Skip to main content

अतिरेक्यांचे मित्र

Published on शुक्रवार, 22/10/2010
२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुणधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदु ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापुन आले आहे.) महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतुन अरुणधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडु लोकांना त्यांच्या आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठींबा जाहीर केला आहे. अशी सभा बोलावण्याची कृती, व अश्या सभेत साक्षात भाग घेणे व त्याही वरुन काश्मीर तोडु अतीरेक्यांना पाठींबा जाहीर करणे हेच मुळी भारतीय कायद्याचे १२४अ कलमाचे उल्लंघन होते. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी ह्या कलमाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावता येते. (१२४ अ राष्ट्रविरोधी कृत्य (sedition) – ‘whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. the Government established by law in India, shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine’) व त्या दृष्टीकोनातुन बघीतले तर सरकारने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर तात्काळ हे कलम लागु केले पाहीजे. व असे होत नसेल तर आपण भारतियांनी व त्यातल्या त्यात राष्ट्रव्रत (राष्ट्रव्रता बद्दल अजुन कोणाला जाणुन घ्यायचे असल्यास, http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html ह्या वर टिचकी मारा) घेतलेल्यांने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर व त्यांच्या सगळ्या वाङ्मयावर बहिष्कार घातला पाहीजे. हे सच्च्या भारतियांच्या हातुन उपजत झाले पाहीजे. हा बहिष्कार त्यांचे डोके ठिकाणावर येई पर्यंत व त्यांना त्यांची चुक समजुन येई पर्यंत टिकला पाहीजे. अजुन विचार करण्या सारख्या गोष्टी अशा आहेत (अ) अरुणधती रॉय सारखी लोक प्रसिद्ध होण्या साठी व राहण्या साठी कोणच्या ही थराला पोहोचतात. अशा लोकांपासुन आपण सावध रहायला शिकले पाहीजे व अशा लोकांना खत पाणी घालणे बंद केले पाहीजे. (ब) अरुणधती रॉय सारख्या लोकांनी हे समजुन घ्यायला पाहीजे की आपल्या देशाचे ऐक्य सर्वोच्च्य आहे व असायला पाहीजे. भारताचे सार्वभौमुत्व व एकता हे त्यांच्या पैसा, प्रसिद्धी व समाजात नावाजलेले राहण्याच्या ईर्षे पेक्षा जास्त महत्वाचे आहे. भारत आहे तर ते आहेत. व हे जर अशी लोक लौकर समजली नाहीत तर आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी व राष्ट्रव्रती लोकांचे कर्तव्य आहे की त्यांना ते समजुन सांगायचे त्यांच्याच भाषेत त्यांच्यावर बहीष्कार घालुन. अशा लोकांना प्रसिद्धी व पैसा हा खुप प्रिय असतो व बहीष्कार घातला तर तो जातो. तेव्हा त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ठिक होते. (क) आपले सरकार व राजकिय पक्षांनी डोळ्यात तेल घालुन अशा सभांना कोणाचा पाठींबा मिळतो, पैसे कोण देतो ह्याचा थांगपत्ता लावला पाहीजे. त्यांना असे ब-याच वेळेला कळुन येईल की पुष्कळ वेळेस पाकिस्तानच अशा सभांना व एन जो ओ ना पैसे व मदत देत असतो. (ड) भारत सरकारने भारतिय कायद्यांचा योग्यतो प्रयोग व उपयोग करुन अशा लोकांना तेथेच व तेव्हाच धडा शिकवला पाहीजे व अशा वेळेस सुज्ञ भारतियांनी त्याला उपजत व पुर्णपणे पाठींबा दिला पाहीजे. लक्षात ठेवा अब्रहम लिंकन चे वाक्य “the idea of secession is the essence of anarchy”. आपले सरकारने ह्याला अजाणपणे पण खत पाणी घालायला नको व सुज्ञ भारतियांनी डोळ्यात तेल घालुन असल्या सगळ्या डावपेचांना शह दिला पाहीजे.

