लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध) विश्वास आहे(च).
१> तबला वाजे, पेटी वाजे छान वाजे वीणा
..... रावांचं नाव घेते 'वंदे मातरम' म्हणा !!!!
............................................................
२>***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
३>इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
............................................................
४> काचेच्या बशीत बदामी हलवा ........ चे नाव घेतो
सासुबाईला बोलवा !!
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का?
हो नक्कीच !!@!!
गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध???) विश्वास आहे(च).??? हा हा !!@!
इथून तिथून पेरला लसूण
---ला आणलं एस्टीत बसून
कधी लावते तेल कधी लावते जेल
---ची बघा केवढी पोनीटेल
लग्न झालं आता बोलायचं काम काय
---चं नाव घेतो मी अल्लाघरची गाय
आयटीतली नाही झालीय बी एड
---ला तरी कॉम्प्युटरचंच वेड
पंगत नको आता मॉडर्न बुफे बरा
---ला घास देतो जरा माझी प्लेट धरा
लवंगाने होते कुणकुण, विलायचीने होते सर्दी,
...... आली घरी, आता कमी करा गर्दी!
(Technical details मध्ये जाउ नका. हा उखाणा मी बनवलेला नाही, पण लग्नात माझ्या नवर्याने घेतला होता, मजा आली.)
प्रतिक्रिया
सद्ध्या संकेत स्थळावरचे लेखन
येथे पहा
उखाणे हवेत..... utkarsh shah ?
हा हा हा.. फारच छान संजयराव,
मि.पा.वर इथेही मिळतील.
खोक्यात खोका टिव्हीचा
छ्या..
काल परवाच इथे ही राजकीय घोषणा
कॉलिंग पर्या...कॉलिंग पर्या...
मच्याक म्हणजे काय?
कपावर कप, बशीवर बशी माझी
=)) हा मस्त्च आहे
इथून तिथून पेरला लसूण ---ला
लवंगाने होते कुणकुण,