II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
या पूर्वी -
सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..)
सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन)
सकाळची वेळ..
भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..!
राग भैरव..
आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग.. भक्तिरसातला परंतु गंभीर प्रवृत्तीचा.. याला थट्टामस्करी मंजूर नाही.. ना हा आमच्या यमनसारखा प्रसन्न, ना नंद - केदारासारखा अवखळ! स्वभावाने गंभीर असला तरी प्रासादिक!
हिंदुस्थानी रागसंगीताच्या घराण्यातला हा एक वडीलधारी बुजुर्ग राग..!
याचं सरगमगीत येथे ऐका -
याचा कोमल रिखब विचार करायला लावणारा.. क्षणात अंतर्मुख करणारा..! यातल्या गमधप संगतीबद्दल काय बोलायचं? किती अन् काय काय सांगून जाते ही संगती! याचा कोमल धैवत अन् तार षड्ज ही एक तपस्या आहे..! ही तपस्या स्वरभास्कर भीमसेन जोशींची, ही तपस्या महामानव बाबा आमटे यांची, ही तपस्या डॉ तात्याराव लहाने यांची, ही तपस्या तात्याराव सावरकरांच्या घरातल्या स्त्रियांनी पोटाची आग विझवण्याकरता स्मशानातले पिंड खाल्ले त्याची..!
ही तपस्या कुणा साध्वीची..!
राग भैरव.. हे हिंदुस्थानी रागसंगीताचं देणं आणि लेणं..! एक अजोड शिल्प..!
आंदोलनांचा आणि बेहलाव्याचा आणि सोनाराच्या भट्टीत घाव खाऊन अस्सल बावनकशी ठरलेला कोमल धैवत या रागाची वादी स्वर..! हा स्वर अनुभवा या लक्षणगीतात..!
जागो मोहन प्यारे ही भैरवाची प्रसिद्ध बंदिश येथे ऐका..
सावरी सूरत मोरे मन भावे.. या ओळीतली भक्ति पाहा..! 'सावरी सूरत' मधली पंचमाची निरागसता पाहा, 'भावे' शब्दातला कोमल रिखब जगा..!
'दरसन के सब भुखे-प्यासे..' मधल्या 'के' या अक्षरावरची तार षड्जाचं समर्पण पाहा, त्यातली आस पाहा..!
ही आस भैरवाची, ही लगन ईश्वरभक्तिची..!
भैरवाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतोय खरा.. पण भैरव शब्दातीत आहे, शब्दांच्या परे आहे..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
5492
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या रागदारीतल्या या
जागो मोहन प्यारे ऐकल कानाला
In reply to तात्या रागदारीतल्या या by गणपा
कंपणीत सगळे ब्लॉक असल्याने
छान
गणपा म्हणतोय तेच खरं. आमाला
तात्या,मी एका वेगळ्या
जयंतराव, मी एका वेगळ्या
In reply to तात्या,मी एका वेगळ्या by जयंत कुलकर्णी
तात्यांच्या शैली ला साजेसा.
कर्णप्रिय....छान...
In reply to तात्यांच्या शैली ला साजेसा. by तर्री
//ते छोटे गांव / ते देवुळ /
In reply to तात्यांच्या शैली ला साजेसा. by तर्री
ते छोटे गांव / ते देवुळ / ती
In reply to तात्यांच्या शैली ला साजेसा. by तर्री
याचा कोमल धैवत अन् तार षड्ज
बहुतेक वेळा तात्यांच्या अश्या
ऑफिसातून काहीही ऐकता येत
तात्या....
प्रतिसाद देणार्या सर्व
मोहे भूल गये सांवरीया ...