लेखाला काय नाव देऊ सुचतच नव्हतं..शेवटी आज सकाळी पाहिलेला प्रकार होता म्हणून आजची सकाळच देऊ अस ठरवलं.
असो...
झाल काय नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जायला निघालो . ऑफिस अगदी सातासमुद्रापलीकडे असल्यामुळे( अस मला वाटत) बस ची वाट पाहत होतो ( बस हि ऑफिस ची आहे ) तर सहज समोर लक्ष गेल... सकाळी सकाळी पुण्यात रस्ते झाडणारे सफाई कामगार दिसतातच... एक स्त्री आणि एक पुरुष दोघे मिळून रस्ता झाडत होते... त्यांच्या निरीक्षणावरून अस दिसत होत कि त्याने रस्ता झाडव आणि तिने कचरा गोळा करून हातात असलेल्या भल्या मोठ्या dustbin मध्ये तो कचरा टाकावा... पण चित्र काही विचित्रच होत. रस्ता दुभाजकाला लावलेल्या फुल झाडांमध्ये ती तो गोळा केलेला कचरा टाकत होती... आणि dustbin चक्क रिकामा होता.हे दृश्य मी अगदी ५ मिनिट पाहिलं असेल तेवढ्या वेळात त्यांनी २-३ ठिकाणी झाडून कचरा त्या फुल झाडांमध्ये टाकला. बिचारी ती झाडं, काय वाटल असेल त्यांना सकाळी सकाळी छान पाणी मिळव , छान सूर्यप्रकाश मिळावा, पण त्याऐवजी काय ? तर क च रा !!
मी माझ्या एका मित्राला हे दाखवले सुद्धा... हे पाहून मला काही सुचलंच नाही... का बर तिने अस कराव? तिला dustbin जड होईल अस वाटल असेल म्हणून कि तिला कंटाळा आला होता म्हणून कि , आजवर कोणी टोकाल नाही म्हणून , कि तिला काही घेण देन नाही म्हणून ह्या विचारानेच मनात काहीतरी वेगळीच घालमेल झाली. तेवढ्यात आमची बस आली आणि मी ऑफिसला निघालो .
हा माझा पहिलाच लेख आहे. त्यामुळे सांभाळून घ्या. लेखन अजून कसे नीट असावे हे पण सुचवा... :-)
याद्या
1736
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
खत
अहो ते मला पण कळल हो... पण
एक गंभीर शंका..
In reply to अहो ते मला पण कळल हो... पण by झक्कास...
दोन कारण
नविन