खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्या कुणासोबर घडणार नाही:
"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
त्या दिवशी त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसर्या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.
मग मी एक दिवशी पुन्हा कागदपत्रके दिली कारण जुना नंबर अनेकांना दिला सल्याने तो बंद करणे योग्य वाटले नाही.
पूर्वीचा नंबर चालू झाला. मी कस्टमर केअरला विचारून खात्री सुद्धा केली, की माझा अॅड्रेस वगैरे सर्व पोहोचले आहे का.
ते हो म्हणाले.
पुन्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी एसएमेस आला की कागदपत्रके अपूर्ण आहेत, ते द्या अन्यथा सेवा बंद करण्यात येईल.
मी कॉल केल्यावर ते म्हणाले की कागदपत्रके पुन्हा जमा करावी लागतील.
त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही.
फक्त पुन्हा कागदपत्रके पाहिजेतच असे सांगितले.
मग मी माझा प्रीपेड बॅलंन्स दुसर्या आयडीया नंबरवर ट्रान्सफर करण्याची शक्कल शोधली आणि आता पुन्हा कागदपत्रके जमा न करण्याचा व माझा नंबर अनिच्छेने कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका दिवसाला फक्त तीन वेळा ५० रुपये असे १५० रुपयेच फक्त ट्रान्स्फर होवु शकतात. ते मी केले.
पण अजून बॅलन्स शिल्लक होता.
पण त्यांना हे कळले असावे, तर त्यांनी ४८ ऐवजी २४ तासातच सेवा बंद कली.
आता बोला!!
माझे सगळे उपाय करून झाले. ते आयडीयावाले जुमानले नाहीत.
म्हणजे बॅलन्स खाण्याचा हा प्रकार आहे."
महत्त्वाची माहिती:
आयडीया टू आयडीया उरलेली बॅलन्स आपणांस दुसर्या आयडीया वर ट्रान्सफर करायचा असल्यास असा करा:
GIVE मोबाईल नंबर 50 असा एसएमएस करा ५५५६७ वर.
तीन वेळा.
अशा मुळे खालील प्रश्न मनात येतातः
ही कागदपत्रके सेंटरच्या कर्मचार्यांकडून गहाळ होत आहेत का?
विविध सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत का?
नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात का?
तसे असेल तर त्रास देण्यामागचा हेतू काय?
मोबाईल मध्ये खुप बॅलन्स शिल्लक असेल आणि त्या ग्राहका कडून तो संपत नसेल तर मुद्दाम बॅलंस खाण्यासाठी तर ते असे ते करत नसावेत ना?
कुठे जातात ही न पोहोचलेली किंवा "अपूर्ण" कागदपत्रके?
वाचने
6274
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी गेली ७ वर्षे एअरटेलचा
कसे सुचतात हो तुम्हाला हे
माझ्याकडे आधी आयडीयाचं
In reply to कसे सुचतात हो तुम्हाला हे by परिकथेतील राजकुमार
मग वडाफोन घेतला आर्मला
In reply to माझ्याकडे आधी आयडीयाचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा.
In reply to माझ्याकडे आधी आयडीयाचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
सही... मला सूध्दा AIRTEL चा असाच अनूभव आला
In reply to कसे सुचतात हो तुम्हाला हे by परिकथेतील राजकुमार
बरं मग ?
In reply to कसे सुचतात हो तुम्हाला हे by परिकथेतील राजकुमार
सगळे चोर आहेत. केबल टीवी असो,
पुन्हा एक संशय का बरे मनी दाटला?..
टेलीकॉम कंपन्या कधीच
In reply to पुन्हा एक संशय का बरे मनी दाटला?.. by निमिष सोनार
कागदपत्रे
(सिमकार्ड सरेंडर केल्यास तर
In reply to कागदपत्रे by नितिन थत्ते
थत्ते साहेब एकदम बरोबर बोललात
In reply to कागदपत्रे by नितिन थत्ते
ब्लॉग वरून पुन:प्रकाशित जुना
इंडीया इज सो..
आम्हा इंडीयावाल्यांच्या हा
In reply to इंडीया इज सो.. by सहज
बरोबर आहे
In reply to आम्हा इंडीयावाल्यांच्या हा by परिकथेतील राजकुमार
ते बिकादेशी आपलं बांग्लादेशी
In reply to बरोबर आहे by सहज
ओह
In reply to ते बिकादेशी आपलं बांग्लादेशी by परिकथेतील राजकुमार
ग्राहक मंचाकडे तक्रार
कसलं डोम्बलाच ग्राहक मंच? मी
In reply to ग्राहक मंचाकडे तक्रार by धमाल मुलगा
अहो मला तर मी जेन्व्हा
सद्ध्या
प्रीपेड का पोस्टपेड ?
आम्हाला आयडीयाच्या प्रिपेडचा
कॉर्पोरेट कार्ड वापरत
आयडिया
हरवल्या
In reply to आयडिया by पैसा
तक्रारीचे उत्तर : "पुन्हा चौथ्यांदा डोक्युमेंट सबमीट करा"
ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का?
ही एक चांगली organization
In reply to ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का? by निमिष सोनार
माझ्या एका मित्राने कोणताच
क्लायमॅक्स...