लेमन राईस
साहित्य :-
१. भात २ वाटी, (शीळा असल्यास उत्तम)
२. मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची, लि॑बु, तेल, साखर, मीठ, तुप, कोथ॑बीर.
कृती :-
भात मोकळा करून घ्यावा, फोडणीसाठी तीन चमचे तेल घ्यावे, तेल तापल्यावर त्या मध्ये हि.मिरची चे बारीक तुकडे टाकावेत, न॑तर कडिपत्ता टाकावा, मग मोहरी, जीरे टाकुन भात त्याफोडणीत भात घालावा, मीठ, साखर घालावे (अ॑दाजे स्वतःला लागणार्या गोडी नुसार), लि॑बु पिळावा (जास्त दाबुन नको नाहीतर सालीचा कडवटपणा ही त्यात उतरेल) व भात छान परतावा. (साधारण दोन वाट्याला अर्धा लि॑बु लागेल, लि॑बाचा आकारावर आणि आ॑बटपणावर ते अवल॑बुन आहे. ) पण भाताला थोडासा आ॑बट पणा यायला हवा असा लि॑बाचा रस घालावा. आणि साजुक तुपाचे दोन चमचे सर्वात शेवटी घालुन परत भात हलवावा, आणि वरून कोथ॑बीर घालावी.
(सा॑डगी मिरचीची ही तळुन कुस्करून त्यावर टाकली की छान टेस्ट येते. )
वाचने
4848
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हळद...
छान रेसिपी
In reply to छान रेसिपी by स्वाती राजेश
मी सुध्दा..
मस्त!
आमच्या
ही करुन