मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चकली भाजणी---

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य-- एक किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडीद डाळ, वाटीभर पोहे, एक डाव धने, एक डाव जिरे. कॄती----- तांदूळ व चना डाळ धुवून पसरुन ठेवावी, जरा वाळत आली की भाजायला घ्यावी, मुठ शेकी ( म्हणजे भाजणी खमंग न भाजता त्यातून चांगल्या गरम वाफ़ा येउ लागल्या की भाजणे बंद करावे.) , भाजणी नेहमी मंद आचेवर भाजावी,उडीद डाळ धुवु नये, तशीच भाजावी, धने - जिरे भाजावेत.पोहे भाजावेत. गार झाल्यावर बारीक दळून आणावी.

वाचने 5413 वाचनखूण प्रतिक्रिया 4

स्पंदना 29/10/2010 - 12:37
थँक्स निवेदिता ताई . या फराळाला मी तुमची काजु कतली करणार आहे. चकली भाजणी आजच तयार केली माझ्या पद्धतीने.

In reply to by ज्योति प्रकाश

निवेदिता-ताई 30/10/2010 - 08:42
ज्योती हा प्रकार नविन नाहीय, जुना पारंपारिक आहे, माझी आई हेच प्रमाण घेत होती.