग मेथी भाजून घ्या .
आता वरील सर्व मसाला म्हणजे खोबर , टोमेटो , लवंग दालचिन मिरे रवी फुल अन हा परतलेला मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या.
कांदा कापून गरम तेलात परतून घ्या अन त्यावर माश्याचे तुकडे अन हळद टाकून परतून घ्या . वरील मसाला घालून आणि थोडा परत अन मग पाणी मिसळा . चांगले उकळू दया . तयार!


From Drop Box " alt="" />
वाचने
16955
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरे राऽऽम!
+ १ >>हा भरला बांगडा आता
In reply to हरे राऽऽम! by धमाल मुलगा
धमु
In reply to हरे राऽऽम! by धमाल मुलगा
_/\_
In reply to धमु by श्रावण मोडक
काय चारोळी आहे वाह!!!!
In reply to _/\_ by धमाल मुलगा
मासा तेवढा ...
तुम्ही मासे खात नाही? हाय रे
In reply to मासा तेवढा ... by यकु
जमलेलं नाही अजून
In reply to तुम्ही मासे खात नाही? हाय रे by गवि
पापलेट खावा आणि सुरुवात
In reply to जमलेलं नाही अजून by यकु
सुचवा - सुचवा. इथल्या
In reply to पापलेट खावा आणि सुरुवात by गवि
नाय नाय्..मुम्बैस येवून
In reply to सुचवा - सुचवा. इथल्या by यकु
बर. पुढच्या टायंबाला "औट ऑफ
In reply to नाय नाय्..मुम्बैस येवून by गवि
सायबा,
In reply to बर. पुढच्या टायंबाला "औट ऑफ by यकु
धमू राजे, आवरा स्वतःला. अहो
In reply to सायबा, by धमाल मुलगा
कमी वासाचे मासे सुचवा "यशवंत
In reply to पापलेट खावा आणि सुरुवात by गवि
थोडी दूरूस्ती
In reply to पापलेट खावा आणि सुरुवात by गवि
बिनवासाचे आणि कमी काट्याचे
In reply to थोडी दूरूस्ती by चिंतामणी
मासे मांसाहारी नाहीत
In reply to मासा तेवढा ... by यकु
बरोबर आहे.
In reply to मासे मांसाहारी नाहीत by विजुभाऊ
रविवारला सहा दिवस बाकी
बांगडा मस्तच गं आमंत्रण
ठार मेलो !
सर्वांचे आभार. यशवंत
कठीण आहे माझं. ! मलाही जरा
धडा
In reply to कठीण आहे माझं. ! मलाही जरा by प्राजु
ऐकीव माहिती
In reply to धडा by प्रकाश घाटपांडे
मासे कसे आणि कोणते खावेत?
मस्त
मस्त! कधी येऊ जेवायला?
एकदम सट्टाक पाकृ..
अपर्णा मी येते ग जेवायला
या जागुताई अवश्य या! प्राजु
In reply to अपर्णा मी येते ग जेवायला by जागु
निषेध निषेध निषेध
जपून
जागुतै आणि अपर्णाचे हे धागे
११/२
दीड चमचे?
In reply to ११/२ by आचारी
त्रास ! त्रास !!
(विषय दिलेला नाही)
आमची बॉंब
माताय..........
विजुभाऊ रिबलेट्स हा मटणाचा
In reply to माताय.......... by विजुभाऊ
अवांतर-
अर्पे, मार हि डालोगे ….