Skip to main content

नव स्दस्य

लेखक pramanik यांनी शनिवार, 23/10/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रामाणीक आपटे, राहणारा पुणे,सध्या गुजरात संगणकतज्ञ मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक. मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत. सर्व सदस्यांनी मला त्यांच्या विचारांशी हीतगुज करायची संधी द्यावी ही विनंती करुन मी ह्या धाग्याची सांगता करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6546
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

>>ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. कंचा फोटू व?

आपले या मिपा विश्वावर स्वागत आहे.. आपणाला नकोसे वाटतात त्या घटकांची तक्रार करावी (म्हणजे मग आम्हाला व्यनी येऊन जरा आळा बसल्यासारखा होईल) हि नम्र सूचना. आपणाला आवडलेला फोटो नवनिर्माण समितीने काढून टाकल्याने त्याचे दर्शन होत नाही. आपले ज्या विषयात खूप वाचन आहे त्या विषयावर लिहून आमचे ज्ञानसंवर्धन करावे...प्रतिसादांची चिंता करू नये.

In reply to by pramanik

असे का बरे? आपल्या स्वागताशीच आपण असहमतम आहात !!! असो, आपली इच्छा .. बाकी फिरंगी शब्द फोटोला संस्कृतात चायाचित्र म्हणतात याची जाणिव करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by शिल्पा ब

विनोदकणिका गंभीर होउ नये. कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी. पुनः मिलामः

आल्या आल्या तक्रारी करण्यापेक्षा काही तरी लिहा. नाना आताच इथेच उत्तर देतो दिवाळीत मला आपटबार खुप आवडतात.

In reply to by वेताळ

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?

In reply to by pramanik

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा? मिपावर स्वागत. स्वतःच पाध्ये होणे हा उत्तम उपाय आहे. ओ भौ इतक्या लवकर एकदम ही उडी मारू नका बाकी इथे तुम्हाला इथे बरेच नवे शब्द शिकायला मिळतील. उदा: वीकान्त , बाडीस , चेपु , तद्माताय ,

प्रामाणीक हे नाव कि विषेशण??? नाव असेल तर अवघड आहे.. असंस्कृत अविनाश.. असंस्कृत..संस्कृत न येणारा

In reply to by अविनाशकुलकर्णी

नाम असु शकते का? नाम नाही ,गुण आहे. आपल्या कविता मायबोलीवर वाचल्यात

स्वतःच्या "प्रामाणिक" ह्या नावाला जागा म्हणतो, कसे? बाकी तुम्ही जुनेच तेव्हा सुस्वागतम म्हणण्यात अर्थ नाही, कसे? चालू द्या...

In reply to by सुनील

मला नकारार्थी प्रतिसाद का मिळत आहेत? मी ईथे नवीन आहे,ईतर वेबसाईट्स वर ह्यापुर्वी लिखाण केल्याने केवल निर्मल विरोध करत आहे. सर्व सद्स्यांशी माफी. कृपया संपादकांचा संपर्क करुन द्यावा.

In reply to by pramanik

नवीन येणाऱ्या सभासदाचे स्वागतसुद्धा न करता येणाऱ्या असंस्कृत व्यक्तींकडे आपण दुर्लक्ष करावे...आपण केवळ निर्मलपणे विरोध करताहात हा आपला मोठेपणाच आहे. काय केल्याने संपादक आपल्याशी संपर्क करतात हे कालांतराने आपणास समजेलच.

मिसळपाववर स्वागत. तुम्ही लिहीत रहा. लोक प्रतिसाद देत रहातील. जर काही आक्षेपार्ह असेल तर संपादक मंडळी कार्यवाही करतात.
कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी.
मला वाटतं यासाठी 'वाविप्र' हा स्वतंत्र विभाग आहे. बाकी जसेजसे तुम्ही इतरांचे लेखन वाचाल तशी तुम्हाला आपोआपच जास्त माहिती होत जाईल. वेताळ यानी म्हटल्याप्रमाणे आपल्या लेखाचे शीर्षक 'सदस्य' असे हवे होते. अचूक लेखनासाठी मदत ''येथे' या लिंकवर मिळेल. (उजव्या बाजूच्या समासात दिसते).
एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?
आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला?

In reply to by पैसा

आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला? नावाप्रमाणेच ते प्रामाणिक असल्याकारणाने मनातील शंका विचारते झाले तर आपणास इतका का संदेह व्हावा बरे?

In reply to by Nile

आम्ही स्वतःच इथे नवीन असल्याने या महोदयांना ओळखत नाही...आपणास का बरे अशी शंका यावी?

In reply to by शिल्पा ब

आपण खातं बंद करावं असं अजून वाटलेलं नाही. एकदम नव्या माणसाला अशी शंका का यावी असं वाटलं खरं. (हे मी प्रामाणिकपणे सांगते.) अर्थात हे ही शक्य आहे, की श्री. प्रामाणिक कोणतेही काम करण्यापूर्वी सगळी माहिती आधीच घेऊन ठेवत असावेत!

