प्रत्यक्षातला कामाठीपुरा आणि बुधवार पेठ
"काठावरून निरखलेला कामाठीपुरा " वाचला. त्यापाठोपाठ त्या सीतामढीच्या हलकट गावकर्यांच्या
क्रुर वागणुकीची बातमीही वाचली.
पण काही प्रश्न पडलेतः-
"कामाठीपुरा किंवा बुधवार पेठ" इथं काय चालतं हे पोलिसांसकट सर्व यंत्रणेला ठाउक आहे ना?
मग वर्तमान पत्रात "पेठेतील अमुक ठिकाणी धाड आणी तमुक इतक्या व्यक्तिंची सुटका"
किंवा "भरशहरातील अमुक पार्लरच्या नावामागच्या कुंटणखान्यावर छापा."
अशा बातम्या दिसतात.
बरं ह्या बातम्या येउन गेल्यावरही (पोलिसांनी सगळ्यांना पकडुन नेल्यावरही)ह्या भागातील(पेठांमधील) "कार्यक्रम" चालुच.
ह्ये कसं काय होतय?
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय?
जर अधिकृत असेल तर पोलिस कुणालाही अटक कसे करु शकतात?
नसल्यास कोणत्या कलमाखाली तो दंडनीय गुन्हा आहे?
शरीर विक्रय करणारी व्यक्ती गुन्हेगार मानली जाते, की त्यासाठी दलाली (ह्याचा समानार्थी असभ्य शब्द टाळतोय.)
करणारी व्यक्ती गुन्हेगार असते?
ग्राहकाला नक्की काय शिक्षा मिळते?(किमान ते कमाल)
स्वतः प्रस्तुत लेखक टोकाच्या सुरक्षित(टिपिकल पांढरपेशा) आणि मध्यम वर्गीय घरातील असल्याने, ह्या
गोष्टींची माहिती केवळ पेपर मधुन होते, तेव्हढीच आहे.पण तीही संदिग्ध वाटते आहे.
कुणाला आणखी माहिती आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो.
(ह्याच्या अगदि जवळचा प्रकार"स्ट्रिप डान्सिंग" हा तर अगदिच सर्रास चालतो.)
पण इथे कुणाला जबरदस्तीनं,मारुन मुटकुन "धंद्याला" बसवलं जात नाही असं दिसतं.
म्हणजे, शरीर विक्रय करणार्या व्यक्तिच्याही ईच्छा-अनिच्छेला मान आहे.
शिवाय आपल्याकडे आहे, तितकी अवहेलना इथे नाहिये.
जर आपल्याला मानवाला १००% सुसंस्कृत करणं, आणि त्यायोगे हा व्यवसाय थांबवणं अशक्य असेल, तर निदान त्या व्यक्तिंना
इथल्या प्रमाणे सुसह्य आणि कमी अपमानास्पद जीवन देण भारतात करण्यासाठी किती काळ लागेल?
त्यासाठी कुणी आणि काय करायला हवं?
(आपण स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी . याशिवाय काय करता येइल? )
याद्या
31405
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
मन राव....
चीन मधे
In reply to मन राव.... by मदनबाण
उत्तरे
साईट ब्लॉकिंग...
>>चीन मधे
दुबईत हे
In reply to >>चीन मधे by वेलदोडा
मिसळपावावरच एक लेख/चर्चा
कायदेशिर..
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
In reply to कायदेशिर.. by प्रभाकर पेठकर
मुंबईचे
>> माझ्या
याचे अनेक