'गरीब व श्रीमंतांना कॉंग्रेसच एकत्र आणू शकते'
माननीय युवराज राहुल गांधी यांनी नुकतेच 'फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात.' असे विधान केले, तसेच 'सध्या देशात दोन हिंदूस्थान निर्माण झाले आहेत. एक अतिशय वेगाने प्रगती करतो आहे आणि दुसरा गरिबीमुळे अडचणीत आला आहे.' हेही मान्य केले. इतके मान्य करून पुन्हा आपल्या पक्षाची जाहिरात केली.
'या दोघांनाही एकत्र आणण्याचे काम फक्त कॉंग्रेसच करू शकते.'
त्यामुळेच कदाचित काही राजकारण्यांनी गेली साठ, (sorry ६०-१५=४५) गेली ४५ वर्षे भारत प्रगत होण्यासाठी जास्तीत जास्त गरीब तयार करण्याची जबाबदारी पार पडलेली आहे.
काहीना याची माहिती नव्हती. ती माहिती करून दिल्याबद्दल माननीय युवराज यांचे अभिनंदन.
फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकत असल्याने सर्वांना गरीब होण्याचे आमच्या तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
तर मित्रांनो,
चला उठू, भारत गरीब बनवू, देशाची प्रगती करू.
मला काही प्रश्न पडले आहेत. जमले, वेळ मिळाला तर उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करू शकता.
१) CWG कोणत्या हिंदुस्तानासाठी झालेले होते ?
२) लवासा कोणत्या हिंदुस्तानासाठी होत आहे ?
३) आदर्श गृहप्रकल्पात कोणत्या हिंदुस्तानची घरे आहेत ?
४) राजकारणांत प्रवेश घेण्यासाठी (केवळ प्रवेश नाही, तिथे प्रवेश करून जिवंत राहण्यासाठी) कोणत्या हिंदुस्तानात जन्म घ्यायला हवा ?
५) पांढरे दहशतवादी कोणत्या हिंदुस्तानात राहतात ? तसेच भगवे, निळे, हिरवे, काळे, पिवळे यांच्या बाबतीत सुद्धा विचारता येईल.
६) प्रगत हिंदुस्तानचा पत्ता काय आहे ? (काही नाही, तिथे जाऊन जरा एक चक्कर मारून येईल म्हणतो)
प्रगत हिंदुस्तान वासियांना, गरीब हिंदुस्तान वासियांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
तसेच (मिपावरील) प्रगत हिंदुस्तानात राहणाऱ्या लोकांना गरीब हिंदुस्तानात दिवाळी निमित्त फराळाचे आमंत्रण आहे.
फराळ : एक खव्याचा पेढा, जमल्यास थोडा चिवडा.
(खवा कोणता ? ते विचारू नका, आमच्या हिंदुस्तानात चौकातल्या हलावायीच्या दुकानात स्वस्तात स्वस्त जे पेढे मिळतात ते आम्हाला गोडच लागतात, )
वाचन संख्या
4613
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
+१
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
ठो ! +१
In reply to +१ by नितिन थत्ते
या बातमीत एक मजेदार गोष्ट
एकदम सहमत
In reply to या बातमीत एक मजेदार गोष्ट by सूर्याजीपंत
भावनांशी सहमत आहे. नेहरुभक्त
मतं पटोत अथवा न पटोत.
त्या राहुल गांधीत काय दिसतं काय माहित.
ज्या संजय गांधीना ;विरोध केला
In reply to त्या राहुल गांधीत काय दिसतं काय माहित. by पंख
बापाच्या पुण्यामुळे जन्मजात
In reply to ज्या संजय गांधीना ;विरोध केला by विजुभाऊ
तुमच्याशी सहमत आहे
In reply to त्या राहुल गांधीत काय दिसतं काय माहित. by पंख
युवराजानी गेली कित्येक दिवस फिरुन देश पालथा घातला आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
देशात दोन भारत आहेत हे माहीत
ह्म्म्म्म. हे झाले दोन
.
.
३ हिंदुस्थान
पण हे ३ वेळा कशाला लिहुन
In reply to ३ हिंदुस्थान by अविनाशकुलकर्णी
काहि कळत नाहि..एकदा क्लिकले
आवो
फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन
दोन काँग्रेस
आणिबाणी नंतर नव्हे.१९६९च्य
In reply to दोन काँग्रेस by विकास
बहुतांशी सहमत
In reply to आणिबाणी नंतर नव्हे.१९६९च्य by नितिन थत्ते
इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेस
In reply to आणिबाणी नंतर नव्हे.१९६९च्य by नितिन थत्ते
काँग्रेस !!
In reply to आणिबाणी नंतर नव्हे.१९६९च्य by नितिन थत्ते
हिंदूस्थान A : अमीर
खवा
http://72.78.249.107/esakal/2
सध्या देशात दोन हिंदूस्थान
दोन भारत
आजकालची नेत्यांची पोरं आणि
दोनच? हम्म्म...