In reply to by पैसा

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा? आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला? खोडसाळ प्रतिसाद देणार्यान्चा काटा काढायचा असेल प्रामाणिक्ला. :)

मी विनायक आपटे,पुण्याचा,गुजरातचा व मुंबईचा राहणारा. मी ह्यापुर्वी सतत वाचनाच्या माध्यमातुन मराठी साईट्सवर येत होतो.काही ठीकाणी मी सदस्यत्व घेतले,त्यामुळे ब-याच सभासदांना मी स्वभावाने ओळखतो.काही सदस्य उगाच एखाद्याला त्रास देतात ह्याचा मला काही वेळेस क्रोध येतो.त्यांना असे का करावसे वाटते ह्याचे मला ज्ञान नाही. अशा साईट्सचा वापर योग्य त्या कारणासाठी होत नाही अस मननं करतो. संपादकांना संपर्क करुन आपणास ईथले नियम व मर्यादा कळतील असे वाटले,म्हणुन विचारणा केली.संपादकांमुळे लेखाचा तोल राखण्यास मदत होते असे मला ज्ञान आहे. मला ईथे कोणी ओळखत असावे अस वाटत नाही,मी ह्या नावाचा प्रयोग कधी केलेला नाही पण मला नको त्या संज्ञेने व गृहीत धरल्याप्रमाणे का संबोधले जातेय ह्याचे मला ज्ञान नाही. मी आयुष्यात कधी कोणाचे देणे लागत नाही. ब्रह्मिन् शंसित शुभ

In reply to by pramanik

काय राव नव्या नवरीगत करताय ? जरा चार दिवस बघुन घ्या आजुबाजूला . घर बघा , माणसं बघा. मग एकदा चहा साखरेचे , तिखटामिठाचे गव्हा -तांदळाचे डबे माहिती झाले की मग लागा की सैपाकाला. चार जिन्नस करुन घाला , म्हण्जे मग इथले सासूसासरे , जावा-नणदा , येणारजाणारे पण लोक वळकाय लागतील. आल्या आल्या ह्यो मोठ्ठा कंदील ! दमानं घ्या जरा. (हुंडाबळी) अडगळ

In reply to by pramanik

या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ;) पहिल्याच लेखात बरीच वादग्रस्त विधान फोडणीला टाकली आहेत. (बराच अभ्यास दिसतोय ) :) (या आयडिने) पदार्पणातच(?) तुमचा जयंद्रथ ना होवो हिच शुभेच्छा !!!

मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत नव स्दस्य आपण संस्कृत भाषेला दिलेल्या या देणगीमुळे मन भरून आले. :( ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने ....... आपल्या ज्ञानाबद्दल कोणतिही शंका नाही. काहिंनाच समजणार नाहि ना? खूप जणांना तर समजेल.

In reply to by चिंतामणी

श्वः विश्रामदिन त्वां धन्यं वदामि हि प्रतिसाद मी विनोद करतोय अस मी वरच लिहल आहे.आज मला फावला वेळ का आहे,हे हे मी आता सांगितल की नाही? चालु घडामोडींना लेखात प्राधान्य द्यावे असे सुचवतो,न्यायव्यवस्थेवर चर्चा करायची आहे.

In reply to by pramanik

दान्ड्या हरवल्यामुळे वाक्य कुठे संपले तेच कळत नाहिये :) (बाकी आमचे संस्कृत्चे ज्ञान यथातथाच आहे! पण उसने दाखवायला काय जाते? )

काल शनिवार होता. ;) दोनदोन धागे, नावातल्या गफलती, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी, संस्कृत...

In reply to by श्रावण मोडक

मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिन धागा आहे! न चा पाय कसा मोडायचा हो? चु. भु. दे. घे.

In reply to by आनन्दा

मी फक्त माहीती मिळवण्यासाठी धागा लिहला आहे,आपण असंबंध लिखाण करु नये.

In reply to by pramanik

प्रामाणिक, मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिनचा अर्थ हा धागा चराचर व्यापुन दशान्गुळे उर्लेला आहे. सन्स्क्रुतचा अभ्यास कमी दिसतोय तुमचा. ;)

In reply to by मितभाषी

संस्कृतात माझे ज्ञान नाही असे समजावे मस्तिष्कसंबन्धिन् समस्या मज झाली, जी ह्यांस मदत मागितली भारतात कईक समस्या आहेत्,त्याबद्दल मी लिहणार.

In reply to by श्रावण मोडक

>>काल शनिवार होता. आन आज रविवार दुपारबी हाय .... ;-)

आपले स्वागत आहे. इकडे मिपावरपण एक पुणेरी संस्कृत विद्वान आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका साइटीवर संस्कृतचे धडे घेतले होते. लवकरच त्यांची ओळख होईलच.चौपाटीवरही ते संस्कृत व्याकरण शिकवतात. पुन्हा एकदा स्वागत.

आपले स्वागत ! संस्कृत लिहीण्यापूर्वी मिसळपावचे धोरण दर्शवणारे खालील वाक्य पुन्हा पहावे. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. (अन्यथा सद्दाम हुसैन ला पण बोलावावे लागेल, उई ! )