करंजीचे पुरण
लागणारे साहित्य:
गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्याच्या वाट्या
मुगाचे पिठ १ वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अर्धी वाटी
२ चमचे खसखस
चारोळी
बेदाणे
आवडते ड्रायफ्रुट्स
वेलची पावडर
तुप
पिठी साखर
क्रमवार पाककृती:
तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा.
आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो. मला तर हा मधुन मधुन जवळाही वाटतो.
आता किसलेल कोरड खरपुस भाजून घ्या. गॅस मंद ठेवा नाहीतर परत केस काळे होतील.
भाजलेले खोबरे हाताने कुस्करुन घ्या. मस्त खमंग वास येतो हे कुस्करताना. मग मुगाचे पिठ, कणीक, रवा, खसखस वेगवेगळे तुपावर खरपुस भाजून घ्या. खुप पेशन्स लागतात हे करताना. कोणतही पिठ कच्च राहुन चालत नाही. गॅस मंद किंवा त्यापेक्षा थोडा मिडीयम ठेवायचा. खमंग वास येईपर्यंत सगळे भाजायचे. नंतर सगळे एकत्र करुन त्यात चारोळी, बेदाणे, ड्रायफ्रुट्स, वेलची पुड टाकायची.
आता जेवढे जिन्नस तयार झाले असेल तेवढीच पिठी साखर घालुन सगळे एकजीव करुन थंड होऊ द्या.
हे थंड झालेले पुरण हवाबंद डब्यात घट्ट दाबून भरून ठेवा. सारखे सारखे उघडू नका . मी डबा बंद केल्यावर आठवण आली फोटो काढायचा आहे ते. मग म्हटल नाही. आता डबा उघडायचा नाही.
अधिक टिपा:
तुम्ही ह्यात तुमच्या अंदाजाने प्रमाण कमी जास्त करु शकता.
कणीक न घालता त्यात नुसते मुगाचे पिठ घातले तरी छान लागते.
मी वेलचीपुड बरोबर जायफळ पुडही घातली होती.
तुप जर साजुक असेल तर उत्तमच.

वाचने
4516
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्तच!
साजुक म्हणजे गाईचं का? का
डालडा.. म्हणजे वनस्पती तूप
प्राजु म्हणते तसच. साईपासुन
मला हे पुरण नुसतच येता जाता
छान रेसिपी. आम्ही ह्याला सारण
जवळ्याच्याच करंज्या
प्रियाली आयडीया चांगली