Skip to main content

विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक स्थैर्य : नवे संशोधन

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 28/10/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकनिष्ठते मधून प्रेम सिद्ध होत नाही. अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या... http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/E…

वाचने 21151
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

बाभो... बया काहीबी लिहिती राव... आपण तर पळालो इथून... जाता जाता --- हिच्या नवरोबाचे परस्त्रीगमन झाले तर हिला काय वाटेल बुवा...?

In reply to by नुसती बडबड

हिच्या नवरोबाचे परस्त्रीगमन झाले तर हिला काय वाटेल बुवा
आम्ही येथे नवीन आहोत, कृपया आमच्या मतांना थोडे हलके घ्या...
इथे म्हणजे पृथ्वीवरच नविन दिसता? नाही भलतेच सोज्वळ प्रश्न हो तुमचे म्हणुन विचारले.

In reply to by नुसती बडबड

तुमचा प्रश्न दांभिक वाटावे अशी परिस्थिती आहे खरी. हा स्थित्यंतराचा काळ आहे. आता सगळी जनता सुसंस्कृत होणे सोडून पुरती नैसर्गिक झाली कि सगळे प्रश्न संपले!

a secret rendezvous with another woman, हे वाचल्यावर काश्मीरचे राजे हरीसिंग यांच्या प्रतापाची आठवण झाली . १९२५ साली पतीच्या संगनमतानी (फक्त संमती नाही) हरीसिंग यांच्या सोबत संबंध ठेवून एका युरोपीयन बाईनी त्यांना पन्नास लाखाचा गंडा घातला होता . मी संदर्भ दिलेल्या लेखाचे फक्त पहिले वाक्य वाचले आहे. पूर्ण वाचल्यावर आणखी बरीच लफडी आठवतील म्हणून थांबलो.

अशी त्यावेळे बर्‍याच बायकांची इच्छा असायची .त्यात अग्रक्रमानी नाव माझ्या वाचनात साराभाई या बाईंचे नाव येते .विक्रम साराभाईंची मोठी बहीण .अंबालाल साराभाई या उद्योगाशी संबंधीत कुटुंब . त्यानंतर सरोजीनी नायडूंच्या मुलीचे . असो अधिक माहीतीसाठी "आय वॉज नेहरूज शॅडो "हे पुस्तक वाचावे

थोडक्यात काय, तर व्हॅलिएन्ट बाईच्या मते विवाहबाह्य लफडी/बाहेरख्यालीपणा केला तरी चालण्यासारखं आहे.. ओक्के..! :) तात्या.

च्यायला, आमच्या पुराणातलं ज्ञान कुणा परदेशी बाईने लिहलं तर लगेच कौतुक लोकांना. लेको पुराणं वाचा की, हेच सगळं आहे त्यात. -पुराणोक्ता

In reply to by Nile

विवाहबाह्य झेंगटं करा असं पुराणात सांगितलं आहे म्हणता..? ओक्के..! कृपया दुवा/संदर्भ द्या.. शरदच्या दर्शनात टाकतो तो पुरावा एक नवं ' दर्शन ' म्हणून! ;) काय बोल्ता? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अहो हे काय विचारणं झालं? कमाल आहे आजच्या लोकांची! चराचरातील संपुर्ण ज्ञान वेदांत आहे यावर कुणाचे दुमत आहे का? दुवे वगैरे दिले असते हो, पण संस्कृत श्लोकाचे अर्थ कळतात कुठे लोकांना आताशा? आणि हो श्रद्धा हवी, त्याशिवाय तुम्हाला तो अर्थ दिसणार नाही अन कळणारही नाही. ;-) बाकी दर्शनात टाकुन द्यायला हरकत नाही, कुणी तोंडात ब्रह्मांड बघतं तर कुणी... हॅ हॅ हॅ असो! ;-)

In reply to by Nile

अरे अरे !! बाईला कोणीतरी चांगले म्हणा रे .. आणि या नाईल्याला आपले म्हणा रे !!

