नमस्कार मित्रांनो,
बऱ्याच दिवसानंतर आज मिपावर लिहितो आहे. माझ्या एका प्रकल्पावर काम सुरु असल्याने लेखन करता आले नाही तरीही एखादी तरी चक्कर मिपावर असतेच.
असो, वर्ल्डवाईड इनोव्हेटीव एज्युकेशन फोरम 2010 साठी माझी निवड केप टाऊन येथे झाली होती. दिनांक 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. संबंधित फोरमसाठी देशातून ९ प्रकल्प निवडले होते. त्यात महाराष्ट्रातून माझा एकट्याचा प्रकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. सदरील स्पर्धा ही वर्ग अध्यापनात संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयी असते. सदर स्पर्धा देशपातळीवर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आयोजीत करीत असते. या वर्षी २ लाखाच्या वर शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील प्रत्येक राज्यातून 10 प्रकल्प देशपातळीवर निवडून त्यातील १० प्रकल्प आंतरराष्ट्रीय परीषदेसाठी निवडले जातात. थोडक्यात भविष्यातील शाळा कशा असतील याबद्दल हे प्रकल्प असतात. यावर्षी ८५ देशांमधून ५५० शिक्षक यात सहभागी झाले होते. इतर देशांतील शिक्षणक्षेत्रातील प्रगती पाहता आपल्याला अजूनही खूप काही करण्यासारखे आहे हे जाणवते.
उदा. दक्षिण अफ्रिकेतील सर्व शिक्षकांना तेथील सरकारने लॅपटॉप पुरविले आहे. ऑस्ट्रियातील एका शिक्षकाचा प्रकल्पात त्याच्या वर्गातील सर्व विद्याथ्यांकडे टॅब्लेट पी.सी. होते. सहभागी शाळांपैकी बहुतेक सर्व शाळांमध्ये व्हाईट बोर्ड (इंटरऍ़क्टीव्ह) चा वापर केला जाते. इंटरनेट तर सर्व ठिकाणी वापरलेच जाते.आपण किती दिवस खडू फळा या साहित्यांनी शिकविणार आहोत. शिक्षणक्षेत्रात अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आपण एखादी शाळा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवू शकतो. जेणेकरुन त्यावरुन मिळणाऱ्या रिझल्टवरुन ही गोष्ट आपल्याला परवडेल की नाही ते कळू शकेल.
संबंधित कार्यक्रम हा जगातील नवोपक्रमशील शिक्षकांसाठी एक पर्वणी असते. दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मागील दोन वर्षापासून महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.
फोरममध्ये जगातील शिक्षक कोणकोणते नवीन प्रकल्प वर्गात राबवितात याची माहिती मिळाली. बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यातून आपल्या येथेही काही प्रकल्प राबविता येतील पण भौतिक सुविधांचा अभाव असल्याने यावर मात कशी करावी हा प्रश्न आहे. मला माझ्या शाळेवर असा एखादा प्रकल्प राबवायचा असल्यास आर्थिक मदत दानशूर व्यक्तींकडून होऊ शकेल काय ?
![]() |
| From Cape Town |
वाचन संख्या
2292
प्रतिक्रिया
12
मिसळपाव

प्रतिक्रिया
सविस्तर लिहीले तर समजू शकेल
तुम्हाला व्हाईट बोर्ड
साधारण ७०००० पर्यंत किंमत
In reply to तुम्हाला व्हाईट बोर्ड by शुचि
अधिक माहीती?
मी ग्रामीण भागातील जिल्हा
In reply to अधिक माहीती? by विकास
मुख्य म्हणजे मुलांच्या
In reply to मी ग्रामीण भागातील जिल्हा by अनिल सोनुने
कौतुकास्पद उपक्रम...पुढिल
In reply to मी ग्रामीण भागातील जिल्हा by अनिल सोनुने
व्वा सर...! मस्त भरारी घेत
मस्तच..
WWIEF मुळे हा लेख wrestling
तुमच्या प्रकल्पाबद्दल लिहा
स्तुत्य उपक्रम