शेवभाजी...[पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...]
साहित्य..सामुग्री...:
लसुण, खोबरे, कांदा, टमाटा,सुगरण(कोथिंबिर),
गरम मसाला,लाल तिखट, चवीपुरते मीठ,
तेल्,जिरं,मोहरी....
पुर्वतयारी:
१) कांदा भाजुन घ्या...मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या...
२) टॉमॅटो ची पेस्ट करुन घ्या...
३) लसुण्,खोबरे,कोथिंबिर ची पेस्ट करुन घ्या..
आता प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेउ..
कृती :
१) फोडणी :
गॅस वरील कढईत फोडणीला तेल घ्या..
(तर्री जास्त हवी असेल तर तेल थोडे जास्त घ्या..)
त्या तेलात जिरं,मोहरी,हिंग प्रमाणात घ्यावे...
२) पुर्वीच तयार केलेली (क्र.३)लसुण्,खोबरे,कोथिंबिर ची पेस्ट त्यात घाला..
चांगली परतुन घेतल्यावर...
३) त्यात (क्र.१)ची कांदा पेस्ट घालुन चांगली परतुन झाल्यावर...
४) त्यात (क्र.२)ची टॉमॅटोची पेस्ट घालुन त्याला तेल सुटेपर्यंत परतुन घ्या..
वरील सर्व कृतीत गरजेप्रमाणे अधुन-मधुन ढवळत रहा...
५) तेल सुटल्यावर त्यात लाल तिखट,गरम(काळा)मसाला,चवीपुरते मीठ घाला..
हे मिश्रण व्यवस्थित कालवुन घ्या व परतुन झाल्यावर..
पाणी घाला..आणि एक मस्त पैकी उकळी घेउन गॅस बंद करा...
जेवायला वाढताना प्रथम डीश मध्ये शेव घ्यावी नंतर त्यात भाजीचा रस्सा घ्यावा...
म्हणजे शेव थोडी भिजते.. वरुन बारीक चिरलेली गावराणी कोथिंबिर पेरा..आणि लिंबु....
सोबत बाजरी..ज्वारी,मका कशाचीही भाकरी..भाकरी आवडत नसेल तर पोळी....
कांदा गोल चकत्या करुन...त्यावर मीठ,लिंबु.....
भातावर पण छान लागते...
कधीतरी रुचीपालट म्हणुन कमी वेळात झटपट बनणारा पदार्थ..
करुन पहा..आणि अनुभवा खान्देशचा गावरान झट्का...
वि.सु. : लिंबु,कोथिंबिर, कांदा याशिवाय ह्या भाजीचा विचार डोक्यात आणु नये.. ;)
खाद्यलालसा...
वाचने
14604
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
शेव?
सुनिलशेठ ताटाच्या फोटोखालील
In reply to सुनिलशेठ ताटाच्या फोटोखालील by डावखुरा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुनील
राजे शेव आयतीच मिळते किंवा
In reply to राजे शेव आयतीच मिळते किंवा by डावखुरा
नाही जमली तर
In reply to नाही जमली तर by पैसा
हॅ हॅ हॅ
@पैसा ...हातचं
फर्मास पाकृ.
पाहिली, केली आणी जमली बरका...
तर्री
सकाळचे सव्वा नऊ वाजलेत...
लालसा बापु
सुन्दर पाकक्रुती. जेव्हा
व्वा...!
पाहीली... केली.... खाल्ली !!
आजच बनविओ आहे !!
आग.....आग.....
झक्कास..
भाकरी!!!!!!!!!!!!! लालसा जागी
कालच खल्लि
थोडं मनातलं..
बर्याच दिवसांनी शेवभाजी !!!
सगळं ठीक आहे
+१ विलासराव.