साहित्य..:
लसुण, खोबरे,कांदा,कोथिंबिर्,गरम मसाला,
हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ,
बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा
पुर्वतयारी:
१) हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ, हे सगळे भाजुन पीठ तयार करुन घ्या..
२) खोबरे,कांदा,लसुण मिक्सर मध्ये बारीक करुन पेस्ट करुन घ्या..
३) बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा..हे मिश्रण थोडेसे पाणी घालुन घट्ट भिजवा.
कृती:
फोडणीसाठी पातेलीत तेल घाला...
त्यावरुन जिरे,मोहरी,हिंग प्रमाणात
त्यानंतर (क्र.२)ची पेस्ट त्यात सोडा...
परतु द्या..नंतर त्यात गरम मसाला घाला...
मसाला घातल्यावर त्यात थोडेसे पाणी घालुन काही वेळ परतु द्या..
नंतर त्यात भरपुर पाणी घाला..
पाणी उकळायला लागल्यावर त्यात पुर्वतयारीतील ( क्र.१) चे पीठ २-३ मोठे चमचे...घालुन ढवळुन एकजीव करुन घ्या..
वरील सर्व कृती झाल्यावर पातेलीतील मिश्रणाला उकळी फुट्ल्यावर...
(क्र.३)चा भिजवलेला गोळा घ्यावा...
पोळपाट वर लाटुन घेउन..त्याच्या सुरीने शंकरपाळ्यासारख्या पण आकाराने मोठ्या वड्या पाडुन घ्या...
आणि तयार उकळ्लेल्या मिश्रणात हळुवार सोडा..
आता ५ मिनिटात शिजल्यावर गॅस बंद करा...
जेवायला वाढताना वरुन बारीक चिरलेली गावराणी कोथिंबिर पेरा..आणि लिंबु....
सोबत बाजरी..ज्वारी,मका कशाचीही भाकरी..भाकरी आवडत नसेल तर पोळी....
कांदा गोल चकत्या करुन...त्यावर मीठ,लिंबु.....
भातावर पण छान लागते..
मग आज रविवारचा ट्राय करणार ना...म्हणुन मुद्दाम लवकर उठुन टाकतोय...
खाद्यलालसा
वाचने
9959
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटु दिसत नाहीये...
लालसाताई .
तर्री
In reply to लालसाताई . by तर्री
हे सगळे आईने केलंय..माझी
In reply to तर्री by पैसा
आईना सांगा
In reply to हे सगळे आईने केलंय..माझी by डावखुरा
धन्यु ....तुमचा निरोप नक्की
In reply to आईना सांगा by पैसा
तर्रीभाउ "लालसाताई"
लालसा भौ, लई भारी.
In reply to तर्रीभाउ "लालसाताई" by डावखुरा
खल्लास..!
तोंडाला पाणी सुटले.
क्षमा.
आयाया .. काय भाजी असते वो. लय
एकदम छान...
भाकरी
वेड! काय ताट दिसतय अहाहा!
बहोत खुब!!! अफाट आहे फोटो.
इनो घ्यायला लागावा असा
अति रुचकर
जोरदार फोटू.. सॉलीट्ट भूक
स्स! स्स! तोंडाला पाणी! मला
मस्त फोटो! चवही सह्हीच असणार!
मस्त!! हे पाक कृती बद्दल! हाल
काय सही आहे.... बाजरी नसली
अहो...रत्नागिरीकर१
In reply to काय सही आहे.... बाजरी नसली by रत्नागिरीकर१
थोडंसं मनातलं..
अहो...मिपाचा सदस्य चवीत
छान
मस्तच आहे...
रत्नागिरीकर१.. आईला विचार्उन
लालसाभाऊ
तिरशिंगराव...तुमची नुस्कान