In reply to by विसोबा खेचर

विवाहबाह्य संबंधांचे संदर्भ हवे होते ना तुम्हाला हे घ्या. परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली तेव्हा ह्या राजांच्या बायकांना काय ऑप्शन होता सांगा बरे? आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो? आता उद्या कुणी कनेडीयन ह्यावर लिहीलं की होईल त्याचा उदो उदो! ;-)

In reply to by Nile

तात्यांचा प्रश्न तसाच राहिला - विवाहबाह्य संबंधाची नव्हे, तर त्यांच्या उदात्तीकरणाची आणि तोच निसर्ग आहे असे ठासून सांगणारी पुराणातली काही उदाहरणे द्याल तर बरे होईल.

In reply to by Nile

परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली सात नाही एकवीस वेळा... तुमचे २/३ मार्क कापण्यात आलेत. :-) आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो? त्याला नियोगविधी म्हणत असत. त्याचे देखील नियम होते पण तो वेगळा विषय आहे. बाकी हे पुराणात नसून इतिहासात आहे. रामायण-महाभारताला पारंपारीक पद्धतीस इतिहास म्हणतात.

In reply to by विकास

बाकी हे पुराणात नसून इतिहासात आहे. रामायण-महाभारताला पारंपारीक पद्धतीस इतिहास म्हणतात.
ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो. म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का? :-)

In reply to by Nile

ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो. आशा करतो जास्त वेळ तातकळत ठेवले नाही. ;) म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का? मी तेंव्हा नव्हतो. मात्र तुम्ही पुराणातील म्हणून दिलेले उदाहरण हे पुराणातले नाही इतकेच मी म्हणालो होतो आणि म्हणत आहे. :-)

In reply to by विकास

हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना? ;-) अहो तात्यांनी संदर्भ मागीतला, रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का? (काही म्हणजे काय अहो, हे असे काही के जे केले नसते तर तुमचे महाभारतच घडले नसते की). इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते. :-) नाहीतर आता सुरुवात पुराणाच्या व्याख्येपासुन करावी लागेल, करा ब्वॉ कुणीतरी उपक्रमावर धागा सुरु. ;-)

In reply to by Nile

हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना? ते वाक्य मी साईबाबांच्या फोटो खाली बघितल्याचेच फक्त आठवते. रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का? आता हेच तर्कशास्त्र पुढे नेयचे ठरवले तर आजचे श्रद्धाळू रामायण-महाभारताच्या म्हणजे पर्यायाने पुराणाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील का? म्हणजे मग तुमच्या तर्काने प्रत्येकाने पुराणातल्या प्रमाणे वागायला हवे! ;) इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते. तसे नाही वाटत. असे म्हणून श्रूती-स्मृतींना तुम्ही विस्मृतीत घालत आहात. :-)

In reply to by विकास

आजचे श्रद्धाळू रामायण-महाभारताच्या म्हणजे पर्यायाने पुराणाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील का?
क्काय? म्हणजे तुम्ही आजचे लोक अन रामायण महाभारतातील लोक एकच असे समजता? कलीयुग वगैरे कुठे गेलं हो??
तसे नाही वाटत.
मग अश्या निर्णयाचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?

In reply to by Nile

तो वेगळा विषय आहे. चर्चा सुरू करा. हा मी आलोच. ;)

सातत्याचा कंटाळा येतो असे म्हणतात... बायकांनी असे काही केले तर लगेच युयुत्सु धागा टाकणार " बाहेरख्याली पाशवी बायका " म्हणून.. बाकी लोकांच्या खाजगी आयुष्यात आपण कशाला डोकवा ?

का हो युयुत्सु, विवाहित स्त्रियांनी असेच वागले तर चालेल का? त्या वर्तणूकीला तुम्ही निसर्गनियम वगैरे म्हण्णार का? येवू द्या पुस्तक महाराष्ट्रात, रोहिंटन मिस्त्रीबरोबर आता हिचा ही नंबर लागणार.

बापरे..... TOI(let) मधली बातमी एवढी मनावर घेतली गेली??

In reply to by अपूर्व कात्रे

युयुत्सु कोणत्याही वृत्तपत्रातला पाशवीपणा इतकाच मनावर घेतात.

या सगळ्या चर्चेत एक युक्तीवाद मला बालिश वाटतो तो म्हणजे मानवाची ती संस्कृती आणि पशूंची ती विकृती. मानवी संस्कृतीने पशूंपेक्षा अनेक विकृती जन्माला घातल्या त्या माणसे सोयिस्कर का विसरतात. ही पण एक विकृतीच मानायची नाही का? विकृत मानले गेलेले पशू 'भूक' भागली की इतर पशूना त्रास देत नाहीत. माणसाची एकतर भूक कशानेही भागत नाही किंवा दूसरे टोक म्हणजे 'भूक' मारणे याला संस्कृती बनवले जाते. सर्वात मूलभूत प्रश्न असा आहे की विकृत पशूंशिवाय मानवाला अस्तित्व असेल काय? जाता जाता बायकांनी विवाहबाह्य ठेवले तर चालतील का असा प्रश्न मला काहीनी विचारला आहे. या प्रश्नाला माझे उत्तर 'चालेल' असेच आहे, पण फक्त कायदे समान असतील तरच... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.

In reply to by युयुत्सु

" माणसाची एकतर भूक कशानेही भागत नाही" - त्यामुळेच निसर्ग प्रमाण न ठरवता काही सामाजिक बंधने पाळणे ओघानेच आले. नाही का? "किंवा दूसरे टोक म्हणजे 'भूक' मारणे याला संस्कृती बनवले जाते." - मग भूक भागवताना काही मर्यादा कटाक्षाने पाळायच्या की सामाजिक, नैतिक बंधने झुगारून चवचालपणे जगणे आणि मी दोन्ही टोके न गाठता मध्य गाठला अशी मल्लीनाथी करणे असे कोरेगाव पार्कातून आलेले "बुद्धत्व" पकडून बसायचे?

In reply to by युयुत्सु

प्रतिसाद काय आहेत ते जरा नीट वाचा. मी किंवा शैलेन्द्रनी "पशु विकृत असतात" असं कुठेही म्हटलेलं नाही. एवढंच लिहिलय की
पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात
आता बालिश कोण आहे इथे? आमचे दोन्ही प्रतिसाद एकदा नीट वाचा आणि मग काय ते पुन्हा लिहा.

>> ज्या न्यायानं स्त्रियांनी पुरुषांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा त्याच न्यायानं पुरुषांनीही स्त्रियांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा. मग काही अडचण येणार नाही. तसं करण्याला किती पुरुष तयार आहेत? हेच म्हणतो. जर पुरुषाचे विवाहबाह्य संबंध, विवाहसंबंध "सुदृढ" व्हायला मदत करत असतील, तर मग स्त्रीयांबद्दलही तेवढाच अ‍ॅक्सेप्टंस दाखवायला पाहीजे ना.. उगाच "माझं ते हेल्दी, तुझं ते पाप" कशाला ?

In reply to by मृत्युन्जय

मी पण हेच म्हणनार होतो. अस शक्य तरी आहे का की युयुत्सुंनी धागा काढला आणि शंभरी नाही गाठली.. @युयुत्सु - तुम्ही तो एक संगितविषयक धागा काढला होता.तसेच लिखाण परत व्हावे ही नम्र विनंती.

म्हणजे या बाइंना असं म्हणायचं आहे का की - होडी स्थिर ठेवण्यासाठी होडिच्या बाहेर वल्हवले पाहिजे. या द्रुष्टिकोनातुन या विषयाकडे पाहता त्या जे म्हणत आहेत ते बरोबर आहे असं वाटेल. पण मला तरी एकुणच त्यांचं डोकं ठिकाणावर नसावं असं वाट्त, बहुधा त्यांच्या नव-या / -यांच्या बाहेरख्याली सवयींमुळे त्या या निष्कर्षावर आल्या असाव्यात. हर्षद