साहित्य : पीत असलात तर तीन पेग व्हिस्की (रॉयल च्यालेंज), पाव किलो मध्यम आकाराचा सुरमई, दोन मोठे चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला, चार तेवढ्याच आकाराचे चमचे तेल, थोडा रवा, थोडा मैदा, दोन चिमटी मीठ,एक चांगली म्युझिक सिस्टीम, आणि घरात बायकोचा अभाव हे सगळं जमवा.
दोन चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला चार चमचे तेलात मिसळा. सुरमईच्या कापांना त्यात बुडवा. पूर्ण माखला की तसाच प्लेटमध्ये घालून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा.
मैदा रवा आणि मीठ मिक्स करून घ्या. मग माखलेली आणि थंडावलेली सुरमई फ्रीजबाहेर काढून ती रवा-मैदा-मीठ-मिक्स मध्ये घोळवा.
तव्यावर सढळ हस्ते तेल सोडून त्यावर सुरमईची खमंगता अनिवार होईपर्यंत परता..
प्लेटमध्ये सुरमई ठेवा.. प्याला भरा..
खालीलपैकी कोणत्याही गझली घ्या.:
गुलाम अलीची "आवारगी"
इक्बाल बानोची "मैं नजर से पी रहा हूं.."
तिचीच "ना गवाओ नावके नीमकश.."
गझल सीडीयंत्रात चालू करा..
पुढची सगळी सुंदर सुरमई शाम तुमचीच आहे..एकट्याची..
....
शाकाहारी असाल, मासोळी वर्ज्य असेल तर सुरमई ऐवजी वांगे वापरून सुरमई शामचा शाकाहारी आल्टर्नेट "वाङ्मयीन संध्याकाळ" बनवू शकता.
सर्व रेसिपी तशीच. फक्त सुरमईच्या कापांऐवजी वांग्याचे काप. हाही प्रकार अतिशय चट्टाक चाबूक बनतो. उंगलियां चाटते रह जाओगे...
..मात्र यासोबत गझल ऐवजी पुस्तक वाचायला घ्या.
शाळा किंवा तत्सम पुस्तक.
पुढची स्वर्गीय वाङ्मयीन संध्याकाळ आपलीच..!!
........
यांना अनुक्रमे सुरमई बेडेकरी आणि बेडेकरी वांगे असेही म्हणता येते.
........
(ता.क. तीनच्यावर प्याले नकोत..नाहीतर ता.क. पिऊन उतरवण्याची वेळ यायची..)
वाचने
6397
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरमई शाम
आणखीनच छान
तुमच्या पा.क्रुतीमधील दोन
In reply to आणखीनच छान by कच्ची कैरी
अहो..
In reply to आणखीनच छान by कच्ची कैरी
सपोर्ट !!!
In reply to अहो.. by गवि
ह्म्म...
In reply to अहो.. by गवि
काय? म्हणजे प्रोग्रॅम सुरु
In reply to आणखीनच छान by कच्ची कैरी
वान्गे काय राव???
ते फक्त शाकाहारी असाल तरच.
In reply to वान्गे काय राव??? by लॉरी टांगटूंगकर
अरेरे! सुरमयी शाम + बायकोचा
correction..
In reply to अरेरे! सुरमयी शाम + बायकोचा by स्वाती२
जरा फोन नंबर द्या
आपण.
प्रकाटाआ
In reply to आपण. by गवि
छान!