श्री. शरद यांच्या दर्शने या लेखमालेदरम्यान झालेल्या साद-प्रतिसादात संतांची समाधी याबद्दलच्या माझ्या वेगळ्या दृष्टीकोनात, प्रियालीताई म्हणतात त्याप्रमाणे, मी पिल्लू सोडले सोडले होते. प्रशांत, बिकांनी पुराव्यासहीत याबद्दल लिहीण्याचा आग्रह केला आहे; म्हणून मी हे लिहायला बसलो आहे. पण संपादकांच्या सूचनेवरून केलेल्या या लिखाणामुळे सर्वांचीच माझ्यावर इतराजी होऊन या आयडीलाच जीवंत समाधी दिली जाईल की काय अशी शंकाही मनात आहे. पण विचारा विचारात खेळ न गमावता लिहीतोच. मी मांडणार असलेल्या संतांच्या समाधी (ही समाधी म्हणजे ध्यानात लागणारी समाधी नाही तर जीवंत समाधी, जलसमाधी, अग्निसमाधी, जैन धर्मियांतील संथारा/ यम सल्लेखना व्रत वगैरे स्वत:चे अस्तित्व संपवण्याचे प्रकार) बाबतच्या दृष्टीकोनाला कसलेही कागदोपत्री पुरावे नाहीत. पण इतिहासातच काय अगदी तीन-चारवर्षांपूर्वीच्या काळातही या घटना घडून गेल्या आहेत; घडत आहेत, त्यांची पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरागत विश्लेषणे आपल्याकडे आहेत. ती किती खरी मानायची किती खोटी मानायची हा ज्याची त्याची बाब आहे. पण झालेल्या आग्रहाचा विचार करता मी हा दृष्टीकोन मांडत आहे; अर्थातच त्यावर युजी कृष्णमूर्तींच्या विचारांचा प्रभाव आहे; आणि याबद्दलचा माझा दृष्टीकोन व्यापक ठेवायचा प्रयत्न केला आहे (नाहीतरी "अपुरी माहिती असताना उगाच मुक्ताफळे उधळतो", "फक्त करमणुकीसाठी साद-प्रतिसाद चाललेत", "दगडावर डोके आपटले तर फुटण्याचीच शक्यता अधिक" वगैरे चर्चा खरडवह्यांतून होतच आहे). असो.
तर मूळ विषय आहे समाधिस्थ लोक ! का घेतात हे लोक समाधी? किंवा आपण असे म्हणू हे लोक त्यांच्या जीवनातील एका विशिष्ट पॉईंटवर स्वत:चे अस्तित्व का संपवतात? सावधान! ही चर्चा उठसूठ आत्महत्त्या करणार्या आम आदमीबद्दल नाही तर पोहोचलेल्या लोकांबद्दल आहे.
(१) सर्वप्रथम अगदी अलिकडचे उदाहरण घेतो. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वडजी हे गाव. जशी महाराष्ट्रातील आजकालची गावे असतात तसेच हेसुध्दा - वारकरी, "धार"करी, सुष्ट-दुष्ट वगैरे सगळ्यांचा भरणा असलेले. याच गावचा एक भक्तीमार्गी तरूण - कृष्णा भांड (आता कृष्णा महाराज), पांडूरंगाचा भक्त, स्वत: शेती करणारा, अभंग वगैरे लिहीणारा, किर्तनरंगी रंगणारा, पांडुरंगाची भक्ती करावी, व्यसने करू नयेत, आईवडीलांना सुख द्यावे वगैरे गोष्टी लोकांना सांगणारा. चांगला चारधाम यात्रा करून आला. शेतात काम करतानाच याने एके ठिकाणी लाकडे जमा करून ठेवली. जवळपासच्या लोकांना वाटले ठेवली असतील आपली सहज. पण त्या दोन-चार दिवसांतच हा गावात, मित्रमंडळीत अखेरच्या निरोपाचे बोलणे करू लागला - "मला पांडुरंगाचं बोलावणं आलंय, मी लवकरच जाणार" वगैरे सांगू लागला. गावात सायंकाळच्या वेळी सगळ्यांना भेटला, बोलला, जवळच्या नातेवाईकांसोबतही मनमोकळे बोलणे केले आणि - दुसर्या दिवशी शेतात स्वत:च जमवलेल्या लाकडांची चिता रचून त्यावर रॉकेल टाकून ती पेटवली आणि त्यात त्याने स्वत:ची जीवनयात्रा संपवली !
