हस्ताक्षर.........
लेखनप्रकार
परवा आई बारशाला चाललेली कोणाच्यातरी..........
पैशाचं पाकीट भरून झाल्यावर तिने मला हक मारून सांगितलं, "प्रसन्न अरे जरा नाव टाक रे पाकिटावर " (मी मिपा वर पडीक असल्याने समाधी भंग झाल्यागत चरफडत उठलो :( )
"दे पेन ...... काय तू पण ..... साधं नाव नाही टाकता येत?" ------------------ इति मी .
नाही अरे , इतकं सुंदर अक्षर आहे तुझं. तूच टाक ना...(आई पण ना "मस्का " मारण्यात expert आहे )
मी वैतागून पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ,आणि बापरे ...."tube " पेटली , आपण किती दिवसानंतर मराठी लिहितोय ...
कारण हल्ली पेन सह्या करण्यापुरत लागतं... दिवसभर कॉम्पुटर वर काम असल्याने.. लिहिण्याचा प्रश्नच येत नाही.. या विचारात कसंतरी लिहून दिलं....
(अपेक्षेपेक्षाही घाण अक्षर आलं)
आई वैतागली , " काय हे प्रसन्न, किती वाट लागली आहे अक्षराची ? मागे चित्रकला सोडून दिलीस आणि आता हे.... दिवसभर त्या डब्यात डोकं खुपसून बसलेला असतोस.
किती अभिमानाने सांगायचो तू लहान असताना सगळ्यांना तुझ्या हस्ताक्षराबद्दल.......... किती बक्षिसं मिळालेली तुला.. आणि आज????
आईने खस्स्कन पेन ओढून घेतलं.. नवीन पाकीट घेतलं, आणि त्यावर छानसं नाव टाकून निघून गेली .
घरी एकटाच होतो , सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून जायला लागला ...बाबांनी अक्षर चांगलं यावं यासाठी दिलेला चोप....
सुंदर अक्षर यावं यासाठी केलेली मेहनत ...... वर्गातल्या एका गोड गुलाबी चेहऱ्याची पूर्ण केलेली " प्रयोगवही"...शिक्षकांनी केलेलं कौतुक ....
नेहमी फळ्यावर "सुविचार" लिहिण्यासाठी केलेले आग्रह .. आणि त्यावर खाल्लेला " भाव" .......
सगळं सगळं एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेलं..
आणि आज????? "२४*७ computer च्या तडाख्यात सापडलेली आजची आपली पिढी ......?
आपण दिवसातून किती वेळेला लिहितो .....?(ते सुद्धा मराठीत)
मला नाही वाटत . हल्ली कोणी हि गोष्ट साधी विचारात सुद्धा घेत असेल ...... "मराठी बोलली गेलीच पाहिजे , मराठी वाचवायलाच हवी... सर्व मान्य ...१००%"
पण मग लिखाणाचे काय ....?
समर्थांनी दासबोधात " हस्ताक्षराचे" किती यथार्थ सुंदर वर्णन केलं आहे.... (परवाच दासबोध वाचून झाला ..... खूप शिकायला मिळालं....)
आपलीच हि अवस्था... तर पुढच्या पिढीचं काय....? आपणच आपल्या मुलांना "a for apple आणि b for ball शिकवतो लहानपणापासून ....
मग "अ आईचा" हे कधी त्या पिल्लांना कळणार? जगाबरोबर चालायला हवं , इग्लिश यायला हवं सर्व ,मान्य.... पण मराठीच काय? ती आपली मातृभाषा आहे......आणि आपल्या आणि त्याही मागच्या पिढीतले ८५% लोक हे मराठीच शिकले , वाढले आणि आज किती मोठ्या पदावर, मोठ्या देशामध्ये कार्यरत आहेत...................?
आज आपण मराठी लिहितो, पण keybord वापरून, त्याची प्रिंट सुद्धा मारता येईल........
पण हस्ताक्षरातील हळुवारपणा , त्याचा गोडवा , त्यातला रुबाब, त्यातल्या भावना, त्याचं स्वत: जपलेलं एक वळण, त्याचा सुद्धा एक स्पर्श ...........................
हे तर सगळं हरवूनच जात आहे दूर दूर...................... पत्र लिहिणं हि तर outdated गोष्ट झाली आहे .. परवाच "मिपा" कोणीतरी म्हटल्याप्रमाणे "मामाचं पत्र हरवल .......... आता ते कधी सापडणारच नाही......... "
तेव्हा मंडळीनो जास्त लिहित नाही (टंकन वेग खूप कमी आहे ). तुम्ही जाणकार आहातच....... बघा जमलं तर विचार करून......
मी रोज डायरी लिहायला सुरुवात केली आहे......." मराठी जगवायची असेल तर लिहायला सुद्धा हवी"
कारण
"सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना".......................
वाचने
7336
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
लेख लिहिण्याचा पहिलाच
लेख आवडला. मनापासून आलेला
In reply to लेख आवडला. मनापासून आलेला by शुचि
असेच म्हणतो...!
खरंच छान झालाय लेख.. मनाचे
प्रकाटाआ
In reply to प्रकाटाआ by डावखुरा
नोंद कशासाठी?
वळ णदार अक्शर
सुंदर अक्षर कशासाठी?
In reply to सुंदर अक्षर कशासाठी? by आनंद घारे
सुंदर अक्षर कशासाठी?.......... स्वतःसाठी.....
स्पा साहेब, कालाये तस्मै
In reply to स्पा साहेब, कालाये तस्मै by गांधीवादी
टायपिंग
प्रेम पत्र कसे पाठवाल
In reply to प्रेम पत्र कसे पाठवाल by रणजित चितळे
सगळे मुद्दे मान्य
प्राथमिक शाळेत असताना काही
In reply to प्राथमिक शाळेत असताना काही by कानडाऊ योगेशु
अगदी असेच
जादू......!!
In reply to जादू......!! by इन्द्र्राज पवार
बरोबर...
खूप छान लेख लिहिलाय स्पा
In reply to खूप छान लेख लिहिलाय स्पा by मितान
मितान माझीदेखील आवडती कविता
In reply to मितान माझीदेखील आवडती कविता by शुचि
धन्यु.....!
In reply to धन्यु.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुमोदन ! धन्यवाद शुची नेटवर
In reply to अनुमोदन ! धन्यवाद शुची नेटवर by मितान
अगं तुला कसं शोधायचं माहीत
खूप छान लेख स्पा
दोन्ही बाजूंची मत
पत्र लेखन
लेख अगदी मनापासून लिहिला आहेस
In reply to लेख अगदी मनापासून लिहिला आहेस by प्राजु
-१
लेख चांगला लिहिला आहे, पण
हस्ताक्षर