वाचन संख्या 7802
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आमच्या वर्गात एक अरूंधती होती. तिला लहानपणी वर्गातले काही वीर अरुन्दंती म्हणत. चितळ्यांनी अरुणधती म्हणून उपकार केले.

कसली सॉल्लेड 'धतीं'ग आहे बॉस ! कॉलिंग काळे काका... कॉलिंग थत्ते चाचा... कॉलिंग विकास ... सध्या येवढेच पुरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

महाराज, आम्हाला "कॉल" केला त्या प्रमाणे आलो आहोत. मात्र जर चर्चा चांगली चालललेली असताना उगाच जास्तच अवांतर होऊ लागले तर अशांना आम्ही "रिकॉल" करू शकतो हे ध्यानात असुंदेत. ;)

In reply to by विकास

हे integral part म्हणजे नक्की काय बरे? हैदराबाद आणि मराठवाडा आहेत का भारताचे integral parts? आणि बाकीच्या संस्थानांचं काय?

In reply to by विकास

मला हे माहीत नव्हते. बरेच झाले. अरुंधती (बरोबर केले नावाचे स्पेलींग) चा तोल सुटलेला आहे हे ह्याने स्पष्ट होते.

हिंदू मधील बातमी पटकन दिसली नाही. पण गुगलताना समजले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग (का दामन?) ह्या अरूंधती रॉयना पाठींबा देतात (काही बाबतीत नाही असे देखील म्हणून ठेवले आहे, कशात नाही ते माहीत नाही) बाकी अरुंधती मॅडमनी यात नवीन काही तारे तोडलेले नाहीत, कदाचीत आत्मविश्वासाची पातळी वाढली असे म्हणता येईल. असो.

एव्हढ्या महत्वाच्या विषयावर फक्त ९ प्रतिक्रीया आल्या आत्तापर्यन्त. :( :( :(

कालच मला समजले की ह्या बाई भारतात फक्त गोंधळ घालायलाच येतात एरव्ही त्या अमेरीकन व्हिसा घेऊन तिकडेच असतात. त्यांना म्हणावेसे वाटते, आमचे प्रश्न आम्ही सोडवू तुमची गरज नाही आम्हीला.

या फुटीरवाद्यांशी कशाला चर्चा हवी.. दम नसेल तर काश्मीर सोडा नाहीतर त्या गिलानी व मित्रमंडळाला गोळ्या घाला.. एक मनुष्य देश तोडण्याची भाषा व कृती करतोय त्यालाच ईतका आदरस्त्कार फक्त आपल्या भारतातच मिळत असेल.. याला कारण मतपेढीवर डोळा असलेले षंढ राजकारणी.. देशहीताची पडलीये कोणाला..

In reply to by पंख

भारत देशात, जो भारतात घुसून भारता विरुद्ध युद्ध करतो, त्याला सर्वोच्च सुरक्षा प्रदान केली जाते. जे फुटीर वादी असतात त्यांना विविध पदके डून सन्मान केला जातो. जे भ्रष्टाचार करतात त्यांना हजारो करोडोची संपत्ती, सत्ता मिळते. जे सामान्य असतात त्यांना दोन वेळची भाकरी सुद्धा महाकष्टाने मिळते. जे ह्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा गळा चिरला जातो. जय हो ह्या देशाला न कसाब, न काश्मीर, न पाकिस्तान, न अजून कोणापासून, धोका आहे. ह्या देशाला धोका आहे तो फक्त पांढर्या दहशतवाद्यांपासून

In reply to by गांधीवादी

पांढर्या
हा शब्द भयंकर आवडला. ह्या लेखनामुळे देशाला काही फरक पडो न पडो, मात्र ह्या लेखनामुळे मायमराठीत दोन अमुल्य शब्दांची भर पडली ह्याचा खुप आनंद होत आहे.

