काय म्हणालात? रेषेवरची अक्षरं? ते काय असतं बॉ? आमची ही अक्षरं रेषेवरची काय, रेषेखालचीही नाहीत..! ही आहेत केवळ वेडीवाकडी अक्षरं.. आमच्या अनुभवविश्वातली..!
सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलिशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!
सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपाणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रुटीन कर्यक्रम सुरू होता..
"ए तात्या भडव्या चकणा दे ना.. भें**.. केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"
कुणा गिर्हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..
'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?
ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..
"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं..! " असं म्हणून तो थोडासा ओशाळा हासला..
त्याक्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..
हा कोण?, कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधूनमधून मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं संभाळत होतो..
भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..
"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी, सॉरी, रेषेवरची शिवी घातली होती.. ;)
"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."
माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.
मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारीटाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला अडकून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!
सर्वांवर उपाय एकच. पोलिस मयत व्यक्तिला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !
एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैशे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!
"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"
ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, भडव्या आज आमलेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहितरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..
मध्यम उंची, कुरुप चेहेरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहेरा मात्र विलक्षण बोलका..!
" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"
"नको रे. मी देशी पीत नाही.."
थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे भोसडचोदीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"
एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????
"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरूण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."
"मग..?"
"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडविचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"
मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"
"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्यावर बसलेला असतोस..!"
दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखसवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!
"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!
"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..
"आमच्यात असाच रेट सांगतात..!"
पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..
"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."
सारं काही भिवाच बोलत होता..!
मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..
"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."
थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!
मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -
"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहेरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."
का माहीत नाही, पण माझा भिवावर अन् भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!
त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..
कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!
- तात्या अभ्यंकर.
वाचने
10427
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता ह्याला क्वांटीटी म्हणायचं
बाप रे
हम्म.
In reply to बाप रे by चिरोटा
+१
हेच म्हणतो...
In reply to +१ by पिवळा डांबिस
जिंदगी कैसी है पहेली..
In reply to हेच म्हणतो... by चिगो
+१
In reply to हेच म्हणतो... by चिगो
तात्यानू..
In reply to +१ by संजय अभ्यंकर
हम्म!
+१
बापरे!!! काहीच सुचत नाहीये..
बापरे !!! असं काही काम असतं
वेगवान आणि वेगळे व्यक्तीचित्र
सहमत.. नेहमीपेक्षा वेगळे
In reply to वेगवान आणि वेगळे व्यक्तीचित्र by बेसनलाडू
सहमत
In reply to सहमत.. नेहमीपेक्षा वेगळे by भडकमकर मास्तर
खेदजनक
In reply to वेगवान आणि वेगळे व्यक्तीचित्र by बेसनलाडू
बेला आणि श्रामो, आपल्या
In reply to खेदजनक by श्रावण मोडक
स्वागत
In reply to बेला आणि श्रामो, आपल्या by विसोबा खेचर
सहमत आहे
In reply to स्वागत by श्रावण मोडक
धन्यवाद बेलाजी..! तात्या. (
In reply to सहमत आहे by बेसनलाडू
तात्या तुम्ही
In reply to बेला आणि श्रामो, आपल्या by विसोबा खेचर
जबरदस्त! तात्यांचा
तात्या, साल्या का लिहितोस
भीषण आहे हे!
बापरे...
हम्म्म्म्म्म्म्म्म! मुम्बैतल्
हम्म. आमच्या ओळखीतले एक ससून
जबरी लेख तात्याचे लीखान
सुन्न..
एका वेगळ्याच व्यक्तीचरित्राची
सुन्न.. एकदा एक पोस्ट मॉर्टम
बरचसे डॉक्टरसुद्धा दारु पिऊन
In reply to सुन्न.. एकदा एक पोस्ट मॉर्टम by मराठमोळा
>>बरेचसे म्हणजे नक्की प्रमाण
In reply to बरचसे डॉक्टरसुद्धा दारु पिऊन by भडकमकर मास्तर
सुन्न..
बापरे
छान व्यक्तिचित्र. श्रामो,
झिणझिण्या..
मस्त किस्सा दाढेसाहेब..
In reply to झिणझिण्या.. by डॉ.प्रसाद दाढे
सुन्न करणारे लेखन! या
प्रकाटाआ
अनुभव.
प्रतिसाद देणार्या सर्वांचा
वा! तात्या छानच लेख. शिवाला