काय 'ध्यान' आहे! -समाप्त
लेखनप्रकार
एकंदरीत अधिष्ठान आणी ध्यान बरे जमायला लागले होते. पण 'खरे ध्यान' काही सेकंदच. परत मनातून वेगवेगळे विचार उसळी मारायचे. अजूनही कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उसळणे सुरूच होते. पण आता फरक म्हणजे, मी सिनेमा पहिल्यासारखी त्या बघत होते. आणी गम्मत म्हणजे ज्या आठवणींचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, त्या 'सिनेमात' आता मात्र मीच 'व्हिलन' ठरत होते! मनात म्हटले, 'बरोबरच आहे, शेवटी व्हिलनच मार खातो! त्याला त्रास होणारच.' आता मात्र धडा घ्यायचा, 'जागे' राहायचे.
आता ध्यान फक्त हॉलमध्ये गादल्यावर बसून नव्हते, 'प्रतिक्षण विपश्यना' सुरु करा म्हणून सांगितले होते. मधून मधून 'अरेच्चा!' सुरूच होते. अचानक नवर्याची आठवण होऊन खूप गलबलून आले. बिच्चारा! येताना त्याला खूप चिडवून चिडवून आनंद घेतला होता, 'मी १० दिवस तुझा पसारा आवरण्यापासून सुटका करून घेतेय! तुझे तू बघ काय ते.' त्याचा गरीब झालेला चेहरा आठवून खूप वाईट वाटले. मनाशी ठरवले, की घर कितीही भयानक अवस्थेत आले तरी रागवायचे नाही. ३ दिवस लागले तरी चालतील. गपचूप आवरायचे. पसारा करून ठेवणे हा त्याचा धर्म, नीटनेटकेपणाची हौस हा माझा. त्यात भांडायचे काय? १० दिवसात निदान इतका तरी बदल करावा मी स्वत:मध्ये. 'परधर्म सहिष्णुता' बाळगायला घरापासून तरी सुरुवात होऊदे.
आता शेवटचा भाग, 'मंगल मैत्री'. गुरुजींनी समजावून सांगायला सुरुवात केली, 'मंगल मैत्री, म्हणजे कल्याणकारी भावना. या १० दिवसात तुम्ही जो काही आनंद मिळवलात, जे 'पुण्य' मिळवलात, ते आपण सर्वांनी वाटून घेऊयात. तुमची ओळख असो, नसो, सर्वाना तुमच्या या मंगल कामनेत सामील करून घ्या, सगळ्यांशी मैत्री करा'. इथपर्यंत सगळे ठीक होते, सोपे होते. अनोळखी असली, तरी आपल्याबरोबरची आपल्या सारखीच माणसे, मनानी लगेच मान्य केले. सर्वांना मनापासून, मनातल्या मनातच शुभेच्छा दिल्या गेल्या. गुरुजी पुढे म्हणाले, ' तुमच्या मित्र मैत्रीणीना अथवा, इतर जवळच्या लोकांना, ओळखीच्या लोकांना देखील, मनातून तुमच्या 'पुण्यात' सहभागी करून घ्या.' डन! पुढे म्हणाले, ' तुमच्या शत्रूंना सुद्धा तुमच्या आनंदात, तुमच्या 'पुण्यात' सहभागी करून घ्या. तुमच्या शुभ इच्छा त्यांच्यापर्यंत पोचूद्यात.'
आता आली का पंचाईत! कितीही प्रयत्न केला तरी हे काही मला जमत नव्हते. मला मुद्दाम त्रास देणाऱ्या लोकांना मी कशाला शुभेच्छा देऊ? एरवी तोंडदेखले 'हॅप्पी बर्थडे!' म्हणणे वेगळे. एकवेळ वस्तू देईन, पैसे फेकेन, पण 'पुण्य'??!! छे!
अचानक आश्चर्य वाटले, १० दिवस गौतम बुद्धांच्या शब्दांवर जगतेय, तरीही मनातला द्वेष हटत नाहीये.
