कल्याण-डोंबिवली मध्ये निवड्णुकीच्या निमित्ताने नुसती धूमशान उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाक्यानाक्यावर पक्ष कार्यकर्ते आणि पांढर्या कपड्यांमधले उमेदवार, जागोजाग चालू असणारे पैशांचे वाटप आणि राडेबाजी यांना उत आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या प्रमाणावर महत्व आलेले पहिल्यांदीच पाहात आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे यांच्यातला लढतीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झालीच आहे आणि शिवाय वर्षभरानंतर होणारी मुंबई महापालिका आणि दीड वर्षानंतर होणारी ठाणे महापालिका निवडणूक असल्यामुळे आजची निवड्णूक ही सेमीफायनल असल्याचे बोलले जात आहे. रा.रा. श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीआधी सात-आठ दिवस त्यांचा डोंबिवलीतच मुक्काम होता. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या गडाला यावेळी खिंडार पडणार हे निश्चित. गेल्या पंधरा वर्षांमध्ये शिवसेना-भाजपा युतीने या शहरद्वयीचे ज्या पद्धतीने भजे केले आहे ते पाहून लोकांचे पित्त खवळले आहे आणि त्यामुळे त्यांचे पारंपरिक मतदार या खेपेला त्यांना दगा देणार याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. म.न.से. ची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे जर मनसे सत्तेवर आली तर या शहराच्या स्थितीत फरक पडेल अशी आशा वाटते. कारण वारंवार या शहराचा मी कसा कायापालट करुन दाखवला ते पाहा, मी मॅजिशियन आहे असे सांगून मुंबई महापालिका आणि ठा. महापालिका निवड्णुकीत ते मतांचा जोगवा माङणार हे निश्चित. ते काही का असेना डोंबिवलीतले लोक आता इतके मेटाकुटीला आले आहेत की हेतू काहीही असो लोकांना बदल हवा आहे.
मनसेची स्थानिक स्वराज्य संस्थेची पहीलीच निवडणूक? कदाचित मुंबई आणि आसपासच्या भागातील पहीलीच निवडणूक असे म्हणत असाल तर ठीक आहे . नाहीतर पुण्याच्या महानगरपालिकेत २ तरी नगरसेवक मनसेचे आहेत.
बाकी तुम्ही म्हणता तसं डोंबिवलीकर खरंच कंटाळले असतील तर शिसे-भाजपा ला पर्याय म्हणून मनसेकडे पाहण्यास काहीच हरकत नाही.
अतिशिवाजी प्रतिशिवाजी अफझलखान या शब्दप्रयोगांमुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं दिसतंय. संपादक मंडळाला मी विनंती करतो की हे शब्द त्यांनी संपादित करावेत. बाकी स्वतःच काढलेला कौल स्वतःलाचा संपादित करता येत नाही याचे कारण काय आहे?
प्रतिक्रिया
कल्याण-डोंबिवली मध्ये
मनसेची स्थानिक स्वराज्य
In reply to कल्याण-डोंबिवली मध्ये by अप्पा जोगळेकर
निकाल
In reply to मनसेची स्थानिक स्वराज्य by llपुण्याचे पेशवेll
कळ काढा ना ताई २ पर्यंत .....
In reply to निकाल by प्रिया देशपांडे
अगदी बरोबर !!!
In reply to कल्याण-डोंबिवली मध्ये by अप्पा जोगळेकर
अतिशिवाजी प्रतिशिवाजी अफझलखान
ईतर
फक्त ४०% मतदान झाले
हो. मी मतदान केले. नेहमीच
In reply to फक्त ४०% मतदान झाले by नितिन थत्ते
आप्पा