In reply to by गांधीवादी

आपले मार्मीक वर्णन आवडले. पांढ-या असे लिहायचे होते का तुम्हाला. आपले विचार सडेतोड व बरोबर वाटतात. माझा दुजोरा.

In reply to by रणजित चितळे

असे लिहिण्याची सोय मिपावर आहे. शुद्धलेखनात काय आहे? ज्यांना ते महत्वाचे वाटते त्यांच्यासाठी माहिती दिली.

In reply to by गांधीवादी

आपले मार्मीक वर्णन आवडले. पांढ-या असे लिहायचे होते का तुम्हाला. आपले विचार सडेतोड व बरोबर वाटतात. माझा दुजोरा. चुकुन परीकथेतील राजकुमारांना उत्तर म्हणुन दिले.

आजच्या सकाळमधे आलेली ही बातमी वाचलीत का? अरुंधती रॉय यांच्याकडून विधानाचे समर्थन वृत्तसंस्था नवी दिल्ली- काश्‍मीरविषयी अरुंधती रॉय यांनी केलेल्या विधानामुळे वातावरण तापले असतानाच, आता त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे. 'मी म्हटले ते काश्‍मीरमधील लाखो लोक गेली कित्येक वर्षे दर दिवशीच म्हणत आहेत', असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सवीस्तर बातमी येथे वाचा. http://www.esakal.com/esakal/20101026/4643564146155959061.htm

कोणीतरी या प्रकाराची द्खल घेतली आता. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. ही बातमीसुध्दा वाचा. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल वृत्तसंस्था Wednesday, October 27, 2010 AT 04:36 PM (IST) Tags: arundhati roy, kashmir, dispute, nainital, national नैनीताल - काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता, असे खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध उत्तराखंडमधील एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने नैनीतालमधील मिलीतल पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव पुष्कर सिंह धमानी असे असून, ते राज्यातील शहर विकास नियंत्रण मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते आहेत. याविषयी बोलताना पोलिस अधिक्षक बी एस धोनी यांनी सांगितले की, आमच्या अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रारीची नोंद झाली असून, पुढील कारवाईबाबत कायदाविषयक सल्ला घेऊन पुढील तपास करणार आहोत. गेल्या आठवड्यात 'आझादी-दी ओन्ली वे' या कार्यक्रमात बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी काश्मीर हा भारताचा भार कधी नव्हताच असे म्हटले होते. यावरून देशभरात वादळ उठले होते. http://www.esakal.com/esakal/20101027/5210865226173929154.htm (त्याच्या खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत.)

कश्मीर भारताचा भाग नाही.. ..................................................... नाहि...वस्तुस्थिती मान्य करा...काश्मीर मधे कुणी जावु शकत नाहि....तिकडे इस्लाम धर्म..कुणी राहु शकत नाहि..ते घटना मान्य करत नाहि...त्यांचे नको तितके लाड केले जातात..त्यांचा पंत प्रधान निराळा.. काश्मीर भारत कि वो बिबि है जो भारत का खाति हे और पाक से आखे लडाति है..... बुळा व नपुसक नवरा असल्या वर बायका असेच करतात

खासदार आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी देशद्रोहाचा खटला गिलानींवर भरला पाहिजे अरुंधती रॉय यांच्यावर नाही असे मत व्यक्त केले आहे. Asked whether sedition charges be fastened on Arundhati Roy for her speech on Kashmir, Jethmalani said, "No, not on Arundhati. She has expressed a fair opinion without inciting violence. Sedition charges need to be fastened against Geelani, who is the head of the group of stone-pelting urchins who are being taught violence by him," he said.

पाकिस्तानात पुर येण्याआधी खासदार राम जेठमलानी,अरुंध्दतीबाय व गिलानीला फुटक्या होडक्यात बसवुन पाकिस्तान दर्शनच्या ट्रिपवर पाठवायला हवे होते.