आज मिपाकर लेखक एकदम पेटले आहेत. कुणी किल्ल्याची तर कुणी विडीची आठवण करून देतय. कुणाला चिंचा आठवल्या तर कुणाला शाळेतल्या गुणपत्रिका. आणि नानांनी मनीमाऊची आठवण करून दिली. एकावेळी असला एक नोस्टाल्जीक लेख व्याकुळ करून जातो आणि आज चक्क जवळ्पास अर्धा डझन लेख वाचून आपल्या आयुष्यात आपण सगळच हरवून बसलो आहे अस वाटायला लागलय! ह्या दर्जेदार लेखनांचा अचानक महापूर येण्याचा कारण काय असेल कोणी सांगेल का? कुठला विशिष्ट पक्ष (पितृ पक्षात असाच पूर्वजांवरील लेखांचा पूर आल्याच आठवतय) वगैरे चालू आहे की काय? असो एकाच दिवसात असा आनंद (थोडा त्रासदायक असला तरी) देणार्या लेखकांच अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद!
अवांतर : खर तर कौलच काढाणार होतो पण नक्की पर्याय माहीत नसल्याने काथ्याकुट करावी लागत आहे.
याद्या
1970
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
होना.. खर सांगताय
तर कुणाला उजव्या शेपटीचा
:) ईमोशनल अत्याचार
मस्त. -----------------------
आठवणीचा अत्याचार कसा ?