बाळासाहेबांच्या मते शिवसेनेत घराणेशाही नाही.. आपलं मत काय?
वाचने
791
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
पण शिवसेनेत जातपात मानत नाहीत ही एक फॅक्ट आहे. मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे.....सर्वांना समान संधी मिळाली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रकाश परांजपे दुस-या पक्षात असते तर गुणवत्ता असुनही त्यांना संधी मिळाली असती का हा प्रश्न आहे.
In reply to माहित नाही by अमोल खरे
सदरच्या कौलाचा विषय हा शिवसेनेत जात-पात मानतात किंवा नाही हा नसून घराणेशाही आहे किंवा नाही, हा आहे असे विनम्रतेने लक्षात आणू देऊ इच्छितो..
असो..
मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रकाश परांजपे दुस-या पक्षात असते तर गुणवत्ता असुनही त्यांना संधी मिळाली असती का हा प्रश्न आहे.सहमत..! आपला, (बहुजन समाजवादी चित्तपावन) तात्या.
In reply to सदरच्या कौलाचा विषय हा by विसोबा खेचर
काही जणांना दुसर्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही त्यातला हा प्रकार आहे.
काही दिवसांनी नक्षलवाद्यांमधेही घराणेशाही चालू होईल.
In reply to कुसळ by तिमा
>>काही जणांना दुसर्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही त्यातला हा प्रकार आहे.
काही दिवसांनी नक्षलवाद्यांमधेही घराणेशाही चालू होईल!
खी: खी: खी:
माननीय तात्या,
तुम्ही इथे कौलांवर कौले काढून काही होणार आहे का?
त्यापेक्षा दुर्लक्ष करावे.
आता राजपुत्रांचे म्हणाल तर मातोश्रीवरचे युवराज सुद्धा असेच तारे तोडत असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो की नाही? पुढे नवे तलवारधारी राजपुत्र सुद्धा तारे तोडतील तेव्हापण आपण दुर्लक्ष करू. हो की नाही?
"परमपूज्य आदित्यजी हे निव्वळ आपल्या कर्तृत्वाने पुढे आले आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तळागाळातून आपली कारकीर्द सुरु करुन निव्वळ कर्तबगारीवर या पदी पोचले आहेत" असे मिसळपाववर तरी कोणाच्या स्वप्नात आले असेल असे मला वाटत नाही. तसे मिपाकरांना वाटते अशी स्वतःचीच कल्पना करून घेऊन आपण त्रागा कशाला करून घेता ?
महाराष्ट्रात सुद्धा ते कर्तृत्वाने पुढे आले आहेत असे कोणाला वाटत नसेल.
आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या काळात इंदिरा गांधीना नामोहरम करण्यासाठी चौकशी आयोग, खटले वगैरे चालू झाले. पण "त्यामुळे इंदिरा गांधींनाच प्रसिद्धी मिळाली" असे तेव्हाच्या वृत्तपत्रांचे म्हणणे होते. तसे काही तुमच्या सततच्या कौलांमुळे मिपावर आदित्य बाबत व्हायला नको.
:wink:
..प्रेरणा..
In reply to माननीय तात्या, तुम्ही इथे by गांधीवादी
नक्कल/विडंबन नीट करता यायला हवी.
यांना बरोबर जमली होती. :)
तरीपण मत द्यायचे ? भारी आहे बॉ..
बाकी शिवसेनेत हुकूमशाही आहे, घराणेशाही नाही...
दुदैवाने शिवसेनेच्या रक्तात इतकी 'पिव्वर' घराणेशाही भिनली आहे कीं 'धाकली पाती'सुद्धा* त्यांना 'उपरी' वाटते!
(*राज ठाकरे)
माहित नाही