लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकर्याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकर्या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे रहात असतात. पुढे शेतकरी परत सगळी जनावरं गोठ्यात नेऊन बांधतो आणि बायको जाम खूष होते तिला आता तेच घर मोठं, ऐसपैस वाटू लागतं, नवरा तालेवार वाटू लागतो आणि सर्व काही आलबेल होतं.
याच तात्पर्याची गोष्ट नव्या काळातील -
आई मुलीच्या खोलीमध्ये प्रवेश करते आणि भींतीवरील मुलीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी पाहून तिच्या पोटात खड्डा पडतो. थरथरत्या हाताने, धडधडत्या हृदयाने ती चिठ्ठी वाचू लागते.-
" आई, तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराबरोबर मी खूप खूप दूर गेले असेन. खरं तर हे लिहीताना मला दु:ख होत आहे पण काय करू, राकेश शिवाय जगणं मला शक्य नाही. आमचे प्रेम अमर आहे. राकेशला जरी गुटखा आणि दारूचे व्यसन आत्ता असले तरी मी त्याला त्यापासून सोडवेन याबद्दल तू निश्चिंत रहा. राकेश फक्त सलमान खानसारखा दिसतच नाही तर सलमान खानसारखीच त्याच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत आहे आणि या जगात फक्त मी हे जाणते. मी फक्त १५ वर्षाची असले तरी मला बर्या वाईटाची चांगली जाण आहे. राकेश आत्ता जरी १२ वी पास असला तरी त्याला पुढे डॉक्टर होऊन एडस वर औषध शोधायचं आहे आणि त्याच्या या संशोधनात मी त्याची सहचारीण बनून साथ देणार आहे. आम्हाला खूप मुलं हवी आहेत. आम्ही दोघं लवकरच तुझं नातवंड घेऊन येऊ तेव्हा आमचं स्वागत तू आणि बाबा कराल ना ग? अरे हो एक सांगायचं राहीलं मी तिजोरीमधून तुझी मोहनमाळ, ठुशी आणि हीर्याच्या कुड्या घेऊन जात आहे नाहीतरी त्या तू मलाच दिल्या असत्यास याची मला खात्री आहे.
ता. क. - आई वरील सर्व गोष्टी खोट्या आहेत. मी शेजारी शुभांगीकडे गेले आहे. माझं निकालपत्र कपाटाच्या खालच्या कप्प्यात आहे. माझ्या निकालपत्राखेरीजही वाईट गोष्टी जगात आहेत हे सांगण्याकरता हा पत्रप्रपंच.
वाचने
4127
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई भारी
हा लेख पोरान्नि वाचला नाहि
काय आक्षेपार्ह आहे यात? : (
In reply to हा लेख पोरान्नि वाचला नाहि by नरेशकुमार
आक्षेपार्ह काहि नाहि. पोरन्नि
In reply to काय आक्षेपार्ह आहे यात? : ( by शुचि
मूळ इंग्रजी/ पाश्चात्य गोष्ट
लहानपणी शेतकर्याची वाचलेली
In reply to मूळ इंग्रजी/ पाश्चात्य गोष्ट by Pain
>> साधा विनोद आहे अतिशय
In reply to लहानपणी शेतकर्याची वाचलेली by शुचि
नविन कार्टी जास्त बदमाश
गैरसमज आहे हा. सातवी आठवी
In reply to नविन कार्टी जास्त बदमाश by गणेशा
लई भारी
In reply to गैरसमज आहे हा. सातवी आठवी by अवलिया
+१
In reply to गैरसमज आहे हा. सातवी आठवी by अवलिया
झक्कास...
सदर लेखाची एक कॉपी आमच्या
>> परमैत्रीणीकड>>>>> पर=
In reply to सदर लेखाची एक कॉपी आमच्या by इंटरनेटस्नेही
शुची पोरीन अगदी गुगली
पण असली गुगली जर माझ्या
In reply to शुची पोरीन अगदी गुगली by स्पंदना
ही एक जाहिरात बघण्यात आली
शुशितै तुमचा हा
शुचीचच नाव सारिका मोकाशी असू
In reply to शुशितै तुमचा हा by गोगोल