Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on Sat, 11/13/2010 - 12:27
थांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा ! तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... भेटण्यासाठी. मग कबूली, ते उमजणं, समजून घेणं तो बहर, तो मोहर.... सार्याल जगाचा विसर ! पावसातलं भटकणं, चांदण्यातलं भिजणं, कवितेतलं रमणं, डायरीतल्या गुलाबाच्या पाकळ्या.... ... .. अन्‌ अचानक... अचानक तुझं हरवणं .. मग तुझं अस्तित्व फक्त फ़ोटोतलं, आठवणीतलं, स्पर्शातलं ! तो पाऊस, ते चांदणं, त्या कविता….पाकळ्या, सारं काही पोरकं, तुझ्याशिवाय ! आता सांज डोळ्यात, रात्रीच्या प्रतिक्षेत आणि रात्र.... रात्र तुझ्या चांदण्यात ! जयश्री अंबासकर

Submitted by बेसनलाडू on Sat, 11/13/2010 - 13:14

Permalink

छान

कविता छान आहे. जयश्री अंबास्करांच्या लौकिकाशी इमान राखणारी! आवडली. (वाचक)बेसनलाडू यावरून आम्हाला आमची एक लांबलेली सांज आठवली. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 11/13/2010 - 19:28

In reply to छान by बेसनलाडू

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 11/13/2010 - 18:42

Permalink

कविता आवडली

पण मग तुझं अस्तित्व फक्त फोटोतलं हे जरा मला नाही आवडले. आठवणीतलं, स्पर्शातलं यावरून थोडी कल्पना करता आली असती असे वाटले. अर्थात तरी कविता छानच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Sat, 11/13/2010 - 20:23

Permalink

मनातले चांगले उतरवलेले आहे!

मनातले चांगले उतरवलेले आहे! आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 11/16/2010 - 14:09

Permalink

आवडली कविता

आवडली कविता
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Wed, 11/24/2010 - 13:27

Permalink

धन्यवाद लोक्स

धन्यवाद लोक्स :)
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 11/24/2010 - 14:25

Permalink

मस्तच.

मस्तच.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1908 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com