Skip to main content

का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 28/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वाहून काल गेला राहून साचलेला का शब्द मी निघालो खोडून वाचलेला? वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी का डंख हा मिळाला आतून डाचलेला काळोख ही विजेचा अंगार होत आहे अंधार ही विजांनी पोळून टाकलेला सारे तुला दिले मी माझी न राहिली तू तो चोरटा निघाला माझाच वाटलेला गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ? कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10
लेखनविषय:

वाचने 1058
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सारे तुला दिले मी माझी न राहिली तू तो चोरटा निघाला माझाच वाटलेला ********************** साने साहेब...... हे जरा जोराच अन जवळुन टोचल बर का....