Skip to main content

डाव्या शेपटीचा मारुती

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 09/11/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , डाव्या शेपटीचा मारुती आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या शेपटीच्या आणि उजव्या शेपटीच्या मारुतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय?

वाचने 34374
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

=))

रो(खो)चक!! मला तर डाव्या शेपटीचा का उजव्या हे कधीच कळत नाही...काहीही असो, आरती केली अन शेवटी खोबरे किंवा गूळ मिळाला कि आपले काम झाले... अल्पा ढ स्वगतः असेच 'वानरसेनेत' सामिल व्हावे माउ, हव्या तेवढ्या नकला करायचा परवाना मिळतो!

__/\__

_/\_

कशी सुचतात बिडंबनं? धन्य आहेस. जास्त काही लिहित नाही कारण ब्रम्हचार्‍याबद्दल धागा आहे हा!;) पाशवी शक्तींना म्हणे हणमंतराव घाबरायचे?

या धाग्याला नि त्याच्या कर्त्याला शिसानविवि. अवांतर : या वरून आठवले. आमच्या एक मारकुट्या शिक्षिका होत्या. जर कधी "प्रचंड महिलांची संमेलने" भरती तर त्या आटोमेटीक अध्यक्षा बनत्या. वर्गाची पूर्ण चाळीस मिनिटे खुर्चीत बसून शिकवायच्या. पण जर कधी खुर्चीतून उठल्या तर.... वर्गाची कंबख्ती. त्यांना जे नाव ठेवले होते ते या संदर्भात यथार्थ आहे : "बसला की गणपती, उठला की मारुती" ;-)

आतापर्यंत हनुमान मला नॉर्थ इंडियन वाटला होता.पण विकिपिडियानुसार (http://en.wikipedia.org/wiki/Hanuman ) तो मराठी असावा. जन्म त्र्यंबकेश्वरचा आहे. हनुमान चालिसा हिंदीत असली तरी म्हणायला हरकत नाही आता.

धाग्याचं विडंबन आणि सगळ्या प्रतिक्रियांचं पण डिट्टो विडंबन. परा आपण श्रेष्ठ रचनाकार आणि कर्ताकरविता आहात. मूळ धागा काढणार्‍यांना 'शूचिर्भूत' झाल्यासारखे वाटत असेल नै ?

पराशेट, या अँटिक स्पिरिच्युअल धाग्याद्वारे तुम्ही अंधविश्वास पसरवीत आहात! ;)

In reply to by पैसा

पैसाताई, ते काही असले तरी हा माणूस भरपूर प्रतिसाद घेउनच जातो. आपण पाशवी आहोत पण जमेल का हे असं काही करणं?;) डोक्यात गदा घातली हणमंतरावांनी तर? हा विचार केला जाईल कि नाही? अवांतर: परिकथेतील राजकुमारी आली कि असे धागे येणं बंद होइल.;)

In reply to by रेवती

पराशेटना सांगावं लागेल, की आधी "डाव्या शेपटीचा मारुती" कोणालातरी देऊन टाका आणि "श्रीदेवी महात्म्य" वाचायला सुरुवात करा!

In reply to by पैसा

मच्याक ... पच्याक ... उगाच कशाला मताची पिंक टाका म्हणून इथेच थांबते.

हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म पराला याची जरूरी आहे. (कुठली देवी प्रसन्न होणार कुणास ठाउक. Sorry Sorry. हा कुठल्या देवीला प्रसन्न होणार हे बघीतले पाहीजे.)

हा धागा मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत चालला आहे. पण विषयच मारुतीच्या शेपटाचा असल्यामुळे हे विषयाशी सुसंगत आहे. असो. शेपटीच्या टोकाशी निरखून बघितले तर आपल्याला एक ढकार स्पष्ट दिसेल. ढकार म्हणजे काय? आपण निर्बुद्ध माणसाला ढ म्हणतो. पण त्याचा इथे काही संबंध नाही. ढकार म्हणजे ढेकर. तृप्तीचे, समाधानाचे एक प्रतीक. तर हा ढकार ज्या शेपटावर दिसेल तो सौम्य मारुती समजावा. अशा मारुतीच्या भक्तीमुळे भक्त ढकार पावतो. पंचपक्वांनांचे जेवणही ह्या ढकाराशिवाय अपूर्ण वाटते. गची बाधा झालेल्या देवापेक्षा हा 'ढ'कारी देव लोकांना जास्त भावतो. असो. जर उलटा ढकार दिसला तर काय? ह्याचा अर्थ अन्न घशाशी येणे, आम्लपित्त वगैरे. तर असा मारुती एकदम कडक! भक्तांनी जपून असावे. विशेषतः पित्तप्रवृत्तीच्या भक्तांनी अशा मारुतीपासून लांबच रहावे. पेगवेडा

डाव्या शेपटीचा मारुती ने उजव्या सोंडेच्या गणपतिस प्रतिसादाच्या बाबतित मात दिली.. आजपासुन आम्हि मारुति भक्त झालो

एकदा रजनीकांतला मॅच मधील शेवटच्या एका बॉल मध्ये २३ रण करायचे असतात. तो काय करेल ? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . तो एकच सिक्सर मारतो. पण बॉलचे चार तुकडे होऊन ते स्टेडीयमच्या बाहेर जातात. अप्मायरला ४ सिक्स डीक्लेर करण्यावाचून पर्याय नसतो. पराने एक बॉल मध्ये किती सिक्सर मारल्या ?

डाव्या शेपटीच्या मारुतीच्या लेखावरचे प्रतिसाद चिंचोळे होत-होत डावीकडे न जाता उजवीकडे कसे गेले हे मात्र कळले नाहीं!

अरेच्चा! फोटोतल्या मारुतीची शेपटी त्याच्या उजवीकडेच आहे!

_/\_ पराशेट, धन्य आहात.

सध्या सगळ्यात उजवीकडचा प्रतिसाद पेशव्यांचा आहे.

मारुति शेपटि हलवत होत, लगेच कोन्तरि sanp घेतला. थोड्या वेळानि काढला. अस्ता तर शेपुट दुसरिकडे अस्ले असते.

हा धागा वर काढत आहे. फर्मास विडंबन आणि उडवणार्‍या प्रतिसादांचे उत्तम उदाहरण म्हणून नक्की यावे ;)

अब्बा ... मिपा पे लोगा इतना चिंधिगिरी करता ?