परत जरा शहाण्यासारखं विचार केला, १० दिवस स्वत:ला वॉशिंग मशीनमधून खळबळून काढायचे आणी पुन्हा चिखलात लोळायचे का आता? इतरांच्या मनात राग असला तर असला, मी कशाला लागण करून घ्यायची? त्यांचे त्यांच्याजवळ. मला तरी निर्लेप राहता यायला हवे.
एकदम आपल्या लाडक्या (?) गोविंदाचे बनियनच्या जाहिरातीतले शब्द आठवले, 'उसने धक्का दिया तो दिया, तुने क्यो लिया?' आता गोविंदाकडूनदेखील आयुष्याचे तत्वद्यान शिकावे हे जरा कठीणच आहे. असो. .....ट्यूब तर पेटली.
आता शत्रूंना देखील 'हॅप्पी बर्थडे!' केले.
गुरुजींचे संध्याकाळचे प्रवचन खूप छान होते, त्यानी 'धर्माला' खिरीची उपमा दिली. आई सांगतेय मुलाला, खीर खारे बाळा. मुलगा म्हणतोय, 'ही खीर माझ्या पात्रात नाही.' म्हणजे मला समजणाऱ्या, आवडणार्या शब्दात, व्याख्येत बांधलेली नाही. मग आई त्या पात्रात घालून देते. तो पुन्हा म्हणतो, 'मी खाणार नाही, त्यात काळे खडे आहेत.' म्हणजे इतर काही ना समजणाऱ्या गोष्टी आहेत, जसे शील म्हणजे नक्की काय? समाधी नक्की कशासाठी? प्रज्ञा कशी जागी होते ? मग आई समजावते, त्याचा स्वत:चा एक स्वाद आहे. तुला नको असेल तर तेवढे 'काळे खडे' बाजूला ठेव, पण खीर खा. ज्या दिवशी त्याचा स्वाद तुला कळेल त्या दिवशी ते पण खा. धर्मरूपी खिरीला अंतरु नकोस. 'सजग राहून, वर्तमानात राहून, अंतर्मुख होऊन, सत्य बघणे' हा धर्म मात्र पाळत राहा.
असे सांगून गुरुजी म्हणाले, 'आता गुरुदक्षिणेची वेळ आली, माझी गुरुदक्षिणा ही, की जेंव्हा जेंव्हा 'मंगल' मैत्री' साधना घरी जाऊन कराल, तेंव्हा माझीदेखील आठवण ठेवा. मलाही सामील करून घ्या'.
एकदम लक्षात आले, उद्या संपतंय की शिबीर. म्हणजे उद्यापासून गुरुजीपण समोर दिसणार नाहीत. माहेर सोडून निघाल्यासारखे, माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले. एरवी माझ्या डोळ्यातून टिपूसही येत नाही. इथे येऊन काय चालले होते कुणास ठाऊक. आजुबाजूला पहिले, तर सगळेच स्त्री-पुरुष डोळे पुसत होते. इथे खरच मी इतकी मजेत राहिले, की बाहेर गेल्यावर कुणी विचारले, काय केले १० दिवस?, तर मी सांगेन 'धम्माल!'
तिकडच्या व्यवस्थापकांना बहुतेक कल्पना आहे, की गुरुजी खिरीचे वर्णन खूपच इफेक्टिव करतात, इच्छा निर्माण होते लगेच खीर खायची. शेवटच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच, सक्काळी साडेसहाला खीर आणी बटाटेवडा असा नाश्ता करून निघाले.
