फक्त दे तू हात या हातात माझ्या
बघ कशा संवेदना गातात माझ्या
मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्याचा गंध मुक्कामात माझ्या
भक्तिने नेवैद्य मी अर्पुन आलो
जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या
काय तू रमते अशी भासात मझ्या
ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या
कुंकवाचा साज भाळी रेखुदे ना
रंगुदे सौभग्य ते रंगात माझ्या
मी हिशेबी राहिलो नाही तरीही
बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या
मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1313
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी फुलांचे ताटवे फुलवून
अप्रतिम मी फुलांचे ताटवे
सुंदर. आवडली.
प्रत्येक कडवं सुंदर आहे.
शेवटचा शेर
अप्रतिम आहे.. प्रत्येक शेर