मी घरी उजव्या सोंडेची मूर्ती आणली आहे हे ऐकून आईने सल्ला दिला होता मग निदान पूजा तरी करू नकोस. मी करते ते वेगळं. पण मिपावर संशयाचं निराकरण झालं.ज्यांनी कोणी मत प्रदर्शन के ले त्या सर्वांचे आभार
सर्वप्रथम या विषयावर काहीही पारंपारिक ऐकिव माहिती लिहिली तरी अंधश्रध्दा पसरवण्याचे पातक लागेल. तरी जे ऐकले आहे ते सांगतो.
उजव्या सोंडेच्या गणपतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात.
माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही.
उजव्या सोंडेच्या गणपतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात
माझी कडक सोवळ्यात पूजा करा नाहीतर माझ्या कोपाला सामोरे जा असे म्हणणारा आणि मला खंडणी द्या नाहीतर माझ्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांना सामोरे जा असे म्हणत खंडणी उकळणारा गुंड याच्यात फरक तो काय? छे हो आमचा देव असा स्वत:च्या इगोसाठी शिक्षा करायला बसलेला नाही.
दगडाच्या मूर्तीची सोवळ्याने पूजा करा किंवा करू नका किंवा श्रीराम लागूंप्रमाणे "मी एका दगडापुढे उभा होतो त्या दगडाला लोक पांडुरंग म्हणतात" असे म्हणा देव आपल्याला केवळ ’त्याच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली नाही’ म्हणून शिक्षा करेल यावर कसा काय विश्वास बसतो हेच समजत नाही.
माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही
अगदी असेच.
(देवावर विश्वास ठेवणारा पण दगडाच्या मूर्तीत देव नाही असे मानणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
ताई मुर्ति कुठलिही आसोदे
तीच्या समोर दोन मिनीटे
डोळे मिटुन हात जोडुन उभे रहा
जि मुर्ती तुमच्या डोळ्यासमोर
(येथे आपल्या आईची मुर्ती देखिल } येईल
तीला मनापासुन नस्कार करा
बघा! आत्म शांती जरुर मिळेल
बाकि सब झुट हे
एक ....गावरान दगड ( शेंदुर नसलेला )
कर्मकांडाशिवाय आपण जगू शकत नाही. रोजच्या त्याच त्या गोष्टींत आपण काहीतरी एक्सायटिंग शोधतोच ना? मग उजव्या सोंडेचा गणपती, उजव्या वळणाचा शंख, एकमुखी रुद्राक्ष,शनि अशा ब-याच गोष्टींना असा जरा "कडक असतं बरं का" चा तडका दिला जातो. थ्रिल हो शुचि ताई..थ्रिल..
बरंच कुटून झालेलं आहे. उजव्या सोंडेच्या गणेशाचं सोवळं कडक असतं ही ऐकीव माहिती आहे पण त्यामागच्या शास्त्रार्थाबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्या बाजूस जाणे टाळतो.
माझा अध्यात्माचा अजिबात अभ्यास नाही मात्र आणखी एक मुद्दा मांडावासा वाटला म्हणून सांगतो. तो म्हणजे 'ओंकारप्रधान रूप गणेशाचे/ ॐकारस्वरूपा' अशा शब्दांत गणेशाला ज्या कारणे वर्णीले जाते ते, अर्थात श्रीगणेशाचं ॐकारस्वरूप. गणेशाचा मंत्रसुद्धा "ॐ गं गणपतये नमः" असा आहे अर्थात बीज 'गं' हे आहे. तर गणेशाच्या सोंडेला नेहमीच गकार असतो. सोंड उजवीकडे वळलेली असो डावीकडे वळलेली असो, तिला असलेल्या गकाराशिवाय गणेशाचं ॐकारस्वरूप हे अपूर्ण आहे. सोंड उजवीकडे वळली तर उजव्या सोंडेचा डावीकडे वळली तर डाव्या सोंडेचा असं मानण्यात येतं. उजव्या सोंडेच्या मूर्तींमध्ये सोंडेचा गकार स्पष्ट दिसतो तर डाव्या सोंडेच्या मूर्तीतही सोंडेचं टोक हे गकारातच असतं. लालबागचा राजा असो की अष्टविनायक असोत, शुंडागकाराशिवाय गणेशाचं ॐकारस्वरूप अपूर्ण आहे हेच खरं.
आणखी जाणत्यांना विचारून काही माहिती मिळाली तर कळवतोच. विषय इंटरेस्टिंग आहे.
उजवी सोंड आणि डावी सोंड यांचा भावार्थ
उजवी सोंड : उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणमूर्ती ऊर्पâ दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपति ‘जागृत’ आहे असे म्हटले जाते. दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्याची छाननी होते; म्हणून ती बाजू नकोशी वाटते. मृत्यूनंतर दक्षिणेकडे गेल्यावर जशी छाननी होते तशी मृत्यूअगोदर दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (किंवा झोपतांना दक्षिणेकडे पाय केल्यास) व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक (रज) लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्त्विकता वाढते व दक्षिणेकडून येणार्या रजलहरींचा त्रास होत नाही.
डावी सोंड : डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम म्हणजे डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर बाजू अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति’)
अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच आहेत.
जैनांच्या तीर्थंकरांच्या बाबतीत तर मूर्तीचे डोळे उघडे आहेत की झाकलेले यावर आधारीत राहून पुजा करणारे दोन वेगळे पंथ आहेत.