निघण्या आधी पुस्तके काही पुस्तके विकत घेतली. (अजून वाचलीच नाहीत ती गोष्ट वेगळी!) काही लोक पैसे दान देखील देत होते. मी करायला जात होते, पण अचानक लक्षात आले, की मी 'दान' देत नाहीये, मी हिशोब करतेय, राहण्याचा, जेवण्याचा. मग थांबले, म्हटले, माझ्या कायम लक्षात राहायला हवे, की असे 'माहेरपण' मला मिळाले ते कुठल्यातरी अनोळखी लोकांच्या दानावर. त्यात स्वत: कमावलेले वगरै काही नाही. नाहीतरी आपण खरोखरच काय कमावलेले असते, हवा तर नक्की फुकटच असते. बाकीच्या गोष्टी 'मायनर' आहेत.
मात्र या सगळ्यातून मला कुठल्याही व्याख्येत ना बसवलेला एक 'सत्य धर्म' सापडला. इथे मला राहून राहून एका तिबेटन लामाचे उद्गार आठवत होते, 'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.
'भवतु सब्ब मंगल'.
'रिझल्ट ओरिएन्टेड ' माउ
वाचने
22392
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
आभार.
खुप छान पद्धतीने तुम्ही
झकासच .......................
हा भाग खूप सुरेख जमलाय. मस्त
In reply to हा भाग खूप सुरेख जमलाय. मस्त by यशोधरा
असेच म्हणतो.
मस्त
धन्यवाद.
पॅगोडा. इगतपुरी विपश्यना केंद्र.
आता ध्यान फक्त हॉलमध्ये
In reply to आता ध्यान फक्त हॉलमध्ये by मनिष
धन्यवाद.
सुंदर लेखमाला!
छान !
खणखणीत ...
In reply to खणखणीत ... by छोटा डॉन
आभारी!
In reply to आभारी! by कवितानागेश
असो.
खूप सुंदर झाली आहे लेखमाला.
लेखमाला खूप आवडली. धन्यवाद!
तुमचा विपश्यनेचा अनुभव सुंदर
In reply to तुमचा विपश्यनेचा अनुभव सुंदर by यकु
धन्यवाद.
लेखमाला आवडली. आपल्या अनुभवात
In reply to लेखमाला आवडली. आपल्या अनुभवात by रेवती
श्री श्री श्री रविशंकर
In reply to श्री श्री श्री रविशंकर by धमाल मुलगा
होय, असेलही. आता आठवत नाही.
In reply to होय, असेलही. आता आठवत नाही. by रेवती
हाहाहा
लेख छानच!
In reply to लेख छानच! by धमाल मुलगा
त्राटक दृष्टीनं पाहुनही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट?
In reply to त्राटक दृष्टीनं पाहुनही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट? by यकु
अल्-त्राटक..
In reply to अल्-त्राटक.. by धमाल मुलगा
हांग्गा आस्स! दम खा जरा.
शाळेत असताना दहावीत
सगळे भाग वाचले..प्रिच (preach
खुसखुशीत ओळख
अप्रतीम !!
लेखमाला आवडली. हा कोर्स करून
छान लेखमाला
In reply to छान लेखमाला by राजेश घासकडवी
सहमत
लेखमाला आवडली असुन आम्ही आमचा
वेगळा..
नवर्या बद्दल कणव?
मस्त लिहिले आहेस माऊ. सगळेच
सुंदर
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
सगळे भाग वाचले. खुप आवडले.
In reply to सगळे भाग वाचले. खुप आवडले. by मृत्युन्जय
मृत्युन्जय
सुट्टी
In reply to सुट्टी by कवितानागेश
'तिहारमधल्या कैद्यांसाठी
शब्दाची छान ओळख झाली.
छान लेखमाला.
पुन्हा वाचताना तेवढीच मजा
माऊ गं माऊ.. मस्त लिहिलंयस.
सुरेख !
'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'. 'भवतु सब्ब मंगल'.हे सत्य जर सगळ्यांना समजले तर पृथ्वीवर स्वर्गच उतरेल.मस्त लिहिलंयस !!
चारही भाग वाचले.
In reply to चारही भाग वाचले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा बंद असताना? ;-)
छान लेखमाला..
मस्तच , पुर्ण लेखमालाच छान
आठवण...