Skip to main content

'दोघा ठाकरेंच्या वादात मराठी माणसाचे नुकसान आहे' मनोहर जोशींचे व्यक्तव्य.

Published on मंगळवार, 26/10/2010

वाचन संख्या 1125
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

इतर ला मत दिले आहे. या दोघांपैकी कुणाच्याही मागे गेलं तरी मराठी माणसाचे नुकसान आहे.

In reply to by आनन्दा

काही नुकसान होत नाही मराठी माणसाचे! आम्हाला कोणावर विसंबून रहाण्याची गरज नाही.. जो अगदी मनःपूर्वक मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी झटेल, त्याच्या पाठीशी वा त्याच्याबरोबर आम्ही नक्कीच उभे राहू.

In reply to by आशिष सुर्वे

पण नेमके कोणाच्या पाठीशी रहायचे? हिंदुसम्राटांचा पक्ष फुटला... मराठीसम्राटांचा पक्ष आला.. आता आणि काही वर्षानी हाही पक्ष फुटेल.. मग सेंट्रलहृदयसम्राट आणि वेस्टर्नहृदयसम्राट असे नवीन नेते येणार... :)

In reply to by JAGOMOHANPYARE

हा प्रतिसाद काही विचारण्यासाठी आहे,त्यांना जे ह्या दोन ठाकरेंच्या एकत्र येण्यात रस घेत नाहीतः १)राज ठाकरेंप्रमाणे तळमळीने व पटणारे मुद्दे मांडणारे भाषण कोण करतं? २)हे दोघे एकत्र आल्यावर मराठीचे जास्त चांगले होइल की आता होतयं? ३)टॅक्सी परवाना फक्त मराठींनाच द्या ही ओरड फक्त त्याच पक्षाने का मारली? ४)'बॉम्बे'ची 'मुंबई' कोणामुळे झाली? ५) नोकरी,व्यवसाय्,राजकरण व ईतर क्षेत्रात अमराठींच वाढणारे वर्चस्व ह्या दोघांना पुर्ण सत्ता मिळाल्यावर नाही का कमी होणार?? ६)ह्या दोघांना एकत्र आलेले बघुन ईतर पक्षातले तरुण नेते ह्यांना मिळतील व त्याचा फायद मराठी माणसाला आपले अधिपत्य गाजवायला होईल असे नाही का वाटत? नोंद : माझा पाठींबा फक्त मनसेला आहे.

In reply to by तिमा

>>या दोघांपैकी कुणाच्याही मागे गेलं तरी मराठी माणसाचे नुकसान आहे. सहमत!!!

In reply to by पिवळा डांबिस

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी ? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ? कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ?? अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !! धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे ! आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली :-( एका भारतिय मुस्लिम स्वातंत्रसैनिकाच्या मुलीची व्यथा ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

बाई गं, माझ्या वरच्या प्रतिसादात तुला काही आक्षेपार्ह वाटलं का? बुचकळ्यात, पिडां (कसे पुण्य दुर्दैवी...:))

In reply to by पिवळा डांबिस

मी माझी स्वतःची व्यथा मांडली तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहेच हे वेगळे सांगणे न लगे . बाकी काही लोकांना भांडण लावणे अन भांडायला निमित्त शोधणे या साठी मूहुर्त लागत नाही हे माझ्या प्रतिसादाला आलेल्या एका उपप्रतिसादात दिसतच आहे . असो ! तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by वाहीदा

एका भारतिय मुस्लिम स्वातंत्रसैनिकाच्या मुलीची व्यथा मुस्लिम शब्दाचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचे कारण नव्हते. एक तर तुम्ही जातीयवादाच्या नावे ओरड करता आणि दुसरीकडे जाणीवपूर्वक धर्म, जाती यांचा उल्लेख.

सगळे ठाकरे एकत्र असताना मराठी माणसाचं भलं झाल्याचा इतिहास नाही. मात्र हिंदुत्वाच्या मृगजळामागे भय्यांचे लांगूलचालन झाल्याचा इतिहास आहे.

In reply to by उल्हास

आम्हीपण आधी शिवसेनेचे फ्यान होतो (मतदार नव्हे). नंतर नुसती बोलबच्चनगिरी आहे असे कळू लागले. त्यात मराठी चा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा भलताच मुद्दा घेऊन संघाशी संग केल्यामुळे मनातून पुरतीच उतरली. -खल्लास

मत : इतर दोघा ठाकरेंच्या वादात मराठी माणसाचे नुकसान आहे .. हे जोपर्यंत हे दोघे बोलत नाहीत तोपर्यंत एकत्र काय आणि नाही काय सारखीच परिस्थीती आहे ..

पूर्वी सर्व कणाहीन, लांगूलचालन करणार्‍यांच्या कळपात, मराठी खाक्या दाखवणारा एकच ठाकरे होता. तेव्हा तो दाखवेल तोच खाक्या, अशी खाक्याची मोनोपोली बनली होती. साहजिकच खाक्या दाखवण्यात शैथिल्य येत गेले! आता खाक्या दाखवणारे दोन झाल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे, तुमच्या खा॑क्यापेक्षा आमचा खाक्या अधिक बाणेदार, अश्या स्पर्धेमुळे, मुंबई-ठाणे-कल्याण्-पुणे-नाशिक परिसरात खाकेच खाके दिसू लागले! अशा ह्या खाक्यांच्या महापुरात मराठी माणसाचे भविष्य अधिक उज्ज्वल बनणार, यात शंका ती कोणती?

मराठी माणसाचे नुकसान होईल असे वाटत नाही. शेवटी प्रत्येक जण आपल्या हिताचा विचार करुनच निर्णय घेणार. पण जे काही शिवसेनेने चालवले आहे ते बघुन खुप वाईट वाटले.बाळासाहेबाचे खरोखर आता खुप वय झाले आहे. त्याना आपण काय बोलतो ह्याचे भान बहुधा रहात नसावे असे त्याच्या अलीकडच्या वक्तव्यातुन दिसते.एकीकडे घराणेशाही शिवसेनेत नाही म्हणत नातवाला बालशिवसेना काढुन द्यायची व दुसरीकडे राहुल गांधीला शिव्या घालायच्या हे बरोबर नाही.राज ठाकरे हा सख्या भावाचा पोरगा तो लहानपणा पासुन त्याच्या घरी लहानाचा मोठा झाला ,त्याच्या खाण्यापिण्याचा हिशेब मागणे हे तर दळभ्रद्रीपणाचे लक्षण आहे. हे तीन ठाकरे मिळुन त्या एकावर जो हल्ला करत आहेत तो त्याच्या शेळपट पणाचा धडधडीत पुरावा आहे. आता शिवसेना हा एक भुतकाळ झालेला आहे.