उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला.
तुम्ही केलेल्या जबरदस्त विश्लेषणावरून दिसतंच की मूकवाचक तब्बलजी भी है!
आता तुमचीच एक क्लीप टाका इथं.
अवांतरः उस्ताद झाकीर हुसेन फिल्मिंडस्ट्रीत हिरो के तौर पर आते तो भी सितारा बनते. व्हेरी हॅण्डसम अॅण्ड डिसन्ट गाय.
उस्ताद झाकीरांच्या एका अत्यंत दर्दी अभ्यासक चाहतीने केलेले (हे) अप्रतिम लिखाण यावरून आठवले.
धन्यवाद यशवन्त जी.
"उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला" - हेच महत्वाचे.
लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वाचे मन:पूर्वक आभार.
तबला वादनाच्या क्षेत्रात प्रत्येक घराणे स्वतन्त्र लेखच काय तर लेखमालेचा विषय ठरेल इतके समृद्ध आहे. तेच तबला वादकान्चे. प्रत्येकावर स्वतन्त्र लेखमाला लिहावी असे कित्येक दिग्गज वादक होऊन गेले आणि आजही आहेत. तेव्हा या विषयावर इतके सविस्तर आणि विद्वत्तापूर्ण लिहीणे म्या पामराचे काम नव्हे. मी आधीच लिहिल्याप्रमाणे मला मनापासून ऐकण्याची आवड असली, तरी या विषयात माहिती जुजबी स्वरूपाचीच आहे.
या त्रोटक लेखमालेला 'श्रीगणेशा' केला असे आपण समजूया. इथे प्रतिसाद देणार्या रसिक श्रोत्यानी जी घराणी आणि वादकान्चा उल्लेख केला त्यान्च्याबद्दल इथे सविस्तर प्रतिक्रिया देणे, स्वतन्त्र लेख लिहीणे असे केल्यास ही मालिका पुढे चालूच राहिल. शक्यतो या क्षेत्राला ग्रासून टाकणारी अतिरेकी व्यक्तीपूजा टाळली, श्रेष्ठत्वाचे वाद टाळले आणि लिखाणाला छोट्याछोट्या ध्वनिचित्रफितीन्ची जोड दिली तर उपयुक्त ठरेल एवढेच नम्रपणे सुचवतो.
बाकी चू.भू.दे.घे.
तबला वादनात (आणि शिष्य घडवण्यात) आजच्या पिढीतील एक महत्वाचे नाव आहे तालयोगी पं. सुरेश तळवळकर. त्यांच्या उल्लेखाशीवाय हा लेख नक्कीच अपुर्ण आहे. पुढील ५ मिनीटाचे क्लिपींग पुर्ण बघावे.
http://www.youtube.com/watch?v=5XFZ_NXTPHY
प्रतिक्रिया
उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर
धन्यवाद ...
तालयोगी पं. सुरेश तळवळकर
बहोत अच्छे.. कृपया अजूनही
तात्या. बरोबर.