(२) ही गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वीची. उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगातील कुंथलगिरी नावाचे एक गाव. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र. जैन मुनी, साध्वी यांचे स्थानक. त्यातलेच एक वयोवृध्द, तपोवृध्द मुनी. यांनी यम सल्लेखना घेतली. यम सल्लेखनेचा प्रकार थोडक्यात असा की सर्वप्रथम काही दिवस अन्नत्याग करायचा - फळांवर दिवस काढायचे. मग काही दिवसांनंतर फळेही बंद. पुढचे दिवस फक्त पाण्यावर काढायचे. या महिनाभराच्या काळात शरीरातला सगळा मेद विरून जातो. कातडी हाडांना चिकटते. शरीरातील हाडांचा फक्त पिंजरा तेवढा उरतो. मग पाणीही बंद. निसर्ग आपले कार्य उरकतो आणि प्राण शरीर सोडून उडून जातो! हे मुनीही गेले.
(३) आळंदी! इंद्रायणीचा रम्य तीर. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी या नावाचा एक तरूण. वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत भाषेत असणारी भगवद्गीता मराठीत सांगणारी ‘ज्ञानेश्वरी’ लिहीली. त्यानंतर स्वत:चा अमृतानुभव लिहीला. तीर्थयात्रा केली. एकवीसावे वर्ष लागले होते. आध्यात्मिक/लौकिकातील जो-जो अनुभव घेता येणे शक्य होते तो पूर्ण झाला होता. भागवत धर्माचा पाया रचून झाला होता. संतपद गाठले होते. ज्ञानेश्वरांना संजीवन समाधीचे वेध लागले. लोकांना तसे बोलून दाखवले. आणि एक दिवस ज्ञानेश्वर संजीवन समाधीत प्रवेशले!
वर दिलेल्या समाधीच्या तिन्ही उदाहरणांसमोर का? हा प्रश्न ठेऊन पहा. काय उत्तर मिळते? फ्री वील? पण तशी फ्री वील तर आत्महत्या करून घेणार्या लोकांचीही असतेच ! की सगळे यश मिळवून झाल्यानंतर येणारे वैराग्य? की जग बदलत नाही म्हणून जगाबद्दल मनात निर्माण झालेला तिटकारा आणि त्या तिटकार्याचे स्वत:वर आलेले बुमरॅंग?
मला हा लौकीक/आध्यात्मिक जगतातील यश मिळवून मोकळा झालेल्या "सेल्फ" चा रिव्हर्स इफेक्ट - बुमरॅंग वाटतो. इथं ध्यान आणि भक्ती मार्गाबद्दल थोडीशी चर्चा करावी वाटतेय. ध्यानमार्गी साधकाचा अवलोकन विषय स्वत: तोच ! आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी (ही समाधी "ती" नव्हे) हा ध्यानमार्ग. या मार्गाने समाधीपर्यंत गेल्यानंतर, आणि आलेले अमृतानुभव सांगून झाल्यानंतरही पुढे नैसर्गिक मृत्यू घडेपर्यंत सुखाने कालक्रमणा का न व्हावी?
भक्तीमार्गीयांचेही हेच! दिवसरात्र नामस्मरण, ईश्वरसंकिर्तन, भजन-पूजन मग कुठेतरी ईशदर्शन - ते ईशदर्शन सतत, सर्वकाळ हवे असणे - देव (असलाच तर!) काही तेवढा रिकामा नसणे मग यांनीच देवाकडे जाण्यासाठी एक दिवस अग्निसमाधी घेणे किंवा जलसमाधी घेणे!
हे कृपया ७ मिनीटे ३८ सेकंदांपासून पुढे पाहा
यु सी, मेडीटेशन इज वन ऑफ दी वर्स्ट टेक्नीक दॅट पीपल आर प्रीचींग ... नोबडी हॅज डन सिरीयसली मेडीटेशन धीस इज व्हाट आय पॉईंट आऊट टू दी पीपल.. इफ यू हॅव मेडीटेटेड व्हेरी सिरीयसली फॉर लॉंगर पिरीयड्स दॅन दे क्लेम दॅट दे हॅव डन दे वील आयदर एंड अप इन दी लूनी बीन्स, सिंगीग लूनी ट्यून्स ऑर मेरी मेलडीज ऑर कमिट स्यूसाईड .. जम्प इन्टू दी रिव्हर.. मेनी ऑफ दोज सेजेस इन इंडिया हू प्रॅक्टीस्ड योगा, हू प्रॅक्टीस्ड मेडीटेशन टेक्नीक्स.. दे ऑल कमिटेड स्यूसाईड.. अॅण्ड दे कॉल दॅट जलसमाधी...
