घेरलेलं पिठलं
साहित्य-
बेसन्-१वाटी(मध्यम आकाराची )
कांदा-१ मोठा
लसुण-७-८ पाकळ्या
हळद्-अर्धा टे.स्पून
लाल तिखट-२ ट्.स्पून
तेल्-गरजेनुसार
जीरे,मोहोरी
क्रुती-
१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा.
२)कांदा गुलाबीसर रंगावर परतुन घ्यावा मग त्यात बारिक चिरलेला लसुण घालावा व परतुन घ्यावे.३)नंतर त्यात हळ्द्,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे व २ ते अडीच वाटी गरम पाणी घालावे.
४)पाण्याला उकळी फुटली कि त्यात हळूहळू बेसन घालायला सुरवात करावी,बेसन टाकतांना त्याच्या त्या पाण्यात गुठळ्या होनार नाहित याची काळजी घ्यावी यासाठी एका हाताने बेसन घालायचे व दुसय्रा हाताने चमच्याने ढवळत रहायचे म्हणजे गाठी पड्णार नाहि.(थोड्याफार तर पड्तातच पण जास्त पडु देउ नये.)
५)बेसन घातल्यावर जास्त घट्ट झाल्याचे वाट्ले तर त्यात अजुन थोडे गरम पाणी घलुन ढवळावे.
६)१५ते२० मिनीटांनी घेरलेलं पिठलं खाण्यासाठी तयार असेल.
७)वाढतांना पिठल्यावर पळीभर शेंगदाणा तेल घालुन द्यावे मस्तच लागते.

वाचने
6171
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त...मला पिठलं फार
In reply to मस्त...मला पिठलं फार by शिल्पा ब
मी पण
In reply to मस्त...मला पिठलं फार by शिल्पा ब
शिल्पा मी पण आधीच पीठ
पिठले हा सध्याचा प्राणवायु आहे .
पाणी उकळुन..
लय भारी..खान्देशी मेजवानी...
आम्ही ह्याला हाटीव पिठले
In reply to आम्ही ह्याला हाटीव पिठले by पक्या
अहो मग टाका की पालकाची
छान
मस्त मस्त प्रकार
पाकृ छान. पण
धन्यवाद!
खमंग पाकृ
मलाही हे पिठलं आवडतं पण
वा! मस्तच. या पिठल्यावर
In reply to वा! मस्तच. या पिठल्यावर by मराठमोळा
दिलीत आठवण करून पिठलं
In reply to दिलीत आठवण करून पिठलं by रेवती
रेवती तै, ईनो कशाला, असं