आता हा प्रकार मात्र थोडा वेगळा.
माझी मुलं याला lantern snacks म्हणतात.
सामग्री :-
१ वाटी रवा
१ वाटी मैदा
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून ओवा
साधारण एक टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर
अर्धा टेबल स्पून चिरलेला कढीपत्ता.
१ टेबल स्पून खिसलेल खोबर
२ टी स्पून तीळ
२ hiravya मिरच्या छानश्या बारीक काप करून
१ टेबल स्पून कच्चे शेंगदाणे खल बत्त्यात जाडसर कुटून.
१ टेबल स्पून तूप ( मोहन घालण्या साठी)
मीठ अन थोडीशी साखर.
तळण्या साठी तेल.
कृती:-
रव्याला तूप गरम करून मोहन घालून घ्या. आता वरील सर्व जिन्नस त्यात मिसळून थोड्याश्या गरम पाण्यान सैलसर पीठ भिजवा.
थोडं वेळ सेट होऊ द्या .
आता या मिश्रणाचा एक थोडा छोटा गोळा घेऊन खलबत्त्यात कुटून घ्या. असे सर्व गोळे कुटून झाले की पाती लाटायला घ्या.
अगदी छान पातळ पात लाटून घ्या अन ती वर असे प्रथम मोट्ठे चौकोन वां आयत कापून घ्या. आता प्रत्येक आयताच्या आत आपण आकाश कंदिलाला कशी बोर्डर सोडून कापतो तश्या चिरा दया .
दोन्ही बाजूने मुडपून हा घ्या आकाश कंदील !
तेल गरम करून साधारण ब्राऊन कलर वर तळून घ्या.
झाले 'अरगट' तयार !
(नेहमीच्या पदार्थांपेक्षा माझा हा पदार्थ उगाचच भाव खाउन जातो.)
| From Drop Box |
| From Drop Box |
| From Drop Box |
| From Drop Box |
वाचने
8183
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी..
छान
ते अरगट वेगळे... धान्यावर
In reply to छान by नितिन थत्ते
नितीनजी, आपल्या अवांतराबाबत
In reply to छान by नितिन थत्ते
जागोमोहनप्यारे आणि वारकरी
In reply to नितीनजी, आपल्या अवांतराबाबत by वारकरि रशियात
हाऊ कँडिड
In reply to जागोमोहनप्यारे आणि वारकरी by नितिन थत्ते
सार्या शेत भर हेच तर असत,
In reply to जागोमोहनप्यारे आणि वारकरी by नितिन थत्ते
मस्त आहे ही पाकृ. रवा बारीक
थँक्स स्वाती२ . मी नेहमीचाच
In reply to मस्त आहे ही पाकृ. रवा बारीक by स्वाती२
छान! वेगळाच पदार्थ!
मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!
ए सगळीकडे आपल चोप्य पस्ते
In reply to मस्त! टोण्डाला पाणी सुटलं! by इंटरनेटस्नेही
वा छानच दिसतोय हा फराळ देखील.
याला
अरेवा मस्त वेगळाच प्रकार आहे.
ही तर ' चंपाकळी'...
छान दिसतोय प्रकार. करुन
ए याला चंपाकळी पण म्हण्तात ना!>>/???
सर्वांचे आभार! नशिबान फराळाचे
हो ही चंपाकळीच आहे.
एक्दम आव् दलि, वेग् लि आहे
मस्तच