करा आता कुटायला सुरूवात !
याद्या
15800
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावरकरांनी इच्छा मरण
प्रायोपवेशन
In reply to सावरकरांनी इच्छा मरण by अविनाशकुलकर्णी
बरोबर
In reply to प्रायोपवेशन by विकास
कोसंबी
संदर्भाशिवाय....
विनोद
In reply to संदर्भाशिवाय.... by प्रियाली
धन्यवाद
In reply to विनोद by यकु
चांगली माहिती पण
+१ >> त्यांच्या समाधीमागचा
In reply to चांगली माहिती पण by रन्गराव
अस नाही करायचं शुचि
In reply to +१ >> त्यांच्या समाधीमागचा by शुचि
+१
In reply to अस नाही करायचं शुचि by रन्गराव
ही घ्या एक ओवी "जो जे वान्छील तो ते लाभो प्राणीजात."
In reply to +१ by यकु
हे लोक नेहमीच जर आपल्यापेक्षा
In reply to चांगली माहिती पण by रन्गराव
अरेरे
In reply to हे लोक नेहमीच जर आपल्यापेक्षा by यकु
ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी
दाद
In reply to ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी by नगरीनिरंजन
उत्तम प्रतिसाद
In reply to ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी by नगरीनिरंजन
नगरी निरंजन, तुमचा प्रतिसाद
In reply to ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी by नगरीनिरंजन
प्रतिसाद आवडला. संत म्हणजे
In reply to ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी by नगरीनिरंजन
अजून एक
काय बोलता? असे खरेच एकही
यु जी..
एकनाथराव???
In reply to यु जी.. by प्रशु
आँ
In reply to एकनाथराव??? by प्रियाली
खरं आहे..
In reply to एकनाथराव??? by प्रियाली
नावात काय विशेष नाही हो -
In reply to खरं आहे.. by प्रशु
नीट वाचावे
In reply to खरं आहे.. by प्रशु
भुमिका.
In reply to नीट वाचावे by प्रियाली
फक्त संतांनी समाधी घेतली
In reply to भुमिका. by प्रशु
असे कुठे दिसले
In reply to भुमिका. by प्रशु
शीर्षक संपादित
In reply to अं? by प्रियाली
शीर्षक संपादित.
In reply to पुन्हा, नीट वाचा by प्रियाली
प्रियालीताई, धन्यवाद!
In reply to एकनाथराव??? by प्रियाली
चष्म्याचे मॅन्युफॅक्चरर
In reply to यु जी.. by प्रशु
चष्मे...
In reply to चष्म्याचे मॅन्युफॅक्चरर by यकु
सदिच्छा
In reply to चष्मे... by प्रशु
पळवाट..
In reply to सदिच्छा by यकु
आभार
In reply to पळवाट.. by प्रशु
सत्य
In reply to आभार by यकु
टोकाची भुमिका
आयला!!!!!!!!!!!!!!!!
एडी वैनी
In reply to आयला!!!!!!!!!!!!!!!! by विलासराव
हा हा हा ........
In reply to एडी वैनी by यकु
भ्रम हाय त्यो
In reply to आयला!!!!!!!!!!!!!!!! by विलासराव
मस्तच!!!!!!
स्वानुभव नाय तर अजून काय?
In reply to मस्तच!!!!!! by विलासराव
ह्म्म्म्म्म्म्म्म
In reply to स्वानुभव नाय तर अजून काय? by रन्गराव
यशवंत भाऊ
समाधी साधन !!
+१
In reply to समाधी साधन !! by अर्धवटराव
युजलेस
In reply to समाधी साधन !! by अर्धवटराव
काँट्रॅडीक्शन !!
In reply to युजलेस by यकु
१) भारतात ध्यान वगैरे
In reply to काँट्रॅडीक्शन !! by अर्धवटराव
थोडी टीका
In reply to युजलेस by यकु
खुप मनोरंजन झाले ...
समाधी..
वाचतोय !!
In reply to समाधी.. by कवितानागेश