माझी देखिल तयारी नव्हती कितीतरी वर्षे, म्हणून तर 'इतर' सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या.
आता परत जायचा विचार करतेय.... ( क्लास इम्प्रूव्ह्मेंटसाठी!)
>>आणी एकदम आठवले, 'च्यायला, मी कित्ती घाबरायचे हिला आत्तापर्यंत!' हा बदल मात्र कसा काय झाला नक्की माहित नाही. पण गुरुजी सांगत होते ते आठवले, की 'ध्यानानी 'करूणा' जागी होईल, द्वेष संपेल.'
यावरून माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो.
कामानिमित्त मी मुंबैला होतो. तेव्हा आमच्या गेस्ट हाऊस्च्या आसपास खूप कुत्री होती. म्हणजे साधारण १० नंतर मुख्य रस्ता सोडुन डाव्या गल्लीत जिथे आमची गेस्ट हाऊस ची बिल्डीग होती, तिथे जायला वळलो तर रस्त्यात अगदी १५ -२० कुत्री संपूर्ण रस्ताभर पसरलेली असायची. एक दिवस कामावरून परतत असताना जवळ्पास १० -१२ कुत्री मागे लागली होती. जीव वाचवून कसाबसा सुटलो होतो. पण तेव्हापासून कुत्र्यांची फार भिती मनात बसली होती. कुत्रे दिसले की लांबूनच पळायचो.
त्यानंतर १-२ महिन्यानी मी प्राणायाम, बिंदू त्राटक आणि ध्यानाचा सराव करू लागलोहोतो.साधारण २-३ आठवडे न चुकता सराव होत होता. कामाचा ताण नसल्याने वेळ्ही चुकत नव्हती. याच दर्म्यान अगदी प्रकर्षाने जाणवलेल्या बदलांमधला एक बदल म्हणजे ही कुत्र्यांबद्दलची भिती अचानक पणे गायब झाली होती. ती देखील त्यासाठी मी विषेश काहीही प्रयत्न न करता! म्हणजे एवढी की मी अनोळक्या ठिकाणी गेलो आणी तिथे एखादे कुत्रे भटकताना दिसत असेल तर अगदी त्याच्या जवळ जाऊन बसताना देखील भितीचा लवशेश नसे. उलट त्याच्याशी कनेक्ट ( मराठी प्रतीशब्द? ) होता येत असे. मला माहीत आहे, की बर्याच जणाना वाटेल की हे तर मी 'तसंही' करू शकतो. पण आधीची भिती आणि मग अचानक झालेला हा बदल, तोही विनासायास हे माझ्या बाबतीत तरी 'तसंही' शक्य झालं नसतं एवढं मात्र नक्की.
खरं सांगू स्वानंद भाऊ, मला एकदाच माझ्या वडलांनी सांगितलं, सांगितलं काय, ऑलमोस्ट दरडावलं, "खबरदार घाबरलीस कुत्र्यांना तर!" आणि कुत्र्यांची भीती गेली, मी वडलांना घाबरून घालवली. अर्थात त्यांनी अशा गोष्टी थोड्या प्रेमळपणे सांगितल्या असत्या तर आयुष्यातली पहिली तेरा वर्ष वडलांचीही भीती वाटली नसती ही गोष्ट वेगळी.
आजूबाजूचा निसर्ग पहायला मला माझ्या पीएचडी सुपरवायझरने शिकवलं. याला कुठला नवीन पक्षी-प्राणी दिसला की मी काम करत असतानादेखील तिथून उठवून ते प्राणी-पक्षी दाखवायचा. फिरायला गेलो की नवी जागा, तिथली माती, झाडं यांच्याबद्दल गप्पा मारायचा.
किडे उगाचच मारू नयेत वगैरे घरातूनच शिकवलं होतं, पण सायबाच्या देशातल्या डासांमुळे काही वर्ष डास मारायचीही गरज नव्हती. ओडोमॉस सगळ्यांनीच लावलं तर शहरी डासांना त्यांची अंडी उबवण्यासाठी रक्त कुठून मिळणार? आणि तसं झालं नाही तर आपण डासार्भकांची हत्या करू. हे चालतं का?
या अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकायला दहा दिवस विजनवासात का रहायचं हे अजून मला तरी समजलेलं नाही. तुझी लिहीण्याची स्टाईलमात्र आवडली हां!
वाटलं तर अवांतर: तुम्ही (विपश्यना करणारे) कोणी 'पाडस' ही कादंबरी वाचली आहेत का? त्यात जोडीचा बाप साप चावल्यावर समोर आलेली हरिणी मारतो, विष उतरवण्यासाठी. तिथे त्याची करूणा जागी झाली असती तर? 'करूणा' असण्याला विरोध नाही, पण प्रत्येक वेळेस करूणामय दृष्टीकोनच असावा का; करूणेचा अतिरेकही त्रासदायक होतो का?
तो विजनवास नसतो. ते 'स्वतःसोबत' रहाणे असते. संपूर्णपणे स्वतःबरोबर राहील्याशिवाय आपण स्वतःला कसे काय ओळखणार?
साधनेचा उद्द्येश फक्त किडे-पक्षी बघणे हा नाहीये. तो तर फक्त 'साईड इफेक्ट' आहे.
मन संवेदनशील होणे हा उद्द्येश आहे.
अवांतर: पाडस वाचली अहे.
अतिरेक कशाचाही वाइटच. ( कध्धी करु नकोस बरे का!)
प्रतिक्रिया
वेगळाच अनुभव.फक्त तो अनुभव
खरंय.
(विषय दिलेला नाही)
ओह रे?
वाचतिये.छान वाटतय.
माउ. इतकी क्लिष्ट गोष्ट अशी
शिवाय आम्हाला पूर्ण हिंसेचे
हा हा हा
>>आणी एकदम आठवले, 'च्यायला,
खरं सांगू स्वानंद भाऊ, मला
विजनवास
सुंदर रसाळ वर्णन् ! पुढचे भाग
सुरेख.
फारच छान!
मस्तच , साधनेचा अनुभवच वेगळा