हे डोळे झाकलेल्या मूर्तीची पुजा करणारे लोक डोळे उघडे असलेल्या मूर्तीकडे बिलकुल फिरकत नाही.
आता मूळ महावीरानं डोळे कधी झाकले असतील, कधी उघडे ठेवले असतील - पण नाही!
श्वेतांबर आणि दिगंबर ते तर वेगळेच !
तसं पाहायला गेलं तर गणपतीनेपण (तो झाला असलाच तर! कारण मूळ माणसासारखे डोके असलेला गणेश, त्याला पुन्हा हत्तीचे तोंड बसवण्याची सर्जरी महादेवरांवानी कशी केली, चार हात कसे आले वगैरे भानगडी आहेत ) सोंड कधी उजवीकडे वळवली असेल कधी डावीकडे!
हत्ती नाही सतत सोंड फिरवत राहात?
एवढं सिरीयस घेण्यासारखं काय आहे त्यात?
अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच आहेत..
मान्य नाहि.................हे वाचा..
....................................................
अमेरिकन जेनेटिक असोसिएशनचे एक शास्त्रीय नियतकालिक (जर्नल) निघतेThe journal of heredity त्याच्या 75:152-154-1984 या अंकात मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या alain fo corcos यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता.त्या लेखाचे नाव होते.Reproduction and heredity beliefs of the hindus based on their sacred books.'
या लेखात मनुस्मृती,वराहमिहीराची बृहतसंहीता आणि मुख्यत्वे बृहदारण्यक उपनिषदाच्या संतानोत्पत्तीसाठी विशिष्ट प्रकारच्या आहाराची गरज असल्याचे सांगितले आहे.
बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की, १) एका वेदाचे ज्ञान असलेल्या पूर्णायू गौरवर्णीय पुत्रप्राप्तीसाठी दूध, भात आणि तूप असे भ्जन स्वत: आणि आपल्या पत्नीने घ्यावे.
२) कपिलवर्णीय ,दोन वेदांचे ज्ञान असलेल्या पूर्णायू पुत्राच्या प्राप्तीसाठी दहीभात आणि तूप असे भोजन पती पत्नींनी घ्याचे.
३) तीन वेद जाणणार्या श्यामवर्णीय पुत्रप्राप्तीसाठी पाण्यातील भात अआणि तूप असे भोजन पत्नीबरोबर घ्यावे.
४) पूर्णायू विदुषी कन्याप्राप्तीसाठी तीळ आणि तांदळाची खिचडी करून पत्नीला खाऊ घालावी
५) आपला पुत्र चारही वेदांत पारांगत व्हावा व प्रसिद्ध विद्वान व्हावा अशी इच्छा धरणार्यांनी उडीद व तांदळाची खिचडी करून, त्यामध्ये ॠषभ नावाचे औषध मिसळून पत्नीसोबत खावी..
फ़्रांस आणि कॅनडाच्या फिजिशिअन्सच्या अभ्यासातून हे सत्य आहे हे सिद्ध होते
विशिष्ट आहार विहारामुळॆ होणार्या परिवर्तनामुळे एक्स आणी वाय या शुक्राणूंच्या मिलनप्रक्रीयेवर परीणाम होत असावा.
या अभ्यासावरून असे दिसते की, प्राचीन उल्लेखांची उपेक्षा न करता त्यामध्ये महान सत्य दडलेले असेल असे मानावे लागेल.त्यांचे ज्ञान आपल्याला नाही आणि ते झाल्यावर कदाचित मानवाचे अधिक कल्याण साधणॆ शक्य होईल.
ठीक आहे!
अमेरिका, फ्रान्स, कॅनडामध्ये या संशोधनावर आधारीत राहून नवे गणपती किंवा तसलेच प्रकार जन्माला येण्याची वाट पाहु!
नाही आले, तर संशोधन बोगस किंवा यूसलेस!
आपल्या वेदात व उपनिषिदात सगळे शोध लावुन झाले होते. फक्त ते नजरेसमोर पाश्चात्य लोकांनी आणले.तुम्ही आता खुप खुप वेदांचे वाचन करा व कोणता तरी नवा शोध लावा.तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहेत.
मूळ चैतन्य एकच्,त्याचे आविष्कार अनेक.
आपण भेद करु नये.इतर देवता॑बद्दल पण भिन्नता आढ्ळेल.
१-एकमुखी दत्त,तीन मुखी दत्त इत्यादि.
२-काळा राम्,गोरा राम्,धनुर्धारी राम्,सि॑हासनाधीश राम इत्यादि.
रुपे अनेक आहेत पण चैतन्य एकच.
आपला शुद्ध भाव असणे गरजेचे.
प्रतिक्रिया
+१
मी घरी उजव्या सोंडेची मूर्ती
उजव्या
+१
ताई
कर्मकांडाशिवाय आपण जगू शकत
उजव्या सोंडेच्या गणपतीला
गकार
फार छान माहीती! हे माहीत
शुचीच्या गणपतीची सोंड वरच्या
उजवी सोंड आणि डावी सोंड यांचा
अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच
अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच
ठीक आहे! अमेरिका, फ्रान्स,
हो हो अविनाश भाऊ
रोचक!! मला तर डाव्या सोंडेचा
नेहमीप्रमाणेच 'अँटीक
ऊजव्या सोंडेचा गणपती
प्रा. सुभाष पवार यांचे मत
गणपती