राम राम मंडळी,
आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत.
ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा..
आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा.. नारायणराव बालगंधर्वांवर एक चांगला चित्रपट निर्माण करण्याचं पुण्य त्यांना लाभू दे, हीच शुभेच्छा..
या चित्रपटाची सांगितिक बाजू माझा मित्र कौशल इनामदार सांभाळतो आहे.
नारायणराव गौहर्जानला गाणं शिकवताहेत, असं एक दृष्य त्या चित्रपटात आहे. भास्करबुवांच्या यमनातील 'हारवा मोरा..' या बंदिशीवर आधारीत असलेलं अजरामर नाट्यगीत - 'नाथ हा माझा..' ते गौहरजानला शिकवताहेत..
मुंबैच्या एका ष्टुडियोत आजच याचं रेकॉर्डिंग असून नारायणरावांच्या प्लेबॅककरता आनंद भाटे गाणार आहे तर गौहरजानच्या प्लेबॅक करता वरदा गोडबोले गाणार आहे..
माझा मित्र आदित्य ओक याने हा योग जुळवला आहे. आनंद भाटे हा अत्यंत गुणी मुलगा असून आमच्या अण्णांचा शिष्य आहे. लहानपणी तो नारायणरावांची पदं फार सुरेख गायचा.. माझी गुरुभगिनी सौ वरदा गोडबोले हिलाही 'नाथ हा माझा'ची उत्तम तालीम स्व माणिकताईंकडून मिळाली आहे.. कौशलसहीत या सगळ्या मित्रमंडळींचा मला अभिमान वाटतो..
आज सकाळीच मी फोन करून आनंदला व वरदाला शुभेच्छा दिल्या.. नारायणरावांची पदं गाण्याचं पुण्य खरंच खूप थोर..!
'कुणी मत देता का मत..?' या हल्लीच्या समसच्या जोगव्याच्या जमान्यात वरदा, आनंद सारखी मंडळी सश्रद्धतेने साधनारत आहेत, हीच माझ्या मते खूप मोठी गोष्ट आहे.
नितिन देसाई, कौशल इनामदार यांच्या सार्या टीमला नारायणरावांचा आशीर्वाद लाभावा व एक चांगला चित्रपट त्यांच्या हातून घडावा हीच मनोमन प्रार्थना..!
नारायणरावांचं 'नाथ हा माझा..' मात्र आजही तेवढंच खूप ताजंतवानं वाटतं. ते कृपया इथे ऐका व पुण्य मिळवा..
(बालगंधर्वप्रेमी) तात्या.
वाचने
6814
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रपटाची आतुरतेने वाट पहात
वाह ! संपुर्ण युनिटला
अरे वा!
सुबोध भावे..
In reply to अरे वा! by सहज
अच्छा
In reply to सुबोध भावे.. by विसोबा खेचर
आमच्या भावना...!
शुभेच्छा...
शुभेच्छा...
नारायणराव
होय... कालच फेसबुकात सुबोध
शुभेच्छा!
या
+१
In reply to या by समंजस
माझ्याकडून पण शुभेच्छा.
हो
हार्दिक शुभेच्छा!
अरे वा!
वाहवा.
(विषय दिलेला नाही)
ही आठवण सांगायलाच पाहिजे अशी
सुंदर प्रतिसाद, धन्यवाद
In reply to ही आठवण सांगायलाच पाहिजे अशी by जयंत कुलकर्णी
छान आठवण. माझ्या आजीच्या लेखी
In reply to ही आठवण सांगायलाच पाहिजे अशी by जयंत कुलकर्णी
बाल गन्धर्व
बाल गन्धर्व
संपुर्ण युनिटला शुभेच्छा.