आज शुक्रवार, आम्हा चाकरमान्यांची हक्काची सुट्टी, इकडची एमआयडिसी शु़क्रवारी बन्द असते.
त्यात आज सुट्तीच्या दिवशी कोजागिरी म्हणजे दुधात साखरच / गार्लिक ब्रेड विथ चिझ ;)
मी ठरवले होते कि आज काहितरी छान पदार्थ करायचा.
त्यात काल निवेदिता-टाईची काजुकतरीची पा़क्रु पाहिलि व ठरवलेच की करुन पहायचीच, सोपी पण वाटली.
एक मैत्रीण कायमची दुबई सोडुन गेली तेव्हा घरातले काजु तिने मला दिले हे लक्शात होतेच.
उगाच मी नाही बाइ विकतचे वैगरे आणुन करुन बघत.
३ तासापुर्वी नवरा कामानिमित्त बाहेर गेलाय सो मी ठरवले त्याला काजुकतरी करुन चकित करायचे.
कामाला लागले, निवेदिता-ताइने १ वाटी काजु घेतलेत मी ठरवले आपण २ वाटी घेउयात, उगाच छान झाली तर नंतर कमी नको पडायला. त्याप्रमाणे सगळे दुप्पट सामान घेउन काजु मिक्सरला बारिक केले, जरा जाडच पुड झाली पण मी दुर्लक्श केले. मी एवढी निगुतिने, निट्स संसार करणारी म्हणुन सान्गु कि काजु बारिक केले तेव्हाच मसाले दुधाची तयारी केली. मसाले दुधासाठी पण अजुन काजु, बदाम, पिस्ते बारिक करुन घेतले. आता गॅसपाशी उभी राहिले. पॅनमधे २ तारी पाक करायला घेतला. पाक झाला त्यात काजुपुड घातली. साय नव्हती सो ति नाहि वापरली. निवेदिता- ताईने म्हटल्याप्रमाणे एव्हाना काजुचा गोळा व्ह्यायला हवा होता. अरे बापरे, गोळा व्हायलाच तयार नाही :( मी घामाघुम झाले, टेन्शन आले. आता काजुपुड लाल व्हायला लागली होती, पण नो गोळा. अगो बाइ, आता आइला फोन लावु का? काय करु हे एवढे सगळे फुकट जायचे. आधी गॅस बन्द केला, धावत जाउन एक्सोस्त, चिमणी, एसी ऑन केले. मग थंड डोक्याने अजुन पाणी त्यात साखर घेउन वेगळा पाक तयार केला. पाक त्या काजुपुडीत घालुन परत गॅसवर ठेवले न एकदाचा गोळा होउ लागला. हुष्श्...
आता तो गोळा ताटात ओतला न मिश्रण पसरवले. मस्त सुरी घेतली व वड्या पाडायला घेतल्या. अहो, वड्या कसल्या पडतायत... सगळे सुरिला चि़कटत होते. मग म्हटले जरा गार होउ देत म्हणुन एसी मोठा केला. मधेच मिपावर डोकावुन गेले. झाल बाइ गार.... पाडल्या वड्या. जरा खडबडीतच झाल्या. एकिकडे मसाले दुध तयार केले. नैवेद्य दाखविला.
अहो पण चव सुरेख हो !!! बघा कि फोटो बघा.
वाचने
3714
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा ....
मस्त दिसतायत
वा!! चांगला प्रयत्न! तुमचे
भारी गं चुचे..मगाशी व्यनीमधे
चुचु सहीएस ग........ध्यान्राव
लै अवघड
वड्या न दूध मस्तच दिसतय ग
वेल्डन!!
मस्तच गं चुचे...
मस्त
!
ध्यानकाकांना आवडल्या का नाही
हॅ हॅ हॅ त्यांच्यासाठी
In reply to ध्यानकाकांना आवडल्या का नाही by परिकथेतील राजकुमार
कुन्द्या न मी फोनवर बोलतो तर
In reply to हॅ हॅ हॅ त्यांच्यासाठी by अवलिया
.
In reply to कुन्द्या न मी फोनवर बोलतो तर by पर्नल नेने मराठे
शक्यच नाही !! हा धागा,लिखाण
बघा बघा !! मी मिसळपाव वर नवी
चुचे खर्र खर्र सांग, वड्या तू
चान चान...