✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

आ
आदिजोशी यांनी
गुरुवार, 10/28/2010 - 10:02  ·  लेख
लेख

Book traversal links for निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

  • ‹ (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9328 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

.

आदिजोशी
गुरुवार, 10/28/2010 - 10:05 नवीन
ह्या भागात वापरलेल्या काही अमूल्य इनसाईट्स बद्दल खंबीर बायका समितीच्या अध्यक्षा आदितीताई जोशी ह्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

स्वानुभवावर आधारित

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/28/2010 - 13:03 नवीन
स्वानुभवावर आधारित निर्लज्जपणा वाचून आनंद झाला! पण या वेळेस निर्लज्जपणा कमी पडल्यासारखा वाटतो आहे. ==================================== नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा? बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस? येवढ्या उशीरा घरी आल्यानंतर बसल्या जागी खायला मिळतंय हे काय कमी आहे का? नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का? बायको - मी काय तुझ्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबू काय? मला एवढं मीठ लागतंच भाजीत. नवरा - .... साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे. बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते? नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल. बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन. नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं? बायको - नाही रे... नवरा - मग? बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे... नवरा - ते आहेच गं. पण... बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची. नवरा - हे कुणी सांगितलं तुला? बायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास? नवरा - अगं ते वेगळं बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला... नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.) बायको - काहीही गरज नाहिये... जमेल नवरा - कशासाठी अगं... बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००) बायको - पण मला शिकायला फार वेळ लागतो. तू किती हुशार आहेस, तुला जर सकाळी नऊ वाजता गर्दीतून गाडी चालवून ऑफिसला जाता येतं तर स्वयंपाक किस झाड की पत्ती! उद्यापासून भाजी आणण्यापासून करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुझी! नवरा - ... खुद के सांथ बातां: ठेवशील पुन्हा आयत्या हातात मिळालेल्या गोष्टींना नावं, ठेवशील?? ==================================== पुन्हा एकदा, स्वानुभवावर आधारित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

(विषय दिलेला नाही)

स्वाती२
गुरुवार, 10/28/2010 - 19:58 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा नवरा फार्फार हुशार आहे

शिल्पा ब
गुरुवार, 10/28/2010 - 23:53 नवीन
माझा नवरा फार्फार हुशार आहे त्यामुळे असल्या भानगडीत तो कधीच पडला नाही...अगदी पापड पोळ्या, खारट अन जळलेली भाजी वगैरे प्रकारातून गेलेला आहे तरी.. जे देईल ते खातो...आणि नाही दिलं तर स्वतः करतो आणि मला देतो. आता लग्न जुनं झाल्याने अन रोज रोज केल्याने मी स्वयंपाक खूप चवदार करते हे नमुद करु इछीते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अंतिम भाग म्हणजे वर्मावर बोट

रेवती
गुरुवार, 10/28/2010 - 10:11 नवीन
अंतिम भाग म्हणजे वर्मावर बोट ठेवण्यासारखं झालं.;) असो, बर्‍याचजणांना मार्गदर्शक ठरावा असे लेखन.
  • Log in or register to post comments

मस्त...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/28/2010 - 10:15 नवीन
प्रसंग मस्तच. संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना दिलेले सल्ले तर लै भारी. :) निर्लज्ज व्हा या भागाचा समारोप करु नका राव. जमेल तेव्हा लिहित चला. - दियुत्सु. :)
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमाला ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/28/2010 - 10:19 नवीन
अ‍ॅड्या, मस्त लिहले आहेस रे. छानच लेखमाला ! मात्र ह्यानंतर अ‍ॅड्याला घरात रहायला जागा मिळेल ह्याची शक्यता कमी वाटतेय, फ्लॅट बघु का रे एखादा तुझ्यासाठी ? ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 10/28/2010 - 10:24 नवीन
मस्त लिहलयं सगळे भाग वाचताना मजा आली! हाही भाग अगदी मस्तच जमलाय.
  • Log in or register to post comments

अभ्यास

नितिन थत्ते
गुरुवार, 10/28/2010 - 10:27 नवीन
च्यामारी !!! या अ‍ॅड्याने १-२ वर्षात लयच अभ्यास केला बॉ.
  • Log in or register to post comments

.

आदिजोशी
गुरुवार, 10/28/2010 - 15:12 नवीन
लग्नाला वर्ष नाही झालं अजून मालक :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अंदाज

नितिन थत्ते
गुरुवार, 10/28/2010 - 19:57 नवीन
पण लेखनावरून तुझी २-३ लग्ने आधी झाली असावीत असे वाटते. =)) (पळतो आता).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

उच्च

सहज
गुरुवार, 10/28/2010 - 10:31 नवीन
बारबाला ५ मिनिटे भुमीका व नवर्‍याचे कधी काळी काम केल्याचे बरेच वेळा भांडवल करणे... लै भारी हाही भाग उत्तम. एकंदर वाचनीय लेखमाला!!! (सदासुखी) सहज
  • Log in or register to post comments

झकास अरे

स्पा
गुरुवार, 10/28/2010 - 10:36 नवीन
झकास अरे आदि...................... मजा आली जाम.................. :)
  • Log in or register to post comments

मस्तच

रन्गराव
गुरुवार, 10/28/2010 - 10:59 नवीन
आपले लेख वाचून बीबीसी वरील कप्लिंगची आठवन येते :)
  • Log in or register to post comments

हम्म्म !! आत्ता वेळ गेल्यावर

स्पंदना
गुरुवार, 10/28/2010 - 11:13 नवीन
हम्म्म !! आत्ता वेळ गेल्यावर लिहिल तुम्ही . पण काय हरकत नाही, माझ्या मुलीला गुरु मंत्र देइन मी खासा ! __/\__ रे आदीजोशी !! सगळ्या आदीं प्रमाणे संसाराचे पुनर्र्र्र्र्रीजीवन तुमच्या मुळे होउ शकते.
  • Log in or register to post comments

लै भारी रे

टुकुल
गुरुवार, 10/28/2010 - 12:47 नवीन
अ‍ॅड्या लेका, कै च्या कै लिहिल आहेस.. जबरदस्त एकदम.. --टुकुल
  • Log in or register to post comments

माझा एक निर्ल्लज मित्र म्हणायचा की

रामदास
गुरुवार, 10/28/2010 - 13:11 नवीन
लग्न वगैरे ठीकच आहे पण दुसर्‍याच्या मुलीला आयुष्यभर सांभाळायचे म्हणजे जरा जास्तच झाले.
  • Log in or register to post comments

च्यायला

आदिजोशी
गुरुवार, 10/28/2010 - 14:26 नवीन
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१०^३६

भाऊ पाटील
गुरुवार, 10/28/2010 - 19:35 नवीन
जबरा वाक्य आहे हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

काय हे रामदास? तुम्हीसुद्धा

रेवती
गुरुवार, 10/28/2010 - 18:49 नवीन
काय हे रामदास? तुम्हीसुद्धा यामधे सामिल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

छान

निशदे
गुरुवार, 10/28/2010 - 18:52 नवीन
हे वाक्य तुफान आहे........:D बाकी लेख नेहेमीप्रमाणे उत्तम.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खरच की

शाम भागवत
Fri, 06/10/2016 - 14:14 नवीन
हा मुद्दा कधी लक्षातच आला नव्हता. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

क-ड-क

मेघवेडा
गुरुवार, 10/28/2010 - 15:56 नवीन
क-ड-क रे अ‍ॅड्या! एकदम चौफेर! झकास!
  • Log in or register to post comments

रा डा !!! रे अ‍ॅड्या....

प्रभो
गुरुवार, 10/28/2010 - 18:43 नवीन
रा डा !!! रे अ‍ॅड्या....
  • Log in or register to post comments

भारी आहे!

पैसा
गुरुवार, 10/28/2010 - 18:59 नवीन
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
यावर माझं उत्तर असं असतं, "तुला पोळ्या आयत्या खायला मिळाल्यायत त्या काय आकाशातून पडल्यायत का तुझ्या आईने पोस्टाने पाठवल्यायत?" बाकी बरंचंस बरोबर! तुमच्या लग्नाला एक वर्षच झालंय म्हणजे आताशी कुठे तुम्ही कॉलेजात प्रवेश घेतलाय. पण तुम्ही स्कॉलर दिसताय, आणखी काही वर्षात डॉक्टरेट कराल यात काही शंका नाही! माझ्या मुलीला लग्नाआधी तुमच्या घरी शिकवणीला पाठवीन म्हणते, म्हणजे तिला दोन चांगले गुरु भेटतील. (आधीचे भाग तुमच्या बायकोने लिहून दिले होते ना? म्हणजे एकसे भले दो!)
  • Log in or register to post comments

फक्त आधीचे नाही

आदिजोशी
गुरुवार, 10/28/2010 - 19:15 नवीन
हा भाग पण बायकोनेच लिहून दिला आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणजे

पैसा
गुरुवार, 10/28/2010 - 20:03 नवीन
तुम्ही ज्या कॉलेजात प्रवेश घेतलाय त्याची ती प्राचार्य आहे! हे आणखीच छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

हहपुवा..

ज्ञानेश...
गुरुवार, 10/28/2010 - 19:10 नवीन
एकदम झक्कास.
  • Log in or register to post comments

बेस्ट

टिउ
गुरुवार, 10/28/2010 - 19:36 नवीन
एकच नंबर! सगळी मालिका क ड क!!! पण अंतिम भाग का म्हणे? अजुन पण येउ दे... :-)
  • Log in or register to post comments

अंतिम भाग नको हो, आणखी येवू

नुसती बडबड
गुरुवार, 10/28/2010 - 19:53 नवीन
अंतिम भाग नको हो, आणखी येवू देत....
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडली.

स्वाती२
गुरुवार, 10/28/2010 - 20:01 नवीन
लेखमाला आवडली. :)
  • Log in or register to post comments

__/\__

शुचि
गुरुवार, 10/28/2010 - 20:53 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

तुफ्फान!!! एकदम भारी!!

प्राजु
गुरुवार, 10/28/2010 - 21:13 नवीन
तुफ्फान!!! एकदम भारी!!
  • Log in or register to post comments

२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा

utkarsh shah
Fri, 10/29/2010 - 11:53 नवीन
२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. एकदम सहमत. याचा अनुभव घेतोय पदोपदी. एकदम झकास लेख. आणि सल्ले तर एकदम सहीच आहेत......... फक्त अजुन (निर्लज्ज) Councer होण्यास हरकत नसावी. (ह.घ्या)
  • Log in or register to post comments

Councer ऐवजी Counceller असा वाचावे....

utkarsh shah
Fri, 10/29/2010 - 11:55 नवीन
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
  • Log in or register to post comments

Councer ऐवजी Counceller असा वाचावे....

utkarsh shah
Fri, 10/29/2010 - 11:55 नवीन
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
  • Log in or register to post comments

अरेरे...

धमाल मुलगा
Fri, 10/29/2010 - 18:04 नवीन
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे. २. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. ८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्‍यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही. ९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
किती रे भाबडा आशावाद हा! बाकी, 'आयुष्याचे नाटक' चे प्रयोग हाऊसफुल्ल चाललेले दिसतायत ;) नाही, हे असले काहीतरी सल्ले सुचतायत..म्हणून म्हणलं हों ;)
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्‍यांना एकमेव सल्ला: "आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."
हॅ हॅ हॅ!!!! ही उपजत बुध्दी असते हो..ते काय वेगळं शिकावं